Maharashtra Live Update: प्रसादाच्या नावाखाली साईभक्तांची आर्थिक फसवणूक करणारी दुकाने सिल

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 14 March 2025: आज शुक्रवार दिनांक १४ मार्च २०२५ महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकीय घडामोडी, लाडकी बहीण योजना, खोक्या भोसले, धनंजय मुंडे, सुरेश धस, सतीश भोसले, संतोष देशमुख हत्या प्रकरण, होळी धूलिवंदनच्या विशेष बातम्या, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर.
Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 14 March 2025
Maharashtra Live News UpdatesSaam tv
Published On

Ahilyanagar : प्रसादाच्या नावाखाली साईभक्तांची आर्थिक फसवणूक करणारी दुकाने सिल

साईभक्तांना अव्वाच्या सव्वा दरात प्रसाद आणि शाल विकणाऱ्या दुकानदारांविरोधात प्रशासनाने कारवाई केली आहे.. ज्या ठिकाणी साईभक्तांची फसवणूक झाली, ते तीनही दुकाने नगरपरिषदेने सिल केली आहेत. शिर्डीत येणाऱ्या भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत काही दुकानदार फुल प्रसादाच्या नावाने फसवणूक करत असल्याचे अनेकदा समोर आलंय.. अशा फसवणुकीच्या प्रकारविरोधात प्रशासन आणि शिर्डी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली असून दुकाने सिल करण्यासोबतच थेट गुन्हे दाखल केले जात आहेत.

नाना पटोले यांनी शिंदे आणि पवार यांच्या ऑफरच्या वक्तव्यावर रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया

ही काँग्रेसच्या नेतृत्वाची हतबलता आहे.ज्या राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि उद्धव सेनेने निवडणुकीमध्ये स्वप्न बघितलं होतं की,राज्यात आमचं सरकार येणार आहे.आणि प्रत्येक जण असं म्हणत होता की आम्ही मुख्यमंत्री होणार आहे

सकाळी 9 वाजता संजय राऊत सांगायचे की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार आहे. दुपारी जयंत पाटील म्हणायचे की शरद पवार ठरवतील ते मुख्यमंत्री होईल आणि सायंकाळी नाना पाटोले म्हणायचे की आमच्यात संध्याकाळचे मुख्यमंत्री भरपूर आहे

Pune : पुण्यात सिंगर हनी सिंगच्या कार्यक्रमापूर्वीच मोठा राडा

पुण्यात सिंगर हनी सिंगच्या कार्यक्रमापूर्वीच मोठा राडा

शोच्या प्रवेशद्वारावर पोलिसांकडून लाठीचार्ज

गर्दी न आवरल्याने पोलिसांकडून करण्यात आला लाठीचार्ज

पुण्यातील खराडी परिसरात आज हनी सिंगचा होत आहे लाईव्ह कॉन्सर्ट

पण या लाईव्ह कॉन्सर्ट ला पोलिसांनी केलेल्या नियोजनापेक्षा अधिक गर्दी आल्याने उडाला गोंधळ

हनी सिंगच्या कॉन्सर्ट साठी चहा त्यांनी केली मोठी गर्दी

गर्दीला आवरताना पुणे पोलीस हतबल

गर्दीला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला असल्याची माहिती

Pune : पुण्यात ऐन धुलीवंदनाच्या दिवशी गावठी आणि बनावट दारूचा मोठा साठा जप्त

पुण्यातील वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गावठी दारूचा साठा जप्त

वानवडी परिसरात दारू विकत असताना आरोपी रंगेहाथ पोलिसांनी पकडला

चांद अमिन सय्यद अस अटक आरोपीचे नाव

आरोपी पुणे शहरातील विविध भागात अनेकदा बनावट दारूची करत होता विक्री

कारवाईत 35 लिटर बनावट दारूचे एकूण 8 कॅन्ड तर विक्रीसाठी आणलेले एकूण 2000 दारूचे फुगे पोलिसांनी केले जप्त

शहरात अनेक ठिकाणी आरोपीकडून बनावट दारूची विक्री झाल्याची पोलिसांची माहिती

Badlapur : बदलापूरच्या उल्हास नदीत बुडून चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू

धुळवड खेळल्यानंतर रंग काढायला गेलेल्या चौघांचा पाण्याचा अंदाज न आल्याने झाला मृत्यू

