Ajit Pawar : अजित पवार म्हणाले, I Love You Too! पण कोणाला? Video

Ajit Pawar Viral Video : अजित पवार हे वर्धा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांना एका कार्यकर्त्यांनी 'लव्ह यू' म्हटले. त्यावर अजित पवारांनी 'आय लव्ह यू टू' असे उत्तर दिले.

चेतन व्यास, साम टीव्ही, प्रतिनिधी

Ajit Pawar Video : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्यादरम्यान त्यांनी एका पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते राष्ट्रवादीचे सहकार नेते सुधीर कोठारी यांच्या घरी जेवणासाठी गेले होते. जेवण केल्यानंतर पुढील कार्यक्रमासाठी ते निघाले होते. रवाना होत असताना एका कार्यकर्त्याने 'दादा, आय लव्ह यू' असे म्हटले. त्यावर अजित पवार यांनी लगेच 'आय लव्ह यु टू' असे प्रत्युत्तर दिले. यामुळे एकच हश्या पिकला. हा संपूर्ण प्रकार सहकार नेते कोठारी यांच्या घरासमोर घडला. यावेळी माजी मंत्री रणजित कांबळे देखील तेथे उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com