राज्याच्या राजकारणाला हादरा? उपमुख्यमंत्री महायुतीतून बाहेर पडणार?

Maharashtra Political Earthquake: अजित पवार महायुतीतून बाहेर पडण्याची चर्चा रंगलीय... त्यासंदर्भात संजय राऊतांनी सूचक संकेत दिलेत.. मात्र राऊत नेमकं काय म्हणालेत.. आणि राज्याच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता किती आहे
Sanjay Raut hints at Ajit Pawar’s political shift amid Maharashtra’s alliance tensions
Sanjay Raut hints at Ajit Pawar’s political shift amid Maharashtra’s alliance tensionsSaam Tv
Published On

राज्यात पुन्हा राजकीय उलथापालथीची चर्चा रंगलीय.. आणि त्याला कारण ठरलंय... संजय राऊतांनी दिलेले सूचक संकेत.... अजित पवार हे लवकरच सत्तेतून बाहेर पडून महाविकास आघाडीसोबत येतील, असं वक्तव्यच संजय राऊतांनी केलं... आणि राज्यात एकच खळबळ उडालीय...तर राऊतांना अफवा पसरवण्याचं व्यसन आहे, असा टोला अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं लगावलाय..

खरंतर नगरपालिका निवडणुकीपासूनच अजित पवार आणि शरद पवार एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.. एवढंच नाही तर पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत अजित पवारांनी भाजपवर घोटाळ्यांच्या आरोपांची ल़ड पेटवून दिली... त्यानंतरही दोन्ही राष्ट्रवादीने जिल्हा परिषद निवडणुकीत एकत्र आल्या आहेत..

त्यात विशेष म्हणजे पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार तुतारीऐवजी घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्यास तयार झालेत..हे भाजपला खटकत असतानाही अजित पवार हे शरद पवारांसोबतच्या आघाडीबाबत ठाम आहेत.. त्यातून अजित पवार आणि भाजपमधील अंतर वाढण्याची शक्यता आहे... मात्र हे अंतर वाढत गेल्यास राज्यातील राजकारणात उलथापालथ होण्याची शक्यता आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com