
एकीकडे होळीची धामधूम सुरू असताना वाशिमच्या बाभुळगाव येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
१४ वर्षीय अल्पवयीन मुलाच अपहरण झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे.
पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत अनिकेतच्या शोधात वाशिम पोलिसांनी ९ पथकं पाठवली आहेत.
गावात सुद्धा पोलिसांचा तगडा फौजफाटा दिसून आला असून, मुलाच्या शोधकाऱ्यासाठी डॉग स्कॉड देखील गावात आणण्यात आल होत.
श्री क्षेत्र भीमाशंकर मध्ये होळी या सणाला एक पारंपरिक वारसा लाभला आहे भिमाशंकर देवस्थान आणि आदिवासी बांधव प्राचीन काळापासुन परंपरेप्रमाणे एकत्रित येऊन भिमाशंकरच्या कोकण कड्यावर होळी पेटवली जाते पुरणपोळीचा नैवद्य देऊन नारळ वाहिला जातो विशेष म्हणजे या होळीत लाकूड-फाटा न जाळता फक्त पालापाचोळा आणि शेणाच्या गोव-या पेटवून इकोफ्रेंडली होळी साजरी करण्यात आली.
भीमाशंकरच्या कोकणकड्यावर होळी पेटवुन आरोळी दिली जाते त्यानंतर कोकणातील होळी पेटवल्या जातात हिच परंपरा अजुनही जपली जाते त्यानुसार आज सुर्यास्तानंतर कोकणकड्यावर होळी पेटवुन आरोळी देण्यात आली त्यानंतर कोकणातील होळी पेटविण्यात येतात अशी परंपरा आहे
पंढरपूर शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. नगर पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात होळी पेटवून पालिका प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यात आले.
महर्षी वाल्मिक संघाच्या वतीने आज होळी आंदोलन केले. शहरातील रस्त्यांवर मोठं मोठे खड्डे पडले आहेत. अनेक वेळा मागणी करून ही दुर्लक्ष केले जाते आहे. लक्ष वेधून घेण्यासाठी गांधीगिरी करत होळी आंदोलन केले.
- सोलापूर महानगरपालिकेचा गलथान कारभार, मौलाली चौकात गेल्या पाच दिवसापासून गळती, पाण्याचे फवारे दहा फुटापर्यंत
- मौलाली चौक परिसरात 48 इंची मुख्य जलवाहिनी व्हॅल्व्हला गळती..
- पाच दिवसांपूर्वी सुरू झाली होती गळती, नंतर वाढत वाढत झाली मोठी, हजारो लिटर पाणी गेलं वाया..
- सोलापूर शहरातील अनेक भागात कधी चार तर कधी पाच दिवसाआड पाणीपुरवठा..
- बुधवारी मध्ये रात्रीपर्यंत जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम होते सुरू..
भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र मढी येथील कानिफनाथ महाराजांच्या यात्रा उत्सवला आज सकाळपासूनच भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे. अनेक वर्षाची परंपरा असणाऱ्या गोपाळ समाजाच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी होळी सणाचे आयोजन करण्यात आले.
सायंकाळी वाजत गाजत कानिफनाथ मंदिरापासून मानाच्या सहा सदस्यांनी गोवऱ्या आणून नाथांच्या जयघोषत होळी पेटविण्यात आली. शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या गोपाळ समाजाला या ठिकाणी होळीचा मान दिला जातो. आजच्या दिवशी मढी गावात फक्त गोपाळ समाजाची एकच होळी पेटवली जाते. या होळी सणाविषयी गोपाळ समाजाचे मानकरी आणि समन्वयकांनी आपली भावना व्यक्त केली आहे.
वाई - पाचगणी रोडवरील पसरणी घाटातून चारचाकी गाडी गेली दरीत...
गाडीमध्ये चार पर्यटक असल्याची प्राथमिक माहिती...
अपघातात तीन गंभीर जखमी तर एका पर्यटकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती सर्व पर्यटक पुण्यातील लोणी काळभोर येथील...
दुचाकीच्या सायलेन्सरमध्ये फेरफार करून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकी वाहनचालकांवर धडक कारवाई
शहरात बेशिस्त वाहन चालकांकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रकार वाढले आहेत
बुलेट दुचाकी वाहनास असलेल्या सायलेन्सरमध्ये फेरफार करून अथवा नवीन मॉडीफाय केलेला सायलेन्सर बसवून सार्वजनिक रस्त्यावर, रहिवासी भागात दिवस-रात्र कर्कश आवाज करत भरधाव वेगाने बुलेट चालवून लोकांचे लक्ष वेधून घेण्याचे प्रकार तरूणांमध्ये वाढत आहेत
वाहतूक शाखेतील सर्व विभागांकडून आजची मोहिम राबविण्यात आली.