चारही जण चामटोली जवळील पोद्दार गृह संकुलातील राहणारे

मरण पावलेल्या चौघांची नावे

- आर्यन मेदर 15

- आर्यन सिंग 16

- सिध्दार्थ सिंग 16

- ओमसिंग तोमर 15

Nashik :  होळीच्या दुसऱ्या दिवशी नाशिकमध्ये वीरांची मिरवणुकीची परंपरा

राज्यभरात आज धुळवड साजरी होत असली तरी नासिकमध्ये मात्र आजचा दिवशी विरांची परंपरा जोपासली आणि साजरी केली जाते.वेगवेगळ्या देव देवतांच सोंग घेवुन हे विर नाशिकच्या गोदावरीत आपल्या घरातल्या देवांंना स्नान घालतात आणि परततात.तर यात सर्वांमध्ये महत्वाच्या असलेल्या दाजीबा विराची मिरवणुक हिला विशेष महत्व असते.

हलगीच्या तालावर वीर नाचत असतात त्यात भाविकही मोठ्या आनंदात वीर दाजीबा बरोबर नाचत असतात.वीर नाचवण्याच्या परंपरेचा ३०० वर्षांपासुन बेलगावकर घराण्याकडे मान आहे.आज अमित बेलगावकर यांना हा मान मिळाला शहरातुन निघणारा हा दाजिबा विर नवसाला पावणारा असल्याचं मानलं जातं जे मुलं मुलीचे लग्न होत नाही ते दाजीबा विर कडे नवस करता तसेच ज्यांना मूळ बार होत नाही ते देखील दाजीबा वीरकडे नवस करतात

त्यामुळे भाविक श्रद्धेने आपल्या लहान बाळांना वीरांच्या हातात देऊन नाचवतात त्यामुळे बाळ निरोगी आणि सदृढ होत त्यामुळेच वीरांच्या दर्शनाला नाशिककर मोठी गर्दी करतात.यंदाचा मान हा विनोद बेलगावकर यांच्याकडे आहे.आजच्या या वीरांच्या मिरवणूकित शहरात रात्रभर वीरांना मिरवल जात आणि उद्या सकाळी हे वीर घरी परततात...

रायगडच्या साखर खाडीत रंगल्या हातहोडीच्या स्पर्धा

आज धुलीवंदना निमित्त अलिबागच्या साखर समुद्रकिनारी वल्ह्याने चालवायच्या होड्यांची स्पर्धा रंगली. साखर येथील कोळी समाजाने या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला मोठा प्रतिसाद लाभला. विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली. यांत्रिकी युगात हाताने चालवायच्या होड्या कालबाह्य होत चालल्या आहेत. अशावेळी ही परंपरा जपण्या बरोबरच नवीन पिढीला याची माहिती व्हावी यासाठी हा प्रयत्न इथल्या कोळी समाजाने केला आहे.

अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगरमध्ये दुकानाची तोडफोड,घटना CCTV मध्ये कैद

अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगरमध्ये लाकडी दांड्याने दुकानाची तोडफोड झालीय. किरकोळ कारणामुळे झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत झालं. त्यानंतर दुकानाची तोडफोड करण्यात आली. या तोडफोडीची घटना CCTV मध्ये कैद. तर मारहाणीत एक युवक जखमी झालाय. गुरुवारी रात्री उशिरा हातात काठ्या, रॉड घेऊन दुकान, दुचाकी गाड्यांची तोडफोड करण्यात आलीय. जखमीला उपचारर्थ रुग्णालयात केले दाखल करण्यात आले आहे.

बीड पोलिसांची तृप्ती देसाई यांना नोटीस

बीड जिल्ह्यातील वाल्मीक कराडच्या निकटवर्तीय 26 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बाबतीतील पुरावे घेऊन येण्यासाठी तसेच केलेल्या तक्रारी अर्जाबाबत जबाबासाठी बीड पोलिसांची तृप्ती देसाई यांना उद्या बीड अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर राहण्यासाठी नोटीस. नोटीस आल्यानंतर बीड अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात संपर्क करून मी सोमवारी मार्च 17 तारखेला सकाळी 11.30 पर्यंत हजर होणार असल्याचे कळवले आहे, असं तृप्ती देसाई म्हणाल्यात .

