CCTV Footage : बापरे! शेतकरी झोपलेल्या पलंगाखाली शिरला बिबट्या; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Ahmednagar : आबासाहेब पटारे यांच्या गाईच्या गोठ्यात ते एका पलंगावर झोपले होते. पहाटेच्या सुमारास एक बिबट्या गोठ्यात शिरला. त्यानंतर तो थेट पटारे ज्या पलंगावर झोपले होते त्या खाली जाऊन बसला.
CCTV Footage
CCTV FootageSaam TV

Ahmednagar Leopard Attack :

अहमदनगरमध्ये बिबट्याच्या मुक्त संचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. जंगल कमी झाल्याने बिबटे मानवी वस्तीत शिरत आहेत. मानवी वस्तीतील बिबट्यांचा वावर वाढल्याने गावकऱ्यांना रात्री तसेच पहाटेच्यावेळी घराबाहेर पडणं कठीण झालं आहे. अशात श्रीरामपूर गावात एक बिबट्या थेट एका व्यक्तीच्या पलंगाखाली शिरला. या घटनेचा थरार समोर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

CCTV Footage
Leopard : बिबट्याची टोळी दोन तास घराच्या बाहेर दबा धरून; दहशतीचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात

अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर तालुक्यातील वडाळामहादेव येथे ही घटना घडली आहे. आबासाहेब पटारे यांच्या गाईच्या गोठ्यात ते एका पलंगावर झोपले होते. पहाटेच्या सुमारास एक बिबट्या गोठ्यात शिरला. त्यानंतर तो थेट पटारे ज्या पलंगावर झोपले होते त्या खाली जाऊन बसला.

या गोठ्यात कुत्रे आणि गायी होत्या त्यांनी बिबट्याला पाहताच मोठ्याने ओरडण्यास सुरूवात केली. या सर्व आवाजाने बिबट्या घाबरला आणि त्याने थेट तेथून धूम ठोकली. या सर्व आवाजाने पटारे देखील जागे झाले. त्यांनी उठून पाहिलं तेव्हा बिबट्या तेथून पळून जाताना दिसला. गोठ्यातील गाई आणि कुत्र्यांमुळे आज पटारे यांचा जीव वाचला आहे. अन्यथा बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला असता.

सदर घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता गावात सर्वत्र व्हायरल होत आहेत. पटारे कुटुंबीय आणि गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. २ दिवसांपूर्वी पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील शिंगवे कासारमशा येथे डाळिंबाच्या बागेत बिबट्याचा बछडा जखमी अवस्थेत आढळुन आला होता.

हा बिबट्या जखमी अवस्थेत पडलेला होता. यावेळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने वनविभागाची टिम घटनास्थळी दाखल होऊन बछड्याला तात्काळ प्राथमिक उपचारासाठी बिबट निवारा केंद्रात दाखल करण्यात आले. उपचारानंतर बछड्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांनी दिली होती.

CCTV Footage
Satara Leopard News : अखेर बिबट्या मादी अन् बछड्यांची झाली भेट, घटना कॅमेऱ्यात कैद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com