Ahmednagar News: नटून थटून आला, मात्र बोहल्यावर चढण्याआगोदरच नवरदेव जेलमध्ये; नेमकी भानगड काय?

लग्न घटिका समीप आली होती मात्र अचानक त्याठिकाणी पोलिसांची एन्ट्री झाली आणि नवरदेव बोहल्यावर चढण्याऐवजी थेट जेलमध्ये गेला
Ahmednagar News
Ahmednagar NewsSaam Tv
Published On

सचिन बनसोडे

Ahmednagar News Today: अहमदनगर जिल्ह्यात एक विवाह सोहळा अगदी रंगात आला होता. दोन्ही बाजूकडील नातेवाईकांच्या गर्दीने मंगलकार्यालय खचाखच भरले होते. लग्न घटिका समीप आली होती मात्र अचानक त्याठिकाणी पोलिसांची एन्ट्री झाली आणि नवरदेव बोहल्यावर चढण्याऐवजी थेट जेलमध्ये गेला.  (Latest Marathi News)

Ahmednagar News
Aditya Thackeray Nagpur Visit: कोराडी वीज प्रकल्प आंदोलनात आदित्य ठाकरे यांची उडी; आज नागपूर दौऱ्यावर

नेमकं प्रकरण काय?

अहमदनगरच्या राहाता येथील एका मुलीचा विवाह नाशिक (Nashik) शहरात राहणाऱ्या पंकज याच्याशी ठरला होता. २१ मे रोजी राहाता येथील मंगलकार्यालयात या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. लग्न (Marriage) घटिका समीप आल्याने दोन्ही बाजूकडील नातेवाई आणि मित्र परिवाराचा उत्साह शिगेला होता.

नवरदेव पंकज वाजतगाजत विवाहस्थळी पोहचला मात्र तो बोहल्यावर चढण्याआगोदरच त्याची प्रियसी राहाता पोलिसांसह विवाहस्थळी पोहचली. पंकज याने लग्नाचे आमिष दाखवून चार वर्षांत वारंवार शरीरसंबंध ठेवून फसवणूक केल्याचे तीने सांगताच विवाहस्थळी एकच खळबळ उडाली.

पंकजचे कारनामे ऐकून नवरीसह तीच्या घरच्यांचा पारा चांगलाच चढला आणि नवरीने तात्काळ विवाहास नकार देत हा विवाह रद्द केला. राहाता पोलिसांनी पंकज याला ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने तरुणीशी संबंध असल्याची कबुली दिली. तक्रारीपूर्वी कलवरे, कलवऱ्या यांच्या गराड्यात असणारा नवरदेव पोलीस (Police) स्टेशनला मात्र एकटाच दिसत होता.

Ahmednagar News
MNS News: कोकणवासीयांच्या गणेशोत्सव प्रवासावर दलालांचा डल्ला; मनसे आमदारांची रेल्वे राज्यमंत्र्यांकडे धाव

पंकज याने लग्नाचे आमिष दाखवून चार वर्षांत अनेकदा अत्याचार केल्याचा दावा पिडीत तरुणीने केला आहे. त्यामुळे पिडीतेच्या फिर्यादीवरून पंकज याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा आता नाशिकरोड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून पंकज याला देखील नाशिकरोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. (Ahmednagar News)

पंकजने आगोदर प्रियसीला लग्नाचे आमिष दाखवून चार वर्षे तीची फसवणूक केली. तर राहाता पोलीस वेळीच विवाहस्थळी पोहचल्याने दुसरी मुलगी फसवणूक होण्यापूर्वी वाचली आणि बोहल्यावर चढण्याआधीच पंकजवर जेलमध्ये जाण्याची वेळ आली. त्यामुळे प्रेमसंबंध किंवा शुभमंगल जुळवताना सावधानराहा अन्यथा असे ठगसेन तुमचीही फसवणूक करू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com