प्रसिद्ध असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील रायपूर येथील सैलानी बाबाच्या यात्रेला आजपासून विधिवत सुरुवात झाली. आज दुपारी तीन वाजता विधिवत मुजावर परिवाराकडून होळी दहन करण्यात आलं. या ठिकाणी शेकडो ट्रक नारळ भाविकांची , जुनी कपडी याची होळी करण्यात आली.
सैलानी बाबाचे देशभरातील भक्त व भाविक आजपासून या यात्रेला येण्यास सुरुवात झाली. अंगावरील जुनी कपडे या होळीत जाळल्यास आपला रुग्ण बरा होतो अशी काहीशी भावना भाविकांची असल्याने शेकडो ट्रक नारळ व जुन्या कपड्यांची ही होळी पेटविल्या जाते .यावर्षी ही पन्नासावी होळी असून 105 वा संदल आहे येथे 19 तारखेला मुजावर परिवाराच्या घरातून सैलानी बाबांचा संदल निघेल.
डोंबिवलीतील शास्त्री नगर रुग्णालयात प्रसूतिनंतर सुवर्णा सरोदे या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या प्रकरणात चौकशी साठी दोन समित्या नेमण्यात आल्या होत्या .यामधील केडीएमसी च्या समितीचा अहवाल समोर आल्यानंतर केडीएमसीने दोन डॉक्टरांची सेवा खंडित केली आहे . डॉक्टरांची नावे संगीता पाटील आणि मीनाक्षी केंद्रे अशी आहेत या दोन्ही डॉक्टर्सना आऊट सोर्सिंग पद्धतीवर कामावर घेण्यात आले होते . या प्रकरणात जिल्हा शैल्यचिकित्सक समितीचा अहवाल घेणे अद्याप बाकी आहे त्यानंतर गुन्हा दाखल होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
- आत्महत्या केलेले युवा शेतकरी कैलास नागरे यांच्यावर अंतिम संस्कार सुरू.
- कैलास नागरे यांचा मूळ गावी शिवनी आरमाळ या गावी अंत्यसंस्कारविधी सुरू.
- मृतदेहावर शवविच्छेदन प्रक्रिया पार पडल्यानंतर अंतिम विधीला सुरुवात.
- देऊळगाव राजा व जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी अंत्यविधीला उपस्थित.
- आज सकाळी कैलास नागरे यांनी केली होती आत्महत्या.
- राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या मुद्याहून शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
- पुण्यात नराधम दत्ता गाडे आणि वाल्मीक कराडच्या फोटोंचे होळीत दहन
- शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पुण्यात निषेधाची होळी साजरी
- राहूल सोलापूरकर, प्रशांत कोरटकरचे फोटोही होळीत पेटवले
- महायुती सरकारच्या कारभाराच्या विरोधात आंदोलन
- सरकार, राहुल सोलापूरकर, वाल्मिक कराड, प्रशांत कोरटकरच्या विरोधात बोंबाबोंब
सतीश भोसले उर्फ खोक्या भोसलेच्या घरावर वन विभागानं बुलडोजर फिरवला आहे. बुलडोजर फिरवण्याआधी त्याच्या घराची झडती करण्यात आलीय. वनविभागानं ही बेधडक कारवाई करून खोक्याची दहशत एकप्रकारे मोडून काढली आहे.
बदलापूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने आज गाद्या भेट देत झोपा काढा, असा उपरोधिक सल्ला देत आंदोलन केलं. या आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी आलेल्या गरोदर महिलांना दाखल करून घेण्यास टाळाटाळ करत सरसकट पुढे पाठवलं जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केला आहे.
शिवसेना उबाठाणे गटाच्यावतीने आज होळीच्या निमित्ताने दत्तवाडीत महिला सुरक्षा विषयावर बलात्काऱ्यांची होळी करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात आई,बहिणी असुरक्षित आहेत का? त्यांना सुरक्षा देण्यास सरकार असक्षम आहे का? हा प्रश्न उपस्थित करत बलात्काऱ्यांच्या निषेधाची होळी करण्यात आली आहे.
यावेळी ठाकरे सरकारच्या काळातील शक्ती कायदा केंद्र सरकारने पारित करावा ही मागणी करण्यात आली. तसेच महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या सर्वात असक्षम गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली .
