मराठा आरक्षणाबाबत सत्तारांचं उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन; म्हणाले, मुख्यमंंत्री ४ दिवसांत...

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी मराठा आरक्षणाबाबतचं लेखी आश्वासन उपोषणकर्त्यांना दिलं.
Maratha reservation Abdul Sattar
Maratha reservation Abdul SattarSaam TV

जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालना (Jalna) जिल्ह्यातील भांबेरी गावच्या ग्रामस्थांनी गेल्या ८ दिवसांपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्हांला आरक्षण द्या, आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण स्थगित करणार नाही, असा इशाराही भांबेरी गावच्या ग्रामस्थांनी दिलाय. दरम्यान, राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी आज भांबेरी गावातील उपोषणाला बसलेल्या गावकऱ्यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी मराठा आरक्षणाबाबतचं लेखी आश्वासन उपोषणकर्त्यांना दिलं. (Abdul Sattar Latest News)

Maratha reservation Abdul Sattar
विनायक मेटेंसोबत घातपात झाला असेल तर..., चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी भांबेरी गावातील गावकरी उपोषणाला बसले आहेत. त्यातच उपोषणकर्त्या तिघांची प्रकृती खराब झाल्याने त्यांच्यावर अंबड येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले . त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार,आमदार नारायण कुचे आणि माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी भांबेरी गावात जाऊन उपोषणकर्त्या गावकऱ्यांची भेट घेतली.

मराठा समाजाच्या मागण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचं लेखी आश्वासन दिलं. तसेच चार दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणाच्या मागण्या बाबद बैठक बोलावतील. असं आश्वासन उपोषणकर्त्या गावकऱ्यांना कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलं. तसेच आपण उपोषण मागे घ्यावं अशी विनंती सुद्धा त्यांनी गावकऱ्यांना केली. (Maratha Reservation Todays News)

Maratha reservation Abdul Sattar
Chandrakant Patil : महसूल खातं न मिळाल्यानं नाराज आहात का? चंद्रकांत पाटील स्पष्टच बोलले

मात्र जोपर्यंत मराठा समाजाच्या मागण्याबाबद ठोस पाऊले उचलल्या जात नाही आणि मराठा समाजातील तरुणाच्या भविष्यासाठी आरक्षण जाहीर केल्या जात नाही. तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा निराधार ग्रामस्थांनी केलाय. त्यामुळे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव दिनीही मराठा समाजाच्या वतीने आठव्या दिवशीही हे आमरण उपोषण सुरूच आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com