Beed : सतीश भोसलेला ७ दिवसांची पोलीस कोठडी

लाखो आदिवासी बांधवांच्या साक्षीने पारंपरिक काठी संस्थांची राजवाडी होळी संपन्न

आदिवासी समाज जीवनातला सर्वात महत्त्वपूर्ण असलेला होळीचा सण सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये मोठ्या उत्साहात पार पडतोय.

नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुडा मध्ये साजरी होणारी काठीची राजवाडी होळी ही मोठ्या थाटात संपन्न झाली.

या होळीनंतर सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये आता येणाऱ्या पाच दिवस होळीची धूम पाहायला मिळेल.

पालकमंत्री संजय राठोड यांनी बंजारा लेंगीवर धरला ठेका,यवतमाळमध्ये रंगोत्सवाची धूम

यवतमाळमध्ये होळीच्या निमित्ताने रंगोत्सवाची धूम पाहायला मिळाली. बंजारा समाजाच्या वतीने आयोजित रंगोत्सवात राज्याचे मंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी हजेरी लावली.

मंत्री संजय राठोड यांनी पारंपरिक बंजारा लेंगीवर ठेका धरत उपस्थितांची मने जिंकली. समाजाच्या संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी लेंगीवर ठेका धरला.

बंजारा समाजाच्या वतीने आयोजित रंगोत्सवात हजारो समाज बांधवांनी सहभाग घेतला.

या उत्सवाची शान वाढवण्यासाठी स्वतः पालकमंत्री संजय राठोड आणि त्यांच्या पत्नी शीतल राठोड उपस्थित होत्या.

रंगांची उधळण होत असताना, पालकमंत्री संजय राठोड यांनी स्वतः यात सहभागी होत उत्सवाचा आनंद द्विगुणित केला. रंगोत्सवाच्या माध्यमातून समाजामध्ये एकात्मतेचा संदेश देण्याच्या प्रयत्न केला.

राष्ट्रवादी काँगेस शरद पवार पक्षाच्या युवक प्रदेश उपाध्यक्षावर नगरमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल

विधानसभेचे तिकीट मिळवून देतो म्हणून काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय ओबीसी समन्वयक मंगल भुजबळ यांच्याकडून टोकन म्हणून उकळले दिड लाख रुपये...

राष्ट्रवादी काँगेस शरद पवार पक्षाचे युवक प्रदेश उपाध्यक्ष बालराजे पाटील असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव...

विधानसभा निवडणुकीत नगर शहर विधानसभेची जागा काँग्रेसला सुटणार असून तुम्हाला मी तिकीट मिळवून देतो असे सांगून केली होती मंगल भुजबळ यांची फसवणूक...

पैशांचा देवाण-घेवाण ऑनलाईन दीड लाखांचा झाला होता मात्र ऑफलाइन सुद्धा दहा लाख रुपये दिल्याचे मंगल भुजबळ यांचा आरोप..

पैसे देवाण घेवाणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल....

बारामतीत कृषी विज्ञान केंद्रास शरद पवारांची भेट

बारामती मध्ये कृषी विज्ञान केंद्रास माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी भेट दिली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. एवढी शरद पवार जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांनी बारामती कृषी विज्ञान केंद्र अंतर्गत करण्यात आलेल्या नवनवीन प्रयोग आणि तंत्रज्ञान व पीक पद्धतीची माहिती घेतली आहे.

Ahilyanagar: मढी ग्रामपंचायत कार्यालयात अर्जाची छाननीला झाली सुरुवात

मढी ग्रामपंचायतने संबंधित व्यापाराचे मागवले होते प्रस्ताव..

700 ते 800 अर्जाच्या छाननीला झाली सुरुवात..

मढीच्या रूढी परंपरा पाळणाऱ्या व्यापाऱ्यांनाच मिळणार जागा..

ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या मार्गदर्शनाखाली छाननी सुरू..

