
डोंबिवली खंबाळपाडा आर एस एस शाखेवर दगडफेक प्रकरण
टिळक नगर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक जगन्नाथ शिंदे निलंबित
न्यायालयात रिमांडसाठी गेले नसल्याने निष्काळजीपणाचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई
पुण्यातील स्वारगेट एस टी स्टँड लैंगिक अत्याचार प्रकरणी महत्त्वाची अपडेट
आरोपी दत्ता गाडे याच्या अडचणीत आणखी वाढ
पुणे पोलिसांनी दत्ता गाडे याच्यावर आणखी ३ कलमांची केली वाढ
पीडित महिलेचा रस्ता अडवणे, तिला मारहाण करणे आणि जबरदस्तीने २ वेळा संभोग करणे अशा गंभीर स्वरूपाच्या कलमांची वाढ
भारतीय न्याय संहितेच्या कलम 64(2), 115 (2) आणि 127(2) या कलमांची वाढ
पुणे पोलिसांनी आरोपी आणि पीडित तरुणीचे घटनेच्यावेळी परिधान केलेले कपडे जप्त करून क्राइम लॅबकडे पाठवले
होळीसाठी पुण्यातून १३ जादा ट्रेन, प्रवाशांच्या सुविधेसाठी टाकला मंडप
गर्दी होऊ नये म्हणून मोठी खबरदारी
पाच वाजेच्या सुमारास दोन वेळा भूकंप सदृश्य झटके
शहरासह ग्रामीण भागातील घरांना भूकंप सदृश्य झटके
चाळीसगाव तहसीलदारांनी घडलेल्या घटनेला दुजोरा दिला आहे
झटके आणि आवाज भूकंपाचेच होते का? हे मात्र स्पष्ट सांगितलेलं नाही
दररोज तापमानात वाढ होत असल्यामुळे यंदा अधिक उष्णतेची भीती
सतीश उर्फ खोक्या भोसले ला उत्तर प्रदेश मधून अटक करण्यात आली आहे. त्याला अटक होतात त्याच्या तडीपारची मंजुरी देण्यात आली आहे.
सतीश उर्फ खोक्या भोसले वरती एकूण बारा गुन्हे दाखल आहेत. यामध्ये शिरूर पोलीस ठाणे आष्टी पोलीस ठाणे पाटोदा पोलीस ठाणे आणि आंबोरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल आहेत. सतीश भोसले च्या अडचणीमध्ये आता मोठी वाढ होणार आहे त्याच्यावरती तडीपारेची कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावंत त्यांनी केली आहे.
धुळवडी दिवशी पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल
धुळवड सणानिमित्त पुणे मेट्रो ची प्रवासी सेवा सकाळी ६ ते दुपारी ३ पर्यंत राहणार बंद
दुपारी ३ ते रात्री ११ पर्यंत पुणे मेट्रोची सेवा नियमित सुरू राहील
पुणे मेट्रो रेल ची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली माहिती
माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्याकडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पदाधिकाऱ्याला मारहाण
साई बाबा विकास आराखडा संदर्भात बैठक संपल्या नंतर मारहाण
माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्यासह ४ जणावर गुन्हा दाखल
पाथरीत काही काळ तणावाचे वातावरण
शिवसेनेचे पदाधिकारी आलोक चौधरी यांच्या फिर्यादीवरून पाथरी पोलिसांत गुन्हा दाखल
नंदुरबारमधील गुजर भवाली गावातल्या विकास कामावरुन आज दोन गट थेट पोलीस स्टेशनमध्ये आमने सामने आल्याचे पहावयास मिळाले. या गावात सुरु असलेल्या विविध कामांमध्ये भ्रष्ट्राचाराचा आरोप एका गटाकडून होत होता.
यासाठी त्यांनी आज पंचायत समिती नंदुरबारला घेरावाचा इशारा दिला होता. मात्र गावातील सत्ताधारी गट देखील पंचायत समितीमध्ये पोहचत त्यांनी गट विकास विकास अधिकाऱ्यांसमोर ठाण मांडून गावातील विकास कामात काही कडून मुद्दाम रोडे आणल्या जात असल्याची तक्रार केली. यानंतर हा वाद पोलीस स्टेशन आवारात पोहचला.
