Maharashtra Politics : अजित दादा-शरद पवारांमध्ये चर्चा, बंद दाराआड चर्चेत काय घडलं? स्पेशल रिपोर्ट

Ajit Pawar Sharad Pawar Maharashtra Politics : अजित पवार आणि शरद पवारांमध्ये बंद दाराआड चर्चा झालीय. अजित पवारांनी का गाठलं पवारांचं ऑफिस आणि नेमकी काय चर्चा केली त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.
Ajit Pawar Sharad Pawar
Ajit Pawar Sharad PawarSaam Tv
Published On

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर पवार कुटुंबातही फुट पडल्याची चर्चा होती. मात्र वेळोवेळी हे कुटुंब एकत्र येताना दिसलंय.. मग कधी सार्वजनिक कार्यक्रम असो की मग कौटुंबिक कार्यक्रम. ज्यावेळी शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले त्यावेळी राजकीय चर्चांना उधाण आलं.

आता परत एकदा वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या सर्वसाधारण सभेला या दोघांनी हजेरी लावली. दोघे ही एकाच मंचावर दिसले. एवढेच काय तर राष्ट्रवादीचे अनेक नेते बऱ्याच दिवसानंतर एकत्र पाहायला मिळाले. या सभेनंतर शरद पवार आणि अजित पवारांनी बंद दाराआडा चर्चा केल्यानं सर्वांच्याच भूवया उंचावल्या. त्यामुळे काका-पुतण्या पुन्हा एकत्र येणार का.. याबाबत अजित पवारांनी काय भाष्य केलंय पाहूया.

पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटची सर्वसाधारण सभा होती. यावेळी शरद पवारांच्या बाजूला दिलीप वळसे पाटील आणि अजित पवारांच्या बाजूला चक्क जयंत पाटील बसलेले होते. दादांचं माझ्यावर विशेष लक्ष असतं असं म्हणणाऱ्या जयंत पाटलांशी अजित पवारांच्या बराच वेळ गप्पा ही सुरू होत्या. कार्यक्रम संपला, अन् काका - पुतण्याच्या भेटीचा पुढचा अंक सुरु झाला. व्यासपीठावर एकमेकांकडे न बघणारे आणि बोलणारे काका पुतण्या दार लावून अर्धा तास बोलले. त्यामुळे राष्ट्रवादी एकत्र येणार या चर्चांना उधाण आलंय.. मात्र इन्कमिंगच्या संदर्भात महायुतीच्या नेत्यांनी एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळालं.

Ajit Pawar Sharad Pawar
Maharashtra Politics : नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार? अमित शाह-एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर निर्णय होणार?

विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. त्यातच पवार आणि ठाकरे केंद्रात भाजपसोबत जातील, असं वक्तव्य बच्चू कडूंनी केलंय. हे सगळं लक्षात घेता काका-पुतण्याच्या या बंद खोलीतल्या चर्चेला महत्त्व येत आहे. कारण बंद दाराआडच्या चर्चांमुळेच महाराष्ट्राच्या राजकारणाला बऱ्याच वेळा कलाटणी मिळाली आहे. त्यामुळेच दोन्ही पवारांनी दार लावून बोलणी सुरू केली की राज्यात नव्या राजकीय भूकंपाच्या चर्चाही होतात. त्यानिमित्तानं त्या आत्ताही सुरुएत.

Ajit Pawar Sharad Pawar
Solapur News : हृदयविकाराचा झटका आल्याने २४ वर्षीय अंगणवाडी सेविकेचा मृत्यू, शाळेतच घेतला शेवटचा श्वास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com