Sandeep Pandurang : जिथे शिक्षणाचे धडे घेतले, वडिलांचं बोट धरुन शाळेत गेले; त्याच पटांगणावर अहिल्यानगरच्या सुपुत्रावर अंत्यसंस्कार होणार

Ahilyanagar Martyred Soldier Sandeep Pandurang : संदीप यांच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबियांवर मोठ संकट कोसळलं आहे. आपल्या घरातील एकुलता एक मुलगा निघून गेला याचा दुःख कुटुंबाला झालं आहे.
Akole taluka Martyred soldier Sandeep Pandurang
Akole taluka Martyred soldier Sandeep PandurangSaam Tv News
Published On

अहिल्यानगर : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय सैन्य दलातील अहिल्यानगरमधील संदिप पांडुरंग गायकर या जवानाला वीरमरण आलं आहे. संदिप गायकर हे अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा गावचे भूमिपुत्र होतं. या घटनेनं ब्राम्हणवाडा गावासह जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. या घटनेमुळं ब्राम्हणवाडा गाव आज आणि उद्या पूर्णतः बंद ठेवण्यात आलं आहे. गावातील ज्या सह्याद्री विद्यालयात संदिप यांनी शिक्षण घेतलं त्याच विद्यालयाच्या पटांगणात उद्या त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. ब्राह्मणवाडा गावाजवळ असणाऱ्या आनंददरा या वाडीवर संदीप यांचं वास्तव्य होतं.

दरम्यान, संदीप यांच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबियांवर मोठ संकट कोसळलं आहे. आपल्या घरातील एकुलता एक मुलगा निघून गेला याचा दुःख कुटुंबाला झालं आहे. दीड वर्षाचा मुलगा मागे ठेवून पत्नी व आई-वडील असा परिवार असताना संदीप यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलं आहे. संदिप यांच्या मृत्यूने गावकरी शोकसागरात बुडाले असले तरी गावचा भूमिपुत्र देशासाठी शहीद झाला याचा अभिमान असल्याच्या भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत. प्रसार माध्यमांशी ग्रामस्थ आणि त्यांच्या मित्रांनी अनेक आठवणींना उजाळा दिला.

Akole taluka Martyred soldier Sandeep Pandurang
Vaishnavi Hagawane Death : हगवणे पिता-पुत्राच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेषही नाही, पत्रकाराच्या प्रश्नावर नकारार्थी मान हलवली

संदीप गायकर हे अत्यंत शिस्तबद्ध, कर्तव्यनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी सैनिक होते. सैन्यात त्यांनी आपल्या निष्ठेनं, प्रामाणिकपणे आणि धैर्यानं सेवा बजावली. देशाच्या सुरक्षेसाठी उभ्या असताना त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि मुलगी आहे. त्यांच्या वीरमरणाची बातमी पोहोचताच गावात शोककळा पसरली आहे. उद्या ब्राम्हणवाडा गावात संदीप गायकर यांच्या पार्थिवावर अंतिमसंस्कार होणार आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये सेवा बजावत असताना अहिल्यानगरचे सुपुत्र जवान संदीप गायकर शहीद झाले आहेत. काल म्हणजेच २१ मे रोजी रात्री दहशतवाद्यांच्या विरोधात लढा देताना त्यांनी प्राणाची आहुती दिली. संदीप गायकर हे सैन्यदलाच्या मराठा बटालियनमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये सेवा बजावत होते. देशाची सेवा करताना त्यांनी सर्वोच्च बलिदान दिलं.

Akole taluka Martyred soldier Sandeep Pandurang
Vaishnavi Hagawane Son: वैष्णवीच्या मृत्यूनंतर तान्ह्या बाळावरही अत्याचार? झोपेचं इंजेक्शन अन्..; कस्पटे कुटुंबाचा गंभीर आरोप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com