धुळ्यात तापमानाचा पारा गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वाढला असून, वाढत्या उष्णतेच्या झळा नागरिकांना सहन करावा लागत आहे, आज धुळ्यात 39 अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे, हवामान विभागातर्फे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले असून, पुढील काही दिवस तापमानाचा पारा अशाच प्रकारे वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे,
त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, तसेच घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन देखील हवामान विभागाच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.
खोक्या भोसलेला ट्रान्झिट रिमांड मिळाली
प्रयगराज न्यायालयाकडून मिळाली ट्रान्झिट रिमांड
खोक्या भोसलेला महाराष्ट्रत आणण्याचा मार्ग मोकळा
आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसले लाथा बीड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सतीश उर्फ खोक्या भोसले ला बीड पोलीस आज तीन वाजता प्रयागराज मदन घेऊन महाराष्ट्रात येणार आहे.
सतीश उर्फ खोक्या भोसले ला उद्या शिरूर कासार न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे.
संगमनेर शहरात नगर पालिकेमध्ये होती आढावा बैठक...
बैठकीनंतर निवेदन द्यायला आलेल्या छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांनी केली घोषणाबाजी...
नितेश राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी...
नितेश राणे यांचा राजीनामा घेण्याची मागणी...
घोषणाबाजी नंतर कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ...
महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केली आंदोलकांना धक्काबुक्की...
पालकमंत्री विखे पाटील यांच्या समोरच घडला प्रकार...
अचानक घडलेल्या घटनेने परिसरात गोंधळ...
राधाकृष्ण विखे पाटील यांचा आज होता संगमनेर मतदारसंघात दौरा...
जमिनीच्या वादातून कुटुंबाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या कुमशी गावात उघडकीस आला आहे..
या मारहाणीचा व्हिडिओ ही समोर आला आहे..
यामुळे खळबळ उडाली असून जखमी वर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत..
जमिनीच्या वादातून 40-50 गुंड भाड्याने आणून लहान मुल,महिला,पुरुषांना जिवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला.यामध्ये भिसे कुटुंबातील तिघेजण जखमी आहेत.
या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मात्र ज्या पद्धतीने मारहाण करण्यासाठी काट्या कुराडीचां आणि धारदार शास्त्राचा वापर केला जात आहे.
त्यावरून या गुणांच्या टोळीवरती कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणात मारहाण झालेल्या अनिल भिसे या तरुणाने घडलेली आपबीती सांगितली.. दोन महिलांना देखील मारहाण केली असल्याचे सांगितले..
भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा आणि हडपसर मधील हॉटेल व्यवसाय सतीश वाघ यांच्या खून प्रकरणात त्यांची पत्नी मोहिनी वाघ आणि मुख्य सूत्रधार अक्षय जावळकर यांच्यासह आरोपी विरोधात न्यायालयात 1 हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
मोहिनी वाघच्या सांगण्यावरून सतीश वाघ यांचे अपहरण करून त्यांचा खून करण्याचा संपूर्ण कट अक्षय जावळकर यांनी कट रचला असे पोलीस तपासात उघड झाले आहे.
सतीश वाघ मॉर्निंग वॉकला कधी जायचे आणि त्याचा दिनक्रम कसा होता याची माहिती अक्षय जाधव पवन शर्मा नवनाथ गुरसाळे आणि विकास शिंदे यांना देऊन वाघ यांच्या खुनाची सुपारी दिल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
या सर्व गुन्हेगारावर गुन्हे दाखल करण्यात आले होते अटक करण्यात आली होती.
त्यानुसार आता कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे..
या धक्कादायक घटनेनंतर बसस्थानकातील सुरक्षेचा अभाव समोर आला त्यामुळे आता विविध उपाययोजना केल्या जात आहेत
पुणे शहर आणि ग्रामीण भागातील संवेदनशील बस थांब्यांसाठी पोलीस प्रशासनाची मदत घेतली जाणार आहे. यासंबंधीचा पत्रव्यवहार एसटी प्रशासनाने पोलिस आयुक्तांना केला असल्याची माहिती आहे.
पुणे,पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील १४ आगारांतर्गत असणाऱ्या ४२ बस स्थानकांच्या हद्दीतील १०० बसथांबे संवेदनशील थांबे म्हणून निश्चित करण्यात आले आहेत.त्या ठिकाणी प्रतिबंधनात्मक उपायोजना करण्यासाठी पोलिस आयुक्तांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
चांदणी चौक, कात्रज, रावेत, चांदणी चौकातील बाह्यवळण ओलांडल्यानंतर महामार्गावरील हिंजवडी फाटयाजवळ मुंबईच्या दिशेने जाणारे आयटी कंपन्यातील प्रवासी कायम असतात.
