Ahmednagar Crime News
Ahmednagar Crime NewsSaam tv

Ahmednagar Crime: कोपरगावमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्रीत तब्बल ७ दुकाने फोडली; व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण

Kopargaon Robbery: याबाबत एकाच दुकानदाराने तक्रार दाखल केली असून इतर दुकानांतील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात चोरीची घटना कैद झाली आहे.
Published on

सचिन बनसोडे, प्रतिनिधी...

Ahmednagar Crime: कोपरगाव शहरात एकाच रात्रीत तब्बल सात दुकाने फोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये चोरांनी ५८ हजार रुपये रोख रक्कम आणि इतर साहित्य चोरून नेले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. (Crime News In Marathi)

Ahmednagar Crime News
Forest Guard Recruitment Scam: राज्यात आणखी एका परीक्षेतील घोटाळा उघड; छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी केला पर्दाफाश

याबाबत अधिक माहिती अशी की, कोपरगावमध्ये (Kopargaon) चोरट्यांनी एकाच रात्रीत सात दुकाने फोडल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील येवला रोडवर असलेल्या साखरे बिल्डिंग मटेरियल या दुकानाच्या मागील बाजूस असलेला पत्रा कापून चोरट्यांनी आत प्रवेश केला..

त्यानंतर दुकानातील सामान विस्कटून काउंटरच्या ड्राव्हरमध्ये ठेवलेले ५८ हजार रुपये रोख आणि एक पेन ड्राईव्ह चोरट्यांनी चोरून नेला आहे. चोरट्यांनी आसपासच्या एकूण सात दुकाने फोडली आहेत.

Ahmednagar Crime News
Pandharpur News : दाेन हजार रुपयांत विठ्ठलाचे झटपट दर्शन? भाविकांसह एजंट चाैकशीच्या फे-यात

मात्र याबाबत एकाच दुकानदाराने तक्रार दाखल केली असून इतर दुकानांतील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात चोरीची घटना कैद झाली आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात भा द वि कलम 457, 380 प्रमाणे अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com