याठिकाणी दोन्ही गट समोरा समोर आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलीसांनी वेळीच हस्तक्षेप करत एका गटाला बाहेर काढले. तर दुसऱ्याने ठाण माडंत आपली तक्रार केली.
पश्चिम विदर्भात 9 मोठे प्रकल्प.. त्यापैकी एक अप्पर वर्धा धरण..
याच अप्पर वर्धा धरणातून अमरावती शहराला आणि शेती सिंचनासाठी पाणीपुरवठा केला जातो..
मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच 56 टक्के जलसाठा...
मागील वर्षी मे महिन्याच्या अखेरीस 57 टक्के होता जलसाठा..
उन्हाळ्यात अमरावतीकराना करावा लागणार पाणी टंचाईचा सामना..
धनंजय देशमुख यांचा सहकारी दादा खिंडकर याचा आणखी एक करनामा उघड
दादा खिंडकर यांनी एका घरावरती हल्ला केल्याचा व्हिडिओ आला समोर
हा व्हिडिओ सध्याला सोशल मीडिया वरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.
घरावरती हल्ला करत गाडीची ही केली तोडफोड 2016 चा विडिओ असल्याच समोर
दादा खिंडकर करणे गाडीची तोडफोड करत घरावरती हल्ला केल्याच्या प्रकरणात त्याच्यावरती दरोड्याचा गुन्हा दाखल.
संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचा दादा खिंडकर साडू आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी असलेल्या लासलगाव बाजार समितीत उद्या पासून रविवार असे सलग चार दिवस बंद राहणार आहे.लासलगाव व्यापारी संघटनेने तसे पत्र बाजार समितीला दिले आहे.उद्या होळी निमित्त व्यापा-यांकडे काम करणारे आदिवासी भागातील कामगार आपल्या गावाकडे होळी उत्सवा निमित्त जाणार असल्याने व्यापा-याकडील खळे,गोदाऊन मधिल काम बंद राहते त्यामुळे लासलगाव बाजार समितीच्या व्यापा-यांनी पत्र दिल्याने होळी निमित्ताने लासलगाव बाजार समिती बंद राहणार असून सोमवार पासून बाजार समितीचे व्यवहार पुन्हा सुरु होणार आहे.चार दिवस बाजार समिती बंद राहणार असल्याने शेतक-यांना आपला कांदा साठवून ठेवावा लागणार आहे.
एस टी स्टँड आणि परिसरातील अनेक वर्षांपासून असलेले अतिक्रमण, अतिक्रमण विभागाच्या पथकाने हटवले
पौड ते ताम्हिणी या मुख्य रस्त्यापासून आठ मीटर अंतरावरील असणारी अनधिकृत दुकाने, पत्र्याचे शेड जेसीबीच्या सह्याने पाडण्यात आले
पीएमआरडीए, एमएसआरडीसी आणि पी डब्लू डी यांनी एकत्रित अतिक्रमणे काढण्याची मोहीम राबवत केली संयुक्त कारवाई
अतिक्रमणे काढल्यानं पौड परिसराने घेतला मोकळा श्वास
पौड येथील काढण्यात आलेल्या अतिक्रमण जागेत कोणीही पुन्हा, दुकाने उभी करू नये..अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणारं.. पौड पोलिसांचा इशारा..
नांदेड जिल्ह्यातील एका सुशिक्षित शेतकरी जोडप्याने अवघ्या दीड एकर शेतीत कलिंगडाचे 52 टन असे इतके विक्रमी उत्पादन घेतलंय.
नायगाव तालुक्यातील शेळगांव छत्री इथल्या सागर दिलीप सालेगाये असे या शेतकरी जोडप्याचे नाव आहे.
या 52 टन कलिंगडाच्या विक्रीतून त्यांना सहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. सालेगाये ह्यांच्या या कलिंगडाची खरेदी महेबूब शेख या स्थानिक व्यापाऱ्याने केली असून हा माल व्यापाऱ्याने केरळ राज्यात निर्यात केला आहे.
केरळ राज्यात महाराष्ट्राच्या कलिंगडाला अधिकची मागणी असून तिथे भाव देखील चांगला मिळत असतो.
