"अजित पवार जास्त काळ बाहेर राहणार नाही लवकरच आतमध्ये जातील" - निलेश राणे

शरद पवार आहेत म्हणून अजित पवार आहेत त्याच्या पलीकडे गेले नाहीत. या वयात याचं कधीतरी आत्मचिंतन केलं पाहिजे असा खोचक सल्ला त्यांनी अजित पवारांना दिला आहे.
"अजित पवार जास्त काळ बाहेर राहणार नाही लवकरच आतमध्ये जातील" - निलेश राणे
"अजित पवार जास्त काळ बाहेर राहणार नाही लवकरच आतमध्ये जातील" - निलेश राणेSaam Tv News
Published On

सिंधुदुर्ग: भाजप नेते निलेश राणे यांनी उप-मुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. अजित पवार जास्त काळ बाहेर राहणार नाही लवकरच आतमध्ये जातील असा दावा करत त्यांनी अजित पवारांनी उप-मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. ("Ajit Pawar will not stay out for long, he will go inside soon"said Nilesh Rane)

हे देखील पहा -

आयकर विभागाने उप-मुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांवर केलेल्या कारवाईप्रकरणी अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली होती. केंद्र सरकार विरोधात असणाऱ्यांचा आवाज दाबला केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन दाबला जातो अशी टीका अजित पवारांनी केंद्रातल्या भाजप सरकारवर केली होती. याबाबत भाजप नेते तथा माजी खासदार निलेश राणे यांनी अजित पवारांना धारेवर धरलं आहे.

"अजित पवार जास्त काळ बाहेर राहणार नाही लवकरच आतमध्ये जातील" - निलेश राणे
Birthday Special: अमिताभ बच्चन यांचं ८० व्या वर्षात पदार्पण...

निलेश राणे म्हणाले की, ''महाराष्ट्रामध्ये अजित पवारांचं नाव गडबड झोल-झ्याल या सगळ्यांसाठी आणि घाणेरडी वक्तव्ययासाठी घेतलं जातं. शरद पवार आहेत म्हणून अजित पवार आहेत त्याच्या पलीकडे गेले नाहीत. या वयात याचं कधीतरी आत्मचिंतन केलं पाहिजे असा खोचक सल्ला त्यांनी अजित पवारांना दिला आहे. पुढे ते म्हणाले की, ''घरावर धाड मारताय, नातेवाईकांच्या घरांवर धाडी मारत आहेत. अजित पवार तुम्ही किती कुटुंबे उध्वस्त केली याची यादी आहे. नियती आहे, इथेच भोगावं लागणार जास्त लांब जाण्याची गरज नाही. तुमचे दिवस बाहेर राहण्याचे नाहीत तुम्ही लवकरच आतामध्ये जाणार. आता कितीही प्रयत्न करा कोणीही थांबवू शकणार नाही अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com