बीडमधून पुन्हा एक मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

धारूरच्या न्यायालय परिसरात झाली होती मारहाण

पोलिसांनी स्वतःहून पुढाकार घेत दाखल केला गुन्हा

जमिनीच्या व्यवहारासाठी आलेल्या लोकांमध्ये झाला होता वाद

Pune: पुण्यातील मुंढवा परिसरातून १७ लाख रुपयांचा गांजा जप्त

गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली

प्रमोद सुधाकर कांबळे, विशाल दत्ता पारखे यांच्या ताब्यातून १६ लाख ८० हजार रुपये किमतीचा गांजा आणि इतर ऐवज जप्त

या दोघांवर मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

अंमली पदार्थ विरोधी पथक ११ मार्च रोजी रात्री शहरात पेट्रोलिंग करत होते. ते मुंढवा कोरेगाव पार्क रोडने शहा यांच्या मोकळ्या प्लॉट येथे रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास आले असताना़ त्यांना एक लाल रंगाची हुंडाई आय २० या गाडीमध्ये दोघे जण अंधारात बसलेले दिसून आले

गाडीच्या डिक्कीमध्ये दोन नायलॉनची पोती दिसली. वास घेतला असता त्यातून गांजा सारखा वास येत होता. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन गाडीची तपासणी केली

अधिक चौकशी करता त्यांनी विक्रीसाठी गांजा आणल्याची कबुली पोलिसांना दिली

राहुल गांधींची नवसाची होळी खासदार गोवाल पाडवी यांनी केली साजरी

लोकसभे चे विरोधी पक्ष नेते खा राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या वेळी करण्यात आलेली नवसाची होळी खासदार गोवाल पाडवी यांच्या उपस्थिती मध्ये साजरा ..पारंपरिक वेशभूषेत खासदार गोवाल पाडवी यांनी होळी उत्सवात सहभाग आणि नृत्य नागरिकांना दिल्या होळीच्या शुभेच्छा

धुळवडीत हुडदंग घालणाऱ्यावर वाशिम शहर पोलीसांचा सकाळपासून कारवाईचा बडगा

वाशिम शहरात धुळवडीच्या उत्साहात बेशिस्त वाहन चालकांवर वाशिम शहर पोलिसांनी सकाळपासूनच कारवाईचा बडगा उगारला. अनेक दुचाकी चालक आज मोठ्या प्रमाणात बेशिस्त वाहन चालवतात. त्यामुळं अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. यात ट्रिपल सीट, विना नंबर प्लेट आणि यासह हुडदंग घालणाऱ्यावर वाशिम शहर पोलीसांनी शहरातील प्रत्येक चौकात कारवाईचा बडगा उगारला होता.

खोक्या भोसलेचा मोबाईल पोलिसांनी केला जप्त

पोलिसांकडून मिळालेली माहिती आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसलेचा मोबाईल शिरूर पोलिसांकडून जप्त करण्यात आलेला आहे.

तो ज्यावेळेस फरार झाला होता त्या फरार असल्याच्या काळामध्ये तो कुठे कुठे फिरला या मोबाईल मधून आता समोर येणार आहे त्याला कोणी सहकार्य केलं त्याच्या मोबाईलवरती कोणा कोणाचे फोन आले हे देखील आता या मोबाईल मधून समोर येणार आहे.

राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आदिवासी बंधू - भगिनींसोबत साजरी केली होळी

जळगावच्या पाळधी या आपल्या गावी मंत्री गुलाबराव पाटील हे आदिवासी बांधवांच्या आनंदात सहभागी झाले

*यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी आदिवासी बंधू-भगिनींसोबत आदिवासी नृत्य केज्याचे पाहायला मिळालं

आदिवासी बंधू भगिनी हे पारधी गावात आले होते यावेळी त्यांचा मान म्हणून मंत्री गुलाबराव पाटील हे सुद्धा त्यांच्या आनंदात सहभागी झाले.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी आदिवासी बंधू आणि भगिनींसोबत अंदाज सहभागी होत त्यांच्यासोबत आदिवासी नृत्य केलं

Pune: बिर्याणी आणि रस्सा! धुळवड निमित्त पुणेकरांची मटण दुकानाबाहेर रांगा

होळीच्या दुसऱ्याच दिवशी धुळवडीला घरोघरी मांसाहारी पदार्थ खातात.

अनेकांचा मांसाहारी पदार्थावर ताव मारून धुळवड साजरी करण्याचा प्लॅन ठरलेला असतो.