दरम्यान नोकरी नाही व्यवसायाला भांडवल नाही असे रडगाऱ्हाणे न गाता या कुटुंबाने त्या परिस्थितीत शेतीत भरघोस उत्पन्न काढलंय.
त्यामुळे पंचक्रोशीत या जोडप्याचे कौतुक होत आहे.
हिंगोली औंढा राज्य महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघाताची घटना घडली आहे,
भरधाव वेगात जाणाऱ्या दोन कार एकमेकांना समोरासमोर धडकल्या आहेत,
या अपघातात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हिंगोली जिल्हाध्यक्ष बंडू कुटे यांचे भाचे जागीच ठार झाले आहेत
तर इतर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत,
हिंगोली शहराच्या एमआयडीसी परिसरातील पिंपरी गावाच्या जवळ ही घटना घडली आहे, अपघात इतका भीषण होता की चार चाकी कारचे इंजिन तुटून बाहेर पडले होते
दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांसह पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत बचाव कार्य सुरू केले होते
खोक्याला पोलिसांनी अटक केल्यामुळे अर्ज घेतला मागे
ज्यावेळी बीड पोलीस बीड कोर्टामध्ये सादर करतील, त्यावेळेस पुन्हा नव्याने अर्ज केला जाणार असल्याची खोक्याचे वकील शशिकांत सावंत यांची माहिती
- साधु वासवानी चौकातील जनरल पोस्ट ऑफिस समोर आंदोलन
- पोस्ट विभागात काम करणारे आऊट सोर्स आणि रोजंदारीवरील कामगार आपल्या प्रॉव्हिडंट फांडाच्या हक्कासाठी कायदेशीर लढाई लढत आहे.
- या कामगारांच्या विरोधात सुडात्मक कारवाई म्हणून, पोस्टमास्टर जनरल पुणे यांनी त्यांना कामावरून काढून टाकुन नवीन कामगार भरती करण्याची कारवाई सुरू केली आहे.
- या विरोधात जनरल पोस्ट ऑफिस पुणे साधू वासवानी पुतळ्याजवळ युनियनच्या वतीने या कामगारांनी जोरदार आंदोलन केले .
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनाच्या निमित्ताने सांगलीच्या शिराळा येथील भुईकोट किल्ला येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या रेखाटण्यात आलेल्या भव्य अशा सात हजार स्क्वेअर फुटाच्या रांगोळीचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
तर १६ मार्च पर्यत रांगोळी सर्वांच्यासाठी पाहण्यास खुली राहणार आहे.
शिराळा येथील भुईकोट किल्ल्यास ऐतिहासिक महत्त्व आहे.
याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना सोडवण्याचा एकमेव प्रयत्न झाला.
शिराळ्यातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यावरती भव्य दिव्य रांगोळी रेखाटण्यात आली आहे.
अशा पद्धतीने शिराळा व सांगली जिल्ह्यात पहिल्यांदाच ही रांगोळी रेखाटण्यात आली आहे. ही रांगोळी कांदे येथील रांगोळी कलाकार सुनील कुंभार यांनी रेखाटली आहे.
१६ मार्च पर्यत रांगोळी सर्वांच्यासाठी पाहण्यास खुली राहणार आहे.
तरी याचा लाभ घ्यावा सर्वांनी घ्यावा असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच मंदिरांमध्ये प्रवेश करण्यासाठी ड्रेस कोड लागू होणार आहे. महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेकडून ठराव करण्यात आला आहे.
नंदुरबार शहरात न्यास परिषदेकडून आयोजित करण्यात आलेल्या अधिवेशनामध्ये ड्रेस कोडच्या ठराव घेण्यात आला असून आता मंदिरात प्रवेश करण्यासाठी महिलांनी कुठला आहे
कुठले कपडे परिधान करावा याचे नियम लागू करण्यात आले आहेत
त्यामुळे आता नियमानुसार ठरवून दिलेले ड्रेस कोड मंदिरांमध्ये लागू राहणार आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला वाल्मीक कराड याचे वकील अशोक कवडे हे सुरुवातीपासून काम पाहत होते मात्र वाल्मीक कराड वरती मोका अंतर्गत कार्यवाही आणि संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणांमध्ये नाव आल्यानंतर अशोक कवडे यांनी आपलं वकीलपत्र मागे घेतल्याची बातमी साम टीव्ही ने सर्वात सुरुवातीला चालवली होती या बातमी वरती शिक्का मोर्तब झाला आहे.
