Aditya Thackeray News Today: कोराडी येथे प्रस्तावित ६६० मेगावॅटच्या दोन वीज युनिटच्या विरोधात स्थानिक नागरिक व पर्यावरणवाद्यांनी दंड थोपटले आहे. आता या वादात माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही उडी घेतली आहे. आज (२२ मे) आदित्य ठाकरे हे नागपूर दौऱ्यावर असणार आहेत. त्यांचे शहरात आगमन होताच युवासेनेतर्फे त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. काही वेळाने ते हॉटेल रॅडिसन ब्लूला रवाना होतील. (Latest Marathi News)
हॉटेलमध्ये पर्यावरणप्रेमींशी चर्चा करणार आहे. त्यानंतर कोराडी परिसरातील नांदगाव, वराडा येथील गावाला भेट देखील ते भेट देणार असून गावकरी व शेतकऱ्यांशी (Farmer) संवाद साधणार आहे. दरम्यान, अजनीतील वृक्षतोडीच्या प्रश्नावरही ते पर्यावरणप्रेमींशी चर्चा करणार आहेत.
यापूर्वी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी कोराडी आणि खापरखेडा वीज प्रकल्पाला दोन वेळा भेट देऊन केली पाहणी होती. वीज प्रकल्पातून निघणाऱ्या राखेमुळे होत असलेली पर्यावरनाची हाणी लक्षात घेता राख बंधारे बंद करण्याचे निर्देश दिले होते. तसेच या प्रकरणाचा शेवटपर्यंत त्यांनी आढावा घेतला. त्यानंतर राज्यात सत्तापालट झाले. आता पुन्हा एकदा कोराडी येथे नवीन वीज युनिटवरुन आंदोलन सुरू झाले आहे. (Nagpur News)
या आंदोलनात मोठ्या प्रमाणात शेतकरी, गावकऱ्यांसोबतच लगतच्या वसाहतीतील नागरिक सहभागी झाले आहेत. या वीज प्रकल्पासाठी होणाऱ्या जनसुनावणीला देखील आदित्य ठाकरे यांनी विरोध केला आहे. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरे अजनीवनचे पर्यावरणवादी आणि या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व लोकांची ते भेट घेऊन त्यांच्यासोबत संवाद साधणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांच्या या नागपूर दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
भावी मुख्यमंत्री म्हणून लागले होर्डिंग्ज
आदित्य ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर आहे. मात्र त्याआधीच नागपुरात (Nagpur) रामटेक मनसर परिसरात आदित्य ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून ठिकठिकाणी होर्डिंग्ज लागले आहेत. युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी हे होर्डिंग्ज लावल्याची माहिती समोर आली आहे. या होर्डिंग्जवर आदित्य ठाकरे यांची भावी मुख्यमंत्री म्हणून उल्केख करण्यात आला आहे त्यामुळे या होर्डिंगची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.