Ahmednagar Rain Update: नगरला मुसळधार पावासाने झोडपले; शहरातील रस्त्यांना ओढ्याचं स्वरूप, पुलाखाली कमरे इतकं पाणी

Ahmednagar Rain Update: नगरमध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे आपत्ती व्यवस्थापनाचा बोजवारा उडाल्याचे दिसत आहे. रस्त्यांनाही ओढ्याचं स्वरुप आल्याने नागरिक पाण्यातून मार्ग काढताना दिसत आहे
Ahmednagar Rain Update:
Ahmednagar Rain Update: Saam tv

सुशील थोरात

Ahmednagar Rain Update:

राज्यातील विविध भागांना मुसळधार पावसाने झोडपले आहे. नगरमध्येही गेल्या चार तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळं शहरातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक घरांत आणि गणेश मंडळांच्या मंडापात पाणी शिरलं आहे. नगरमध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे आपत्ती व्यवस्थापनाचा बोजवारा उडाल्याचे दिसत आहे. रस्त्यांनाही ओढ्याचं स्वरुप झाल्याने नागरिक पाण्यातून मार्ग काढताना दिसत आहे. (Latest Marathi News)

पुणे वेधशाळेने राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. वेधशाळेने मुंबई, पुण्यासह नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव, सातारा, सोलापूर, लातूर, बीड, परभणी, ठाणे या जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार राज्यातील अनेक भागात कोसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे नगर शहर जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Ahmednagar Rain Update:
Nagpur Rain Update News : नागपुरात जनजीवन विस्कळीत! लष्कराच्या दोन तुकड्यांकडून बचावकार्य सुरु

अहमदनगर शहरात गेल्या चार तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे नगर शहरातील सर्व रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले आहे. पावसामुळे अनेक दुकाने आणि घरांमध्ये पाणी शिरले आहे.

तसेच काही ठिकाणी वाहने वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाचा बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे गणेश मंडळाचे मंडप पाण्यात बुडाले आहेत. तर उड्डाणपुलाखाली कमरे इतके पाणी साचल्यामुळे चारचाकी आणि दुचाकी वाहनांचा मोठा खोळंबा झाला आहे.

Ahmednagar Rain Update:
Maharashtra Rain Update: राज्यासाठी पुढील ४ तास महत्त्वाचे; मुंबई-पुण्यासह या जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळणार, जाणून घ्या सर्व अपडेट

दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर नंदुरबार शहर आणि परिसरात दमदार पावसाची हजेरी

नंदुरबार शहर आणि परिसरात दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. आज शहरातून पहिल्या टप्प्यातील गणेश विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या आहेत.

या गणेश विसर्जन मिरवणुकीच्या वेळेस दमदार पाऊस सुरू आहे. यामुळे गणेश भक्त पावसातच पारंपारिक वाद्याच्या तालावर नाचत गणरायाला निरोप देत आहे.

पावसामुळे गणेश विसर्जन मिरवणुकींमध्ये उत्साह दिसून येत आहे. दमदार पावसामुळे ग्रामीण भागातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

Ahmednagar Rain Update:
Navi Mumbai News: धक्कादायक! नवी मुंबईत बॅगेत नवजात चिमुकली ठेवून युवक फरार, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com