देशमुख हत्या प्रकरणातील आज पहिली सुनावणी केज न्यायालयामध्ये होत होत आहे आणि या पहिल्या सुनावणीला आरोपी वाल्मीक कराडचे वकील अशोक कवडे आता हजर राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे तर वाल्मीक कराडचे वकील खाडे म्हणून कोर्टामध्ये काम पाहणार असल्याची माहिती मिळाली आहे तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सहकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे मात्र सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून बाळासाहेब कोल्हे न्यायालयामध्ये हजर झाले आहेत.
राज्यात सलग चौथ्या दिवशी उष्णतेच्या लाटेने कहर केला असून,काल मुंबईसह संपूर्ण राज्याचे सरासरी कमाल तापमान 38 ते 39.5 अंशांवर गेल्याने अंगाची काहिली करणारा उकाडा जाणवत होता.
यंदाच्या हंगामात मुंबईचे तापमान दुसर्यांदा 38, तर येथील सांताक्रूझचे 39.2 अंशांवर गेल्याने मुंबईकर उन्हात होरपळून गेले होते.
काल विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात उष्णतेची लाट सक्रिय झाली असून,अकोला शहराचा पारा मंगळवारी 39.5, तर सांताक्रूझ, शिरूर अन् कोरेगाव पार्कचे तापमान 39.2 अंशांवर गेले होते.
राज्याचे कमाल तापमान
अकोला 39.5, ब-ह्मपुरी 39.4, मुंबई 38, सांताक्रूझ, पुणे (कोरेगाव पार्क, शिरूर) 39.2, जळगाव 38.4,अमरावती 38.4, बुलडाणा 37, ब-ह्मपुरी 39.4, चंद्रपूर 38.2, नागपूर 37.6, वाशिम 37.8, वर्धा 38,यवतमाळ 34.4. अकोला 39.5, सांताक्रूझ,पुणे,शिरूर 39.2, मुंबई 38 अंशांवर
पुढील आणखी तीन दिवस प्रखर लाटेचा इशारा हवामान खात्याने दिलाय..
14 गावातील ग्रामस्थ वनमंत्री गणेश नाईकांना घालणार साकडं.
वनमंत्री गणेश नाईक यांनी 14 गावांच्या नवी मुंबई महानगरपालिकेतील समावेशाला दर्शवला होता विरोध.
गणेश नाईक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहत 14 गावांना दर्शवला होता विरोध.
गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखालीच आता पर्यंत आम्ही काम केलं असून गणेश नाईक आमचे नेते आहेत त्यांनी राजकीय आकसासाठी असं निर्णय घेऊ नये.
14 गावातील ग्रामस्थ नवी मुंबईतून रवाना.
सत्ताधारी भाजप नगरसेवक आणि नगर पंचायत पदाधिकाऱ्यांत बाचाबाची
भाजप नगरसेवक बळवंत कवडे यांनी विशेष सभा इन कॅमेरा घ्यावी अशी केली होती मागणी
सभेत होणाऱ्या कामकाजाची प्रोसिडिंगमध्ये चुकिची नोंद होत असल्याचे नगरसेवक बळवंत कवडे यांचे म्हणणे
मागणी मान्य न झाल्याने कवडे यांनी फेसबुक लाईव्ह सुरू केल्याने बाचाबाची होऊन झाली हाणामारी झाल्याची माहिती
वाशी पोलीस ठाण्यात परस्परांविरोधात दोन गुन्हे दाखल
नगरसेवक बळवंत कवडे यांच्या फिर्यादीवरून उपनगराध्यक्ष सुरेश कवडे ,नगरसेवक कृष्णा कवडे, सुहास कवडे यांच्या विरोधात वाशी पोलिसात गुन्हा दाखल
तर नगरसेवक कृष्णा कवडे यांच्या फिर्यादीवरून नगरसेवक बळवंत कवडे , विकास पवार, भागवत कवडे आणि कार्यकर्ते जबर अहेमद काझी विरोधात तक्रार दाखल
- नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील सहदेव नगरच्या दत्त मंदिराजवळ कृष्णा आंधळे दिसल्याचा दावा
- पोलिसांचे पथक परिसरात दाखल, कृष्णा आंधळेचा शोध सुरू
बीडच्या शिरूर तालुक्यातील सतीश उर्फ खोक्या भोसलेने ढाकणे पिता-पुत्रांना अमानुष मारहाण केली होती यानंतर सतीश उर्फ खोक्या भोसले विरोधात शिरूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होता.
