Political News: अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात विखे विरुद्ध लंके कार्यक्रमांची रेलचेल

Lok Sabha Election: महायुतीतील विद्यमान खासदार सुजय विखे पाटील आणि अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे पारनेर मतदारसंघाचे आमदार निलेश लंके हे दोघेही सध्या लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहेत.
Political News
Political NewsSaam TV
Published On

सुशील थोरात

Ahmednagar:

अहमदनगर जिल्ह्यातील महायुतीतील दोन शिलेदारांचे चांगलेच वाक युद्ध सुरू आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून कोण उभे राहणार याबाबत अध्यापही प्रश्नचिन्ह आहे. मात्र महायुतीतील विद्यमान खासदार सुजय विखे पाटील आणि अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे पारनेर मतदारसंघाचे आमदार निलेश लंके हे दोघेही सध्या लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहेत.

Political News
Ahmednagar Crime: मोटरसायकल चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला बेड्या; १० लाख रुपये किंमतीच्या दुचाकी जप्त

मात्र लंके हे कोणत्या पक्षाकडून उभे राहणार हे अद्याप स्पष्ट नसले तरी त्यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी गेल्या काही महिन्यांपासून सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर होणारे महानाट्य निलेश लंके यांच्या प्रतिष्ठानच्या वतीने अहमदनगर शहरात एक मार्च रोजी आयोजित करण्यात आले आहे.

तर महाराष्ट्र शासनाच्या वतीने कृषी महोत्सव आणि सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विखेंवर कडी करण्यासाठी आमदार निलेश लंके यांनी खासदार अमोल कोल्हे अभिनित छत्रपती संभाजी महाराज यांचे महानाट्य आणले, अशी चर्चा सध्या जोरात सुरू आहे.

मात्र आम्ही कोणतीही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे काम करत नसून जर कोणी सांस्कृतिक कार्यक्रम घेतले असतील तर ती ज्याची त्याची मर्जी असल्याचं खासदार सुजय विखे पाटील यांनी सांगितलं.

तर शासनाचा कार्यक्रम असला तरी हा माझा वैयक्तिक प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेला महानाट्याचा कार्यक्रम आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे विचार घराघरात पोहोचण्यासाठी या महानाट्याचे आयोजन केल्याचं आमदार निलेश लंके यांनी सांगितले आहे.

मात्र सध्या अहमदनगर दक्षिण जिल्ह्यात कार्यक्रमांची मोठी रेलचेल असून एकीकडे खासदार सुजय विखे पाटील तर दुसरीकडे आमदार निलेश लंके हे दोघेही विविध ठिकाणी कार्यक्रम राबवत आहेत. त्यामुळे अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत विखे विरुद्ध लंके असेच लढत होण्याची चिन्हे असल्याची चर्चा सध्या अहमदनगर जिल्ह्यात सुरू आहे. ऐन वेळेस निलेश लंके हे माहविकास आघाडीकडून निवडणूक लढू शकतात असेही काही जाणकारांचे मत आहे.

Political News
Pune Crime News: आधी अत्याचार मग जेल, जामिनावर बाहेर आल्यावर आरोपीचं पीडितेसोबत भयंकर कृत्य

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com