Jamkhed News : आम्ही साहेबांसोबत..धनंजय मुंडेंच्या ताफ्यासमोर झळकले कार्यकर्त्यांचे बॅनर

आम्ही साहेबांसोबत..धनंजय मुंडेंच्या ताफ्यासमोर झळकले कार्यकर्त्यांचे बॅनर
Ahmednagar NCP News
Ahmednagar NCP NewsSaam tv
Published On

सुशील थोरात

जामखेड (अहमदनगर) : मंत्री धनंजय मुंडे यांचा ताफा अहमदनगर मार्गे बीडकडे जात होता. या दरम्‍यान जामखेड शहरात काही कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या ताफ्यासमोर आम्ही साहेबांसोबत (Ahmednagar) अशा आशयाचे बॅनर झळकवले. मात्र पोलिसांनी वेळीच या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन बॅनर जप्त केले आहेत. (Breaking Marathi News)

Ahmednagar NCP News
Cotton Price : दहा महिने सांभाळलेल्या कापसाची सात हजारांत विक्री; कापसाच्या भाववाढीची प्रतिक्षाच

राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अनेक कार्यकर्ते सध्या रोज अजित पवार आणि शरद पवार यांच्यासोबत असल्याबाबतचे फोटो झळकवत आहेत. आताही राष्ट्रवादीमधील दुफळी वाढत चालली असून आज राष्ट्रवादीच्याच (NCP) कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोर हे बॅनर झळकवल्याने ही दुफळी समोर येत आहे.

Ahmednagar NCP News
Police Vehicle Accident : पोलिसांच्‍या वाहनाला अपघात; नियंत्रण सुटल्‍याने वाहन थेट शेतात उलटले, पोलीस निरीक्षकांसह दोन कर्मचारी जखमी

पोलिसांसोबत बाचाबाची

मंत्री मुंडे यांचा ताफा जात असल्‍याने (NCP) राष्‍ट्रवादीचे काही कार्यकर्ते बॅनर घेवून उभे होते. पोलिसांनी या बॅनर झळकवणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांची बाचाबाची देखील झाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com