सतीश भोसले गेल्या सहा दिवसापासून फरार होता त्याच्या शोधासाठी दोन पथक तयार करण्यात आले होते आणि त्याचा शोध घेत होते त्याला आज सकाळी प्रयागराज पोलिसांनी अटक केली आहे.
भरधाव वेगाने आलेल्या कारने तीन दुचाकींसह पदचाऱ्यांना चिरडलं..
चालक मद्यपान करुन कार चालवत असल्याचा स्थानिकांचा आरोप
पदचारी नागरिकांना धडक दिल्यानंतर तीन दुचाकींना कारची धडक
पाच जण गंभीर जखमी जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु
कार अपघातातील चालक दारुच्या नशेतील व्यक्ती डॉक्टर असल्याची प्राथमिक माहिती.
मांगी बिट मधील सितार या वाघिणीच्या पायाला दोरीचा फास असल्याची माहिती
कक्ष क्रमांक 132 मधील ही वाघीण
या आधी सुद्धा 2 वाघिणीच्या गळ्यात ताराचा फास अडकल्याचे आले होते पुढे त्याना रेस्क्यु करून फास काढण्यात आला
आता पुन्हा एका वाघिणीच्या पायात दोरीचा फास अडकल्याची माहिती
महिन्याभरातील तिसरी घटना
पुणे पोलिसांची गुन्हे शाखा आज दत्ता गाडेला शिवाजीनगर न्यायालयात घेऊन येणार आहे...
दत्ता गाडेची आज येरवडा जेलमध्ये रवानगी होण्याची शक्यता...
बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सर्रास अवैध दारू विक्री सुरू आहे .
जिल्ह्यातील उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या हप्तेखोरीमुळे अवैध दारू विक्रेत्यांचा व्यवसाय खोपावला असून त्यामुळे अधिकृत दारू विक्रीवर परिणाम होत आहे आणि यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी अवैध दारू विक्रेत्यांवर कुठलीच कारवाई करताना दिसून येत नाहीत
त्यामुळे आता या अधिकाऱ्यांवरच कारवाई करण्याची वेळ आली असल्यासही अधिकृत दारू विक्रेत्या संघटनेने म्हटल आहे. यासंबंधी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल.
महाबोधी बुद्ध विहारासाठी 1949 चा कायदा रद्द करण्यात यावा.. बिहार मधील महाबोधि बुद्ध विहार बौद्ध भिक्कू संघाच्या ताब्यात देण्यात यावा.. या प्रमुख मागणीसाठी खामगाव तालुक्यातील बौद्ध समाज बांधवांच्यावतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.. या मोर्चाला जयस्तंभ चौकातून सुरुवात करण्यात आला असून जिल्हाधिकारी कार्यालय जाऊन धडकला.. यावेळी राष्ट्रपती यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन देण्यात आले ..
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर दुसरी सुनावणी आज केजच्या विशेष मकोका न्यायालयात होणार आहे.
दुपारी अकराच्या दरम्यान यां सुनावणीला सुरूवात होईल.आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे हजर करण्याची शक्यता आहे.
आरोपीचे वकील आणि सरकारी वकीलात काय युक्तिवाद होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले तसेच वाल्मीक कराड आज जामीन अर्ज मांडला जाणार हेही पाहण महत्वाचं असेल.
दोषारोप पत्रामध्ये कलम 18 नुसार आरोपीचे जवाब जोडले नाहीत, तसेच डिजिटल इव्हिडन्स याचेही आरोपीच्या वतीला कडून मागणी केली जाऊ शकते.
विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती आहे त्यांच्या वतीने कोण आज न्यायालयात बाजू मांडणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
मध्य प्रदेशातील दोन युवक दुचाकीवरून जाताना तुमसर पोलिसांनी त्यांची झडती घेतली. त्यांच्याकडे एका प्लास्टिकच्या पिशवीत सहा किलोपेक्षा अधिक गांजा हा अमली पदार्थ मिळून आला.
या गांजाची किंमत सुमारे १ लाख ३१ हजार ८०० रुपये इतकी आहे. तुमसर येथील गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे व पोलिस निरीक्षक संजय गायकवाड त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
भुरा निरपतसिंह धाकड (४५, रा. उडिया रायसेन (मध्य प्रदेश), यशवंत हरी गोविंदसिंह धाकड (२५, रा. घाना बहिडिया, तहसील उदयपुरा (मध्य प्रदेश) अशी अटक केलेल्या युवकांची नावे आहेत.
मंगळवारी पहाटेच्या सुमारास दोन युवक दुचाकीवरून (क्र. एमएच ०५ डीजे ७११४) खापा चौकातून जात होते.
संशयास्पद हालचालींवरून त्यांना गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांनी थांबविले.
दुचाकीची झडती घेतली असता त्यात एका प्लास्टिकच्या पिशवीत सहा किलोपेक्षा अधिक गांजा आढळला. यात हिरवट काळपट रंगाची पाने, फुले, देठ, कळ्या, बिया असलेले गांजा होता.
बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी येथील दिलीप ढाकणे आणि महेश ढाकणे या पिता पुत्रांना अमानुष मारहानीनंतर सतीश उर्फ खोक्या भोसले आणि त्याच्या इतर सहा साथीदारांवरती शिरूर कासार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याच बरोबर एका व्यक्तीला बॅटने अमानुष मारहाण प्रकरणी सतीश उर्फ खोक्या भोसलेचा व्हिडिओ सोशल माध्यमांवरती व्हायरल झाला होता.
त्याप्रकरणी देखील सतीश भोसले वरती सुमोटो नुसार शिरूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे.
असे वेगवेगळ्या दोन गुन्हे दाखल असलेला सतीश भोसले अद्यापही फरारच आहे.
मात्र त्यांनी जमिनीसाठी आता धावपळ सुरू केली त्याच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी आहे सतीश उर्फ खोक्या भोसलेला जामीन मिळते की जामीन अर्ज फेटाळला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
धाराशिव जिल्हा प्रशासनाकडून जिल्हास्तरीय टंचाई आराखडा अंतिम
विहिरी अधिग्रहण,तात्पुरती नळदुरुस्ती, टँकर पुरवणे अशा बाबींचा आराखड्यात समावेश
धाराशिव जिल्ह्यातील चार प्रकल्पातील पाणी आरक्षित
तुळजापूर तालुक्यातील चार प्रकल्प पिण्याच्या पाण्यासाठी करण्यात आले आरक्षित
इतर पाणी उपसा करण्यावर देखील बंदी
पावसाळ्यात धरणे ओव्हरफ्लो होऊन देखील बेसुमार पाणी उपसा मुळे जिल्ह्यातील उपयुक्त पाण्यासाठी पातळी घसरली
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांची माहिती
मुकद्दर वजीरभाई पठाण यांनी केली होती याचिका दाखल...
मुस्लिम समाजाच्या व्यवसायिकास मढी यात्रेत व्यापार करण्यास जागा देणार नसल्याचा केला होता ग्रामसभेत ठराव....
ठरवलं स्थगिती भेटल्याने मुस्लिम व्यापाऱ्यांना करता येणार मढी यात्रे दरम्यान व्यवसाय...
मात्र आता या बाबत मढी ग्रामस्थ काय भूमिका घेणार या कडे लागले सर्वांचे लक्ष.
उदयसिंह पाटील हे माजी मंत्री काँग्रेस नेते कै. विलासराव पाटील उंडाळकर यांचे पुत्र
काँग्रेसला राम राम करून उंडाळकर करणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करताना भेटले बाळासाहेब पाटील यांनी भेट
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीबाबत चर्चा
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.