बिबट्यांची बकऱ्यांची मेजवानी हुकणार? वनमंत्री गणेश नाईकांचा दावा हास्यास्पद?

Ajit Pawar Slams Forest Minister: राज्यभरात बिबट्यांच्या वाढलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वनविभागानं अक्षरश हात टेकलेत. बिबट्यांच्या हल्ल्यात आतापर्यंत २५० हून अधिक नागरिक आणि १७ हजार पाळीव प्राण्यांचा बळी गेला आहे. शिरुर, जुन्नर आहिल्यानगर आणि नाशिकमध्ये तर बिबट्यानं लॉकडाऊनच लावलाय. तरी देखिल या बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यावर आतापर्यंत उपाय शोधण्यात वनविभागाला काही यश आलं नाही.
LEOPARD ATTACKS IN MAHARASHTRA AJIT PAWAR SLAMS GOAT FEEDING PLAN
LEOPARD ATTACKS IN MAHARASHTRA AJIT PAWAR SLAMS GOAT FEEDING PLANSaam Tv
Published On

हल्लेखोर बिबट्यांची भूक जाणून त्यांना 1 कोटींच्या बकऱ्यांची मेजवानी देण्याची अनोखी योजना आखलेल्या गणेश नाईकांच्या दाव्याची उपमुख्यमंत्र्यांनी हवा काढलीये. अजितदादांनी नेमकं काय म्हटलंय पाहा,

बिबट्यांची संख्या २ हजारांपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. वनतारा 50 बिबट्यांपेक्षा अधिक बिबटे घेऊ शकत नाही असं त्यांनी राज्य सरकारला कळवलंय. नसबंदी केली तर त्याचा परिणाम दिसायला काही वर्षांचा कालावधी लागू शकतो. मात्र जंगलात एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय हास्यास्पद आहे"

बिबट्यांचे वाढते हल्ले रोखण्यासाठी वनमंत्री गणेश नाईकांनी कोणता जालीम उपाय शोधून काढला होता. वनमंत्र्यांच्या या उताऱ्यावर अजित पवारांनीच हा निर्णय हा हास्यास्पद म्हटल्यानं ही योजना बासनात गुंडाळली जाणार हे जवळजवळ निश्चित झालंय. आता दादांच्या या वक्तव्यावर गणेश नाईकांनी जळजळीत उत्तर दिलंय.

बिबट्यांचे हल्ले थांबवण्यासाठी वैज्ञानिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनाची आवश्यकता असतांना थातूरमातूर उपाय सुचवून या जीवघेण्या प्रश्नाचं गांभीर्य कमी होतंय. वनखात्याची दुसरी टर्म असूनही गणेश नाईक दिर्घकालीन उपायांची अंमलबजावणी करण्यापेक्षा वरवरच्या उपाययोजना सुचवण्यात धन्यता मानताना दिसतायेत. यामुळे सरकार बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यावर आता गांभीर्यानं कधी उपाय शोधणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. इतकं मात्र खरं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com