हे प्रवासी रात्री अपरात्री महामार्गांलगत असणाऱ्या एसटी थांब्यावर बस थांबून प्रवास करत असतात. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी एसटी प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले आहे.
पोलिसांची गस्तही या परिसरात वाढवणार असल्याची माहिती देण्यात आलीय.
काँग्रेसच्या वतीने आज होळीच्या निमित्ताने भ्रष्टाचार तसेच महिला सुरक्षा संदर्भात त्याचबरोबर राज्यातील उद्योगधंदे पर राज्यात नेणाऱ्यांची तसेच महागाई तसेच बेरोजगार अशा बहुतांश मुद्द्यांवरून निषेधाची होळी करून या सर्व बाबींचा निषेध धुळ्यात करण्यात आला आहे,
यावेळी काँग्रेसच्या निषेध करता कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी या सर्व बाबींवरून सत्ताधाऱ्यांना होळीच्या माध्यमातून हेरण्याचा प्रयत्न करत नागरिकांचे या सर्व बाबींकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे,
निषेध होळी दरम्यान मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते या निषेध होळी दरम्यान एकवटल्याचे बघावयास मिळाले असून, यावेळी निषेध होळी दरम्यान सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी देखील करून काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपला निषेध व्यक्त केला आहे.
साईबाबांच्या मंदिरात आज पारंपारीक पद्धतीने होळीचे दहन करण्यात आले..
साईमंदिर परीसरातील गुरूस्थान मंदिरासमोर होळी पेटवून मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सपत्नीक विधीवत पूजन केले..
साईबाबांच्या हयातीपासून शिर्डीत होलिका दहनाची ही परंपरा सुरू असून दरवर्षी मोठ्या उत्साहाने होळी दहनाचा कार्यक्रम अविरत सुरू आहे..
होळी सणानिमीत्त आज साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे तसेच साई मुर्तीला साखरेच्या गाठीकड्यांचा हार तसेच कोटयवधींचे सुवर्ण अलंकार परिधान करण्यात आले आहेत..
० शिमग्यासाठी कोकणात जाणारे चाकमनी वाहतुक कोंडीत आडकले
० मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वरून खोपोलीकडे जोडणाऱ्या मार्गावर वाहतुक कोंडी
० खोपोली नजीक शिळफाट्यावर वाहनांच्या रांगा
- ओमकार सातपुते तरुण एका मुलाला मारहाण करताना दिसत आहे.
- या व्हिडिओमध्येही अमानुष पद्धतीने मारहाण केली जात आहे.
- काल ओंकार सातपुते याला दादा खिंडकर यांनी मारहाण केलेला व्हिडिओ समोर आला होता.
- ओंकार सातपुते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुतेचां चुलत भाऊ आहे.
- आता ओंकार सातपुते याच्याकडून एका तरुणाला मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.
- या व्हिडिओमुळे खळबळ उडाली असून कारवाई केली जाणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल..
- संजय बावणे अमानुष मारहाण केली
पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांची रांगच रांग....
होळी सणाच्या खरेदीसाठी अकाउंट वर आलेले पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर सकाळपासून महिलांची गर्दी.....
होळी सणा निमित्ताने योजनेचे पैसे मिळाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण....
पिंपळनेर पोलीस ठाण्यात तरुणाला मारहाण केल्याच्या प्रकरणात दाखल झाला होता गुन्हा
बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात शरण आल्यानंतर पिंपळनेर पोलिसांची कारवाई
दादासाहेब खिंडकरला घेऊन पोलीस पिंपळनेर कडे रवाना
नांदेड जिल्ह्यात शेतकरी सध्या हळद काढणीमध्ये व्यस्त आहे.
एकाच वेळी अनेक तालुक्यात हळद काढणीचे काम सुरू आहे.
त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीची अवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
हळदीची अवक वाढल्याने बाजारात सध्या हळदीला केवळ 10 हजार रूपये प्रति क्विंटल येवढाच भाव मिळत असल्याने हदळ उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे.
नांदेड जिल्ह्यात मागिल काही दिवसापासून दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ झाली होती.
त्याच पार्श्वभूमीवर ऑपरेशन फ्लश आऊटअंतर्गत पोलिसांनी राबविलेल्या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोरीच्या पाच दुचाकी जप्त केल्या आहेत.