धुळवडीनिमित्त मांसहारी खवय्यांकडून मटण, मासळी, चिकनला आज सकाळपासून मोठी मागणी आहे. पुण्यातील अनेक मटण किंवा मासोळी केंद्रावर नागरिकांनी खरेदीसाठी एकच गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय. धुळवडीच्या दिवशी मासळी, चिकनच्या तुलनेत मटणाला जास्त मागणी असते. पुणे शहरातील प्रसिद्ध असलेले गणेश पेठेतील मासळी बाजार, कसबा पेठेतील मटण मार्केट, कर्वे रस्त्यावरील मटण मार्केट अशा अनेक ठिकाणी ग्राहकांनी सकाळपासूनच रांग लावली होती. सकाळपासून दुकानावर गर्दी असल्यामुळे व्यावसायिक पण आजचा दिवस चांगला जाणार या अपेक्षेने काम करताना पाहायला मिळतायत.

पंढरपुरात बेदाण्याला उच्चांकी प्रति किलो ५११ रुपयांचा भाव

पंढरपुरात चांगल्या प्रतीच्या बेदाण्याला उच्चांकी प्रति किलो 511 रूपयांचा भाव मिळाला आहे. येथील बाजारातील आज पर्यंतचा सर्वाधिक भाव आहे.

पंढरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बेदाणे सौदे बाजारात बेदाण्याची सुमारे १७५ गाडयांची आवक झाली. यामध्ये १५० गाड्यांची विक्री झाली. बेदाण्याची आवक वाढली असली तरी दरात चांगली‌ वाढ झाली आहे.

पंढरपूर तालुक्यातील बार्डी येथील शेतकरी आकाश धनाजी वसेकर यांच्या ३३ बॉक्स बेदाण्याला ५११ रूपयांचा दर मिळाला आहे. बाजारात कमी प्रतीच्या बेदाण्याला सरासरी दोनशे ते अडीचशे रूपये असा भाव मिळाला आहे.

Beed Politics: आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसलेला पोलीस शिरूर पोलीस ठाण्यात घेऊन दाखल

अखेर सतीश रूप खोक्या भोसले शिरूर पोलीस ठाण्यात दाखल

सतीश उर्फ खोक्या भोसले ची शिरूर पोलीस ठाण्यात ओळख परेड होणार

सतीश उर्फ खोक्या भोसले ला शिरूर पोलीस ठाण्यातून उपजिल्हा रुग्णालय शिरूर कासार येथे वैद्यकीय तपासणीसाठी देण्यात येणार

वैद्यकीय तपासणीनंतर सतीश उर्फ खोक्या भोसले ला शिरूर कासार येथील तालुका न्यायालयात नेण्यात येणार

Nandurbar: तीर्थ क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेले दक्षिण काशी प्रकाशा सिद्धेश्वर महादेव मंदिरात फुलांची होळी

होळी निमित्ताने नंदुरबार जिल्ह्यातील तीर्थ क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेले दक्षिण काशी प्रकाशा येथे तापीनदी तीरावरील कोरीट गावातील अति प्राचीन श्री सिद्धेश्वर महादेव मंदिरात पहाटे भस्म आरती करुन महादेवाचा पुष्प आणि बेल पानाने शृंगार करण्यात आला अगदी उज्जैन येथील महाकाल मंदिराप्रमाणे सजावट आणि आरती आणि फुलांची उधळण करुन उत्साहात महादेवा सोबत होळी साजरा केल्याने भाविक प्रसन्न झाले यासोबतच महादेवाला रंग लावण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती...

बुलढण्यात होळीचा सन उत्सहात साजरा,  महिलांनी केले होळीचे पूजन

होळी हा सण हिंदू धर्मात खूप महत्त्वाचा आहे. हा सण वसंत ऋतूत साजरा केला जातो. होळी हा रंगांचा सण आहे आणि या दिवशी एकमेकांना रंग लावून शुभेच्छा दिल्या जातात. होळी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे.

होळी हा सण भगवान कृष्ण आणि राधा यांच्यातील दैवी प्रेमाचा उत्सव आहे.

होळी हा सण वसंत ऋतूचे आगमन आणि हिवाळ्याच्या समाप्तीचे प्रतीक आहे.

होळी हा सण राधा आणि कृष्ण यांचे शाश्वत आणि दैवी प्रेम साजरे करतो. होळी हा सण हिरण्यकश्यपूवर नरसिंहाच्या रूपात विष्णूच्या विजयाचे स्मरण करतो.

होळीच्या पूर्वसंध्येला, होलिकेच्या दहनाचे प्रतीक म्हणून शेकोटी पेटवली गेली. असंख्य महिलांनी

होळीच्या अग्नीत धान्य, नारळ आणि पुरणपोळीचा नैवेद्य टाकून तिला हार फुले वाहून होळीच्या भोवती प्रदक्षिणा घालून प्रार्थना केली.

