Ajit Pawar Speech: काम करणाऱ्या माणसाला हातावर हात ठेवून घरी बसता येत नाही; अजित पवारांचा उद्धव ठाकरेंना टोला

‘काम करणाऱ्या माणसाला हातावर हात ठेवून घरी बसता येत नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
Ajit Pawar Speech
Ajit Pawar SpeechSaam tv

संभाजी थोरात

Ajit Pawar Speech In Kolhapur:

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने कोल्हापुरात उत्तरदायित्व सभेचं आयोजन केलं आहे. या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी अजित पवारांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. ‘काम करणाऱ्या माणसाला हातावर हात ठेवून घरी बसता येत नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली. (Latest Marathi News)

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘कोल्हापूर हे पुरोगामी विचारांचा जिल्हा आहे. या सभेनंतर रायगडमध्ये सभा घेणार आहे. आता गणपती आणि दसरा आहे. चांद्यापासून ते बांद्यापर्यंत जाणार आहे. 100 वर्षांपूर्वी शाहू महाराजांनी केलेले कार्य हे आमच्यासाठी प्रेरणा देणारं आहे’.

Ajit Pawar Speech
Disqualification Petition: मोठी बातमी! अपात्रतेची टांगती तलवार असलेले आमदार शरद पवारांच्या संपर्कात? राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

राष्ट्रवादीतील बंडाविषयी भाष्य करताना अजित पवार म्हणाले, ‘अजित पवार तिकडे गेले, त्यांच्यावर दबाव होता, हो आमच्यावर लोकांची कामे पूर्ण करण्याचा दबाव होता. आम्ही पण मराठ्यांची औलाद आहे. फुसक्या दबावाला भीक घालत नाही. आता आमची बदनामी करण्याचं काम सुरू आहे’.

‘ जातीय सलोखा कधीही बिघडू नये, अशा पद्धतीने काम करायचं आहे. आम्ही विरोधी पक्षात असल्याने काही काम करू शकत नव्हतो. आज एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी सरकार चालवत आहोत. आता कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वार्थ साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीत गेला नाही, असे ते म्हणाले .

'काम करणाऱ्या माणसाला हातावर हात ठेवून घरी बसता येत नाही, अशा शब्दात अजित पवारांनी उद्धव ठाकरे टोला लगावला.

Ajit Pawar Speech
Maratha Andolan: मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक; मनोज जरांगेंनी केली कळकळीची विनंती, म्हणाले...

मराठा आरक्षणावर भाष्य करताना अजित पवार म्हणाले,आम्ही मराठा आरक्षणासंदर्भात प्रयत्न करत आहोत. आम्ही मनोज जरांगे यांना समजून सांगत आहोत. मात्र, मनोज जरांगे समजून घेत नाहीयेत. आता त्या मागणीवर दुसरे मोर्चे निघत आहेत. आता आम्ही वेगळ्या परिस्थितीत आहोत. या प्रश्नावर सर्वच पक्षांना चर्चेसाठी बोलावले आहे. सर्वांची मते नेमकी काय हे जाणून घेऊ’.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com