Rohit Pawar News: पडळकर सरकारवर दबाव आणू शकत नाही; रोहित पवार यांची टीका

Ahmednagar News : परळकर सरकारवर दबाव आणू शकत नाही; रोहित पवार यांची टीका
Rohit Pawar News
Rohit Pawar NewsSaam tv

सुशील थोरात

अहमदनगर : चॉकलेट बॉय गोपीचंद पडळकर यांची भूमिका नेहमी वेगवेगळी असते. सत्तेत असताना धनगर आरक्षणाचा प्रश्न यावर भूमिका वेगळे मांडतात आणि सत्तेत नसताना वेगळे मत मांडतात. त्यामुळे सध्या त्यांच्यावर धनगर आरक्षण (Gopichad Padalkar) प्रश्न समाजाचे मोठे प्रेशर आहे. मात्र ते प्रेशर सरकारवर काढता येत नसल्यामुळे ते खासदार शरद पवार आणि खासदार सुप्रियाताई सुळे (Supriya Sule) यांचे नाव घेतात; अशी टीका आमदार (Rohit Pawar) रोहित पवार यांनी केली. (Latest Marathi News)

Rohit Pawar News
Varangaon Crime News: पती- पत्नीचा वाद; दारूच्या नशेत पत्नीची हत्या, संशयित पती पोलिसांच्या ताब्यात

आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. यावर बोलताना कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे. 

Rohit Pawar News
Akola News : ५२ महसूल मंडळातील नुकसान; शेतकरी अजूनही अग्रीम विम्या पासुन वंचित

भाजपचे छोटे नेते जेव्हा एखाद्यावर टीका करतात; तेव्हा भाजपचे मोठे नेते शांत बसत असतात. यातून असा निष्कर्ष निघतो की भाजपच्या या छोट्या नेत्यांना वरिष्ठ नेत्यांचा पाठिंबा आहे. त्याच बरोबर आश्चर्य या गोष्टीचे वाटते, की शरद पवार व (Ahmednagar) सुप्रियाताई यांच्यासोबत भाजप बरोबर गेलेले अजित पवार यांच्यावरही चॉकलेट बॉय गोपीचंद पडळकर टीका करत असतात. अजित पवार यांच्याबरोबर गेलेले मोठमोठे नेते शरद पवार यांच्या विरोधात मोठमोठी भाषणे करतात. मात्र आता तेही गप्प बसलेत, याचे आश्चर्य वाटतं आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com