Kolhapur Crime: कामाच्या ठिकाणी वाद झाल्याचा राग; निष्पाप चिमुकलीसोबत केल भयंकर कृत्य, कोल्हापूर हादरलं!

Kolhapur Crime News: 3 दिवसांपूर्वी कामाच्या ठिकाणी झालेल्या वादाचा राग मनात घेवून ही भयंकर हत्या केल्याचे समोर आले आहे...
Ahmednagar Crime
Ahmednagar CrimeSaamtv
Published On

रणजित माजगावकर, प्रतिनिधी...

Kolhapur Crime: कोल्हापूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरात एका अडीच वर्षाच्या बालिकेचं अपहरण करून सिमेंटच्या टाकीत टाकून निर्घृण हत्या केल्याची भयंकर घटना उघडकीस आली आहे. या भयंकर घटनेने परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी फिरस्ता राजू विश्वास मंडल उर्फ राजू बिहारी याला अटक केलेली आहे.

Ahmednagar Crime
Notebandi Effect On Shirdi Temple: नोटबंदीचा साई संस्थानावर परिणाम नाही! दानात 2000 रुपयांच्या नोटांचं प्रमाण अत्यल्प

कामाच्या ठिकाणी वाद झाल्याचा राग मनात धरुन अवघ्या अडीच वर्षाच्या चिमुकलीचा जीव घेतल्याची संतापजनक घटना कोल्हापूर (Kolhapur) शहरात घडली आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदनगर येथील दांपत्य गणेश गटे आणि त्यांची पत्नी पूजाघटे हे कोल्हापूर परिसरात वीट भट्टीवर काम करण्यासाठी आलेले आहेत.

हे दांम्पत्य काही कामा निमित्ताने भवानी मंडप परिसरात आले होते. यावेळी त्यांची लहान मुलगी कार्तिकी अचानक हरवली. पोलिसांना या बाबत कळवताच पोलिसांनी या परिसरातला सीसीटीव्ही फुटेज चेक केला. (Latest Marathi News)

Ahmednagar Crime
Gautami Patil News: भावांनो! गौतमीच्या 'कातील अदा' आता परवडणार नाहीत; वाढत्या गर्दीमुळे मोठा निर्णय, आयोजकांना फटका?

ज्यामध्ये राजू बिहारी हा युवक कार्तिकीला घेऊन जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी (Police) राजू बिहारीला शोधून काढून त्याच्याकडे चौकशी सुरू केली. यामध्ये त्याने हत्या केल्याची कबुली दिली. 3 दिवसांपूर्वी राजू बिहारी आणि गणेश गटे पूजाघटे यांच्याशी कामाच्या ठिकाणी वाद झाला होता.

या वादाचा राग मनात धरून त्याने कार्तिकीला भवानी मंडपातून पळून नेले. रंकाळा समोरील एका मॉल च्या मागील बाजूस असणाऱ्या आरसीसी पाण्याच्या टाकीत बालिकेला टाकून तिचा खून केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. या भयंकर घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. (Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com