रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात युवासेना आक्रमक, केले अनोखे आंदोलन

शहरातील सर्व सिमेंट काँक्रीटीचे रस्ते गेल्या दोन वर्षांपासून अर्धवट स्थितीत असल्याने आज युवासेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागात अनोखे आंदोलन करण्यात आले.
रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात युवासेना आक्रमक, केले अनोखे आंदोलन
रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात युवासेना आक्रमक, केले अनोखे आंदोलनअरुण जोशी
Published On

अमरावती : शहरात गेल्या दोन वर्षांपासून विकास कामाच्या नावावर शासनाचे करोडो रुपये खर्च करून सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्याचे कामे सुरु आहे. तसेच शहराबाहेरील जाणाऱ्या बायपास एम. आय. डी. सी मार्गाचे नव्याने डांबरीकरणाचे काम सुरु आहे. परंतु अमरावती शहरातील सर्व सिमेंट काँक्रीटीचे रस्ते गेल्या दोन वर्षांपासून अर्धवट स्थितीत असल्याने आज युवासेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागात अनोखे आंदोलन करण्यात आले. (Against the potholes on the road, the yuvasena done agitation in amravati)

हे देखील पहा -

शहरात सुरु असलेले काँक्रीटीकरण व अर्धवट असलेले रस्त्यांचे कामे ही त्वरित पूर्ण व्हावी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तसेच कंत्राटदारांना सद्बुद्धी प्राप्त होवो याकरीता चक्क बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता यांच्या कक्षातच आज शिवसैनिकांनी गणपती बाप्पाची स्थापना केली. 'डोल ताशे व विधिवत पूजा अर्चना करून प्रतीकात्मक स्वरूपाचे आंदोलन आज युवा सेनेचे जिल्हा प्रमुख राहुल माटोडे यांच्या नेतृत्वात कऱण्यात आले. बांधकाम विभागाच्या या सर्व मोनोपॉली कारभाराला अमरावतीकर नागरिक प्रचंड त्रस्त झाले असून त्यांच्या मनात सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात प्रचंड चीड निर्माण झाली आहे. अत्यंत गंभीर बाब म्हणजे अमरावती शहरात झालेले सर्व सिमेंट काँक्रीटीकरणचे रस्ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून प्रत्येक रस्त्याला भूकंप झाल्याप्रमाणे मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत.

यावरून संबंधीत कंत्राटदारांच्या कामाच्या दर्जाची प्रचिती होते आणि निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांकडे डोळेझाक करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता व कामावर लक्ष ठेवणाऱ्या (जे.