कोल्हापूर : राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पहिला टप्प्यात मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या 18 मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले. मंत्रिपदावरून शिंदे गटामध्ये नाराजी असताना भाजपमध्येही मोठे बदल झाले. भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याकडे असलेले महसूल खाते हे राधाकृष्ण विखे पाटील यांना देण्यात आले. (Chandrakant Patil Latest News)
दरम्यान, खातेवाटपावरून नाराज आहात का? असा प्रश्न चंद्रकांत पाटलांना पत्रकारांनी विचारला. यावर आता नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस हे समर्थ आहे, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनीपुढे बोलण्याचं टाळलं. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी कोल्हापुरात चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत बोलत असताना खातेवाटपबाबत प्रतिक्रिया दिली. (Chandrakant Patil Todays News)
काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
खातेवाटपाबाबत प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'आमच्या सरकारमध्ये कुणीही खातेवाटपावर नाराज नाही. नाराजी संपवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस समर्थ आहे कोणीही काळजी करू नये. मला दिलेलं खातं हे अतिशय उत्तम खातं आहे, कोणतंही खातं छोटं नसतं. एक नंबर दोन नंबर नसतं. संघटना काम पाहत असते त्यानुसार जबाबदारी मिळत जाते, ती पार पाडावी लागते' असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.
सामनातून केलेल्या टीकेला दिलं उत्तर
सामनातून केलेल्या टीकेला उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'सामना हे दैनिक शिवसेनेचं मुखपत्र आहे. उद्धव ठाकरे हे आता विरोधी गटात आहे, त्यामुळे त्यांना टीका करण्याचा अधिकार आहे. 2014 ते 2019 युतीच्या काळातही सामना टीका करत होता आता तर विरोधक झालाय विरोधकांनी टीका करायची असते. चांगल्याला चांगलं म्हणायचं असतं पण तसे काही होत नाही, असा पलटवार पाटील यांनी केला.
'मी बऱ्याला बरं म्हणणारा माणूस'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाविषयी प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन शैक्षणिक धोरण आणलं आहे. त्याच्या अंमलबजावणीत करण्यासाठी शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण महत्त्वाचं आहे. देशाला चांगले इंजिनियर तयार करावे लागतील. उद्या दुपारी एक वाजता आता माझ्या विभागाची सेक्रेटरी यांची बैठक होईल. आधीच्या सरकारने काय चुकीचं केलं बर केलंय हे पाहणारा आहे. मी बऱ्याला बरं म्हणणारा माणूस आहे', असंही पाटील म्हणाले.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.