शिवसेना (उ.बा.ठा) च्या वतीने म.रा.वि.वि कंपनी कार्यकारी अभियंता कार्यालयात ठिय्या आंदोलन

नांदुरा, जळगाव (जामोद) तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतातील ईले लाईट चे पोल वरील तारांची चोरी चे प्रमाण खूप वाढले आहे,

शेतातील विहिरीत पाणी उपलब्ध असतांनाही बागायती शेती करता येत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला म्हणून मलकापुर येथील कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात शिवसेना उबाठाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले,

शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जोपर्यंत विद्युत पोलवर तारा ओढल्या जात नाही तोपर्यंत आम्ही येथून जाणार नाही व म.रा.वि कंपनी कार्यालयाची तोडफोड सुरू करण्याचा इशारा देताच तायडे यांनी संबंधित शेतकऱ्यांचे काम मनोज ब्राह्मणकर या ठेकेदाराला करण्याचे आदेशही दिले व संबंधित ठेकेदाराने 15 ते 20 दिवसात हे काम पुर्ण करुन देतो असे आश्वासन शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिले..

Dharashiv: धाराशिव जिल्ह्यात 10 एप्रिल पर्यंत जमावबंदी आदेश लागु

धाराशिव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 10 एप्रिल 2025 पर्यंत जमावबंदी आदेश लागु करण्यात आले आहेत.

दरम्यान धार्मिक सण,उत्सव,जञा तसेच विविध पक्ष संघटनांच्या आंदोलनात्मक कार्यक्रमांच्या पाश्र्वभूमीवर हा आदेश लागु करण्यात आले असुन कोणत्याही प्रकारचे मोर्चे, मिरवणुका, सभा घेण्यासाठी पोलीस अधिक्षक किंवा संबंधित उपविभागीय पोलिस अधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आल आहे अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Pune: सकाळी ११ वाजल्यापासून रात्री १.३० पर्यंत पुणे शहरात आज नाकाबंदी

धुळवड निमित्त पुण्यात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

पुण्यात दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर होणार कडक कारवाई

पुण्यात धुळवड निमित्त सकाळपासून शहरभरात ठीक ठिकाणी कार्यक्रम

दारू पिऊन डी जे, डॉल्बी वर थिरकणाऱ्या तरुणाईवर सुद्धा पोलिसांची करडी नजर

वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलिसांची तब्बल 80 पथके शहरातील चौकात चौकात तैनात करण्यात येणार

होळी, धुळवड साजरी करताना मद्यप्राशन करून जर कोणी वाहने चालवत असेल तर त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जाणार

Yavatmal: यवतमाळ जिल्ह्यात अडीच महिन्यात 56 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

यवतमाळ जिल्ह्यात मागील अडीच महिन्यात 56 शेतकऱ्यांनी नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याची नोंद प्रशासनाकडे करण्यात आली असून सततची नापिकी आणि शेतमाला मिळणारा कवडीमोल भाव यामुळे दिवसेंदिवस शेतकरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत.त्यातच कर्जमाफीची आशा मावळली असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विम्याचा अजूनही लाभ मिळाला नाहिये.त्यामुळे जिल्ह्यात अडीच महिन्यात 56 शेतकऱ्यांनी आपली जिवन यात्रा संपविली.

होळी उत्सवात महाडमध्ये देव दानवाच प्रतिकात्मक युद्ध

होळीचा सण वेगवेगळ्या परंपरा आणि पद्धतीने साजरी केली जाते.

अशा पैकी एक वेगळी परंपरा म्हणजे देव दानवाच युद्ध. रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये होळी उत्सवाच्या निमित्ताने देव दानवाचे प्रतिकात्मक युध्द होताना पहायला मिळते.

यामध्ये ग्रामस्थ दोन गट करून होळीतील पेटती लाकड आणि निखारे एकमेकांवर फेकतात. हि अनोखी परंपरा महाड शहरातील गवळ आळीमध्ये गेल्या अनेक वर्षापासुन आहे.

होळीच्या सणातील हे देव दानवाच युद्ध तसेच पेटलेली लाकड, निखारे फेकल्याने होणारी अतिषबाजी पहायला मोठी गर्दी होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com