Ahmednagar News : धक्कादायक.. बेड नसल्याने शस्त्रक्रियेनंतर अनेक महिलांना जमिनीवर झोपण्याची वेळ

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात आरोग्य विभागा अंतर्गत कुटुंब कल्याण नियोजन शस्त्रक्रिया शिबिर भरविण्यात आले होते.
Ahmednagar News
Ahmednagar NewsSaam tv

सचिन बनसोडे 

नेवासा (अहमदनगर) : अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात आरोग्य विभागा अंतर्गत कुटुंब कल्याण नियोजन शस्त्रक्रिया शिबिर भरविण्यात आले होते. (Ahmednagar) मात्र रुग्णांची कुठल्याही प्रकारची सोय नसताना तसेच पुरेसे बेड उपलब्ध नसताना देखील आरोग्य यंत्रणेने फक्त त्यांच्या केसेस टार्गेट साठी दीडशे हून अधिक ऑपरेशन केल्याची उघड झाले आहे. धक्कादायक म्हणजे शस्त्रक्रिया झाल्यानंतर महिलांना चक्क जमिनीवर झोपण्याची वेळ आली. (Live Marathi News)

Ahmednagar News
Pimpri Chinchwad : चिमुकल्यासह आईची अकराव्या मजल्यावरून उडी; पिंपरी चिंचवडमधील दुर्दैवी घटना

प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या कार्यक्षेत्रातील गोरगरीब महिला रुग्णांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर (Nevasa) नेवासा तालुक्यातील वडाळा येथील FJFM या हॉस्पिटलमध्ये घेण्यात आले. अहमदनगरच्या नेवासा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश शेटे यांनी हा सगळा प्रकार चव्हाट्यावर आणला असून काल मध्यरात्री झालेला प्रकार समोर आणला. एकीकडे पाऊस, त्यात लाईट गेलेली आणि अपुरी बेड व्यवस्था यामुळे (Health Department) अनेक महिलांना शस्त्रक्रियेनंतर जमिनीवर झोपण्याची वेळ आल्याचं यातून समोर आले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ahmednagar News
Lightning Strike : विज पडल्याने गोठा जळून खाक; २ जनावरांचा मृत्यू, ६ लाखांहुन अधिक नुकसान

वास्तविक पाहता रुग्णांना पूर्ण सुविधा, बेड तसेच लाईट आणि पाणी सुविधा असेल तरच ऍडमिट करण्यात येते. परंतु शिबीर घेण्यात आलेल्या या हॉस्पिटल येथे अपुरी सुविधा असून देखील हे हॉस्पिटलच का निवडले गेले? असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान याबाबत हॉस्पिटल व्यवस्थापन बरोबर संपर्क साधला असता त्यांची आज प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. परंतु या सर्व प्रकारामुळे आरोग्य विभागाचे धिंडवडे समोर आल्याचे पाहण्यास मिळत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com