दरम्यान पोलिसांना गोपनीय मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी साफळा रचून शहरातील विष्णुपुरी भागातुन नवनाथ वडजे याच्याकडे चोरीच्या गुन्ह्यातील अनेक दुचाकी असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती.
या माहितीचा आधारे पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेऊन आरोपीकडील सुमारे दोन लाख किंमतीच्या पाच दुचाकी पोलिसांनी जप्त केले आहेत.
होळी आणि धुलीवंदनादरम्यान लोकल आणि रेल्वे गाड्यांवर पाण्याच्या पिशव्या, फुगे फेकून मारल्यामुळे अनेक प्रवासी जखमी होण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर असे प्रकार टाळण्यासाठी डोंबिवली रेल्वे पोलिसांनी पुढाकार घेतला असून रेल्वे रुळांलगत असणाऱ्या वस्तीमध्ये याबाबत जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे.
दरवर्षी होळी आणि धुलीवंदनाच्या काळात पिशव्या आणि फुगे फेकून मारल्याने अनेक प्रवासी जखमी होत असतात.
तर या प्रकारामध्ये काही प्रवाशांना आपले डोळेही गमवावे लागल्याचे प्रकार घडले आहेत. या पार्श्वभूमीवर रेल्वे पोलिसांनी आता पुढाकार घेत असे प्रकार टाळण्यासाठी उपाय योजना सुरू केल्या आहेत.
याचाच एक भाग म्हणून डोंबिवली रेल्वे रुळांलगत असलेल्या भागांमध्ये, वस्तीमध्ये रेल्वे पोलिसांचे पथक ठिकठिकाणी फिरून याबाबत जनजागृती करताना दिसत आहेत.
पंढरपूर जवळच्या गादेगाव येथे आज प्लास्टिक मुक्तीचा संदेश देत विद्यार्थ्यांनी प्लास्टिक वस्तू ची होळी केली.
गादेगाव येथील शिवरत्न पब्लिक स्कूलमध्ये प्लास्टिक आणि कचर्याची होळी करत पारंपारिक होळी सण साजरा केला.
यावेळी शाळेचे संस्थापक गणपत मोरे यांनी प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम त्याचबरोबर पर्यावरणाची होणारी हानी याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
गेल्या पाच वर्षांपासून येथील विद्यार्थी प्लास्टिक मुक्तीचा संदेश देत होळी साजरी करतात.
सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये होळीचा उत्साह पाहण्यास मिळत आहे ज्या मानाच्या होळी उत्सव दिवसा साजरा केला जात असतो.
राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री के.सी .पाडवी यांची मानाची होळी आसली गावाला मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आली.
होळी साठी आदिवसी संस्कृती मधील आसलेल्या सर्व नियमांचे पालन या ठिकाणी करून होळी उत्सव साजरा करण्यात आला.
मोशीत दोन गटाच्या वादात तीन दुचाकींची आणि एक चारचाकी वाहनांची 10 ते 15 जणांनी तोडफोड केली आहे.
वाहन तोडफोडीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये देखील कैद झाली आहे..
बुलेटच्या सायलेन्सर मधून फटाके का वाजवतो, यावरुन वादाला तोंड फुटले अन पुढं या वादातून वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.
काल रात्री उशिरा मोशीतील सस्ते वस्ती तालीम येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे
केज तालुक्यातील विडा येथे दरवर्षी जावयाची धुलिवंदनानिमित्त गाढवावरून मोठ्या उत्साहात धुलीवंदनाचा जावई ही मिरवणूक काढली जाते.
मात्र यावर्षी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ ही मिरवणूक काढली जाणार नाही.
याबाबत गावकऱ्यांनी एकत्र येऊन एकमताने हा निर्णय घेतला आहे.
मेळघाटातील आदिवासीच्या जीवनातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण म्हणजे होळी असतो..
होळीच्या सणाला आदिवासी बांधव मेळघाटात एकत्र जमतात..
मेळघाटात होळी असून पाच दिवस साजरा केला जातो..
आज होळीच्या दिवशी सकाळपासूनच आदिवासी बांधव आपल्या वेशभूषेत नृत्य करताना दिसले..
आपल्या आदिवासी वेशभूषेत बासरीच्या तालावर आदिवासी बांधव नृत्य करत आहेत.. सायंकाळी होलिका दहन मेळघाटात होते..
आदिवासी बांधवांमध्ये या होळी दरम्यान फगवा देखील मागितला जातो..
