Navi Mumbai News: धक्कादायक! नवी मुंबईत बॅगेत नवजात चिमुकली ठेवून युवक फरार, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

Navi Mumbai: नवी मुंबईच्या घणसोलीतील रुग्णालयाजवळील वन लाइट फिटनेसच्या बाजूला एका युवकाने नवजात बाळाला बॅगेत ठेवून फरार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Navi Mumbai
Navi MumbaiSaam tv

सिद्धेश म्हात्रे

Navi Mumbai News

नवी मुंबईत धक्कादायक घटना समोर आली आहे. नवी मुंबईच्या घणसोलीतील रुग्णालयाजवळील वन लाइट फिटनेसच्या बाजूला एका युवकाने नवजात बाळाला बॅगेत ठेवून फरार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईच्या घणसोलीतील सेक्टर-३ येथील लक्ष्मी रुग्णालयाजवळ वन लाइट फिटनेसच्या बाजूला एक युवक बॅगेत नवजात चिमुकलीला ठेवून फरार झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

या बॅगेतून लहान बाळाच्या रडण्याचा आवाज नागरिकांना येऊ लागल्याने तेथील नागरिक जमा आले. त्यानंतर नागरिकांना त्या बॅगेत एक पाच दिवसांची नवजात चिमुकली सापडली. त्यानंतर नागरिाकांनी तात्काळ पोलिसांना बोलावले.

Navi Mumbai
Nanded Crime News : पाणीपुरी नव्हे ताे निघाला गावठी कट्टा विक्रेता, मध्यप्रदेशाच्या युवकास अटक

पोलिसांनी या नवजात चिमुकलीला तातडीने रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर चिमुकलीला नेरूळमधील विश्व बालक केंद्रामध्ये पाठवले.

याप्रकरणी अज्ञात युवकाविरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

व्हिडिओ दिसत आहे की, लक्ष्मी रुग्णालयाजवळ वन लाइट फिटनेसच्या बाजूला एक अनोळखी युवक बॅग घेऊन आला. त्यानंतर या युवकाने बॅगेत पाच दिवसांचे नवजात बाळ ठेवले. या युवकाने चेहरा झाकण्यासाठी तोंडाला रुमाल बांधला होता.

बॅग ठेवल्यानंतर घटनास्थळावरून हा युवक फरार झाला. ही घटना सीसीसटीव्हीत कैद झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी या व्यक्तीविरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या युवकाचा अधिक तपास करत आहेत.

Navi Mumbai
Rohit Pawar News: 'रोहित पवारांना पहिलं तिकीट ब्लॅकमेलिंग करून मिळालं', भाजप आमदार राम शिंदेंचा दावा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com