Ahmednagar News : SDRF च्या शहीद जवानांना शासकीय मानवंदना; प्रवरा नदीतील थरारक Video ही आला समोर

SDRF Team Boat Capsized : प्रवरा नदीत बुडालेल्या तरुणांचा शोध घेण्यासाठी गेलेल्या SDRF च्या पथकाची बोट उलटून तीन जवान शहीद झाले आहेत. त्यांना आज शासकीय मानवंदना देण्यात आली.
Ahmednagar News
Ahmednagar News Saam Digital

अहमदनगरमधील प्रवरा नदीत बुडालेल्या तरुणांचा शोध घेण्यासाठी आलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) पथकाची बोट उलटली होती. या दुर्घटनेत एसडीआरएफच्या ३ जवानांचा बुडून मृत्यू झाला आहे. या शहीद जवानांना आज पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत मानवंदना देण्यात आली. दरम्यान या घटनेचा थरारक व्हिडिओही समोर आला आहे.

अकोले तालुक्यातील सुगाव येथे प्रवरा नदीत बचावकार्य करताना SDRF चे तीन जवान शहीद झाले होते. पार्थिव धुळ्याकडे रवाना करण्यापूर्वी सुगाव येथे शासकीय मानवंदना देण्यात आली. नगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक बि.जे. शेखर, पोलीस अधीक्षक राकेश ओला उपस्थित होते.

घटना अत्यंत वेदनादायी-राधाकृष्ण विखे पाटील

मृत्युमुखी पडलेल्या तीन नागरिकांच्या कुटुंबांना प्रत्येकी 10 लाख रुपये मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. शहीद जवानांच्या बाबतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिक सहानुभूतीपूर्वक विचार करवा. मयतांच्या दुःखामध्ये राज्यशासन सहभागी असल्याचं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

Ahmednagar News
Dombivli MIDC Fire: डोंबिवलीतील धोकादायक केमिकल कंपन्या 4 जूननंतर शिफ्ट करणार; दुर्घटनेनंतर उदय सामंत यांची माहिती

दरम्यान SDRF च्या पथकाकडून प्रवरा नदीपात्रात सुरू असलेले बचावकार्य सायंकाळी थांबवण्यात आल. नदीत बुडालेले दोन नागरिक अद्यापही बेपत्ता आहेत. निळवंडे धरणातून प्रवरा नदी पात्रात सोडण्यात आलेल्या पाण्याचा प्रवाह कमी केला जात आहे. उद्या सकाळी TDRF च्या पथकाकडून पुढील शोधमोहीम सुरू करण्यात येईल.

Ahmednagar News
Dombivli MIDC Fire Update: डोंबिवली MIDC आगीत ६ जणांचा मृत्यू, ३४ जखमींवर उपचार सुरू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com