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारि यांना बैठक् घेऊन जिल्ह्यातील अपूर्ण कामे पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना..
जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणाऱ्या 1357 पाणी पुरवठा योजना पैकी फक्त 296 योजनापूर्ण पैकी 118 योजनेचे कामे अद्यापही बंद आहेत..
कामे ना करणाऱ्या ठेकेदारावर कडक कारवाई करण्याचे दिले आदेश तसेच जबाबदार अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई करण्याचे पाणी पुरवठा मंत्र्यांचे आदेश..
645 योजनेच्या कामा पैकी जी अपूर्ण कामे ठेवल्या गेलंय अश्या कंत्रातदारावर दांडात्मक कारवाई करण्याचे दिले आदेश..
शिवाय दांडात्मक कारवईस प्रतिसात न देणार्या तसेच दीर्घकाळ कामे प्रलंबीत ठेवणाऱ्या कंत्रातदाराना काळ्या यादीत टाकण्याचे दिले निर्देश...
जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनेबाबत चार बैठका घेऊनही कामे अपूर्णच, त्यामुळे मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी...
तिवसा नगरपंचायतचे काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष योगेश वानखडे यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे अमरावती जिल्हाधिकारी यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवील,योगेश वानखडे यांनी 14 फेब्रुवारी 2022 रोजी नगराध्यक्ष पदाचा कार्यभार हाती घेतला होता. मात्र तीन वर्षानंतर त्यांनी अचानक राजीनामा दिला आहे,तिवसा नगरपंचायत मध्ये काँग्रेस पक्षाची एक हाती सत्ता असून त्यांनी अचानक राजीनामा का दिला हे स्पष्ट केलं नाही तर योगेश वानखडे यांच्या नंतर नगराध्यक्षाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष लागलं आहे
धाराशिव जिल्ह्यात यावर्षीचा साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपत आला असुन जिल्ह्यातील बारा पैकी नऊ साखर कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत तर उर्वरित ३ साखर कारखाने लवकरच बंद होण्याची शक्यता आहे.धाराशिव जिल्ह्यातील ५ सहकारी व ७ खाजगी साखर कारखान्यांनी यंदा १९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.चालु गळीत हंगामाच्या अहवालानुसार धाराशिव जिल्ह्यात २८ लाख १७ हजार ३६५ टन ऊसाचे गाळप झाले आहे त्यापासून १९ लाख १६ हजार ९७६ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे जिल्ह्याचा साखरेचा सरासरी उतारा केवळ ६.८ टक्के आहे.
पुणे पालिकेकडून करण्यात येणार दंडात्मक कारवाई
पुणे शहरातील वन विभागाच्या हद्दीत असलेली तसेच नदीकाठ आणि आसपासच्या परिसरातील झाडे तोडीवर प्रशासनाची असणार करडी नजर
शुक्रवारी होणाऱ्या होळी निमित्त अनेक ठिकाणी लाकडांचा वापर केला जातो
महाराष्ट्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम २०२१ या कायद्यानुसार विनापरवाना झाडे जाळणे, झाडे तोडणे हा दंडात्मक गुन्हा
याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिका सुद्धा झाडे तोडणाऱ्या व्यक्तींकडून वसूल करणार १ लाख रुपयांचा दंड
जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी तसेच वेतनश्रेणीमध्ये वाढ करण्यात यावी यासह अन्य मागण्या घेऊन बुलढाणा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर निषेध आंदोलन केले.. लवकरात लवकर मागण्या मान्य करण्यात याव्या अन्यथा यापेक्षा तीव्र स्वरूपाच्या आंदोलन करणार असल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे..
पश्चिम विदर्भातील अमरावती शहर हे महत्त्वाचं विभागीय मुख्यालय आहे मात्र या मुख्यालयातुन विमान सेवा सुरू नव्हती,
अमरावतीच्या विमानतळावरून विमान सेवा सुरू करावी अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची अमरावती व आसपासच्या अकोला यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांची मागणी होती.
सप्टेंबर 2023 रोजी इंदू कन्स्ट्रक्शन कंपनीने विमानतळाच्या कामाला सुरुवात केली व ऑक्टोबर 2024 रोजी विमानतळाचे काम पूर्ण झाले,
अखेर 31 मार्च रोजी या विमानतळावरून विमा सेवा सुरू करण्यात येईल अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेली आहे.
विमानतळावर सर्व सोयी सुविधा तयार करण्यात आल्या असून सुरक्षा यंत्रणा देखील तैनात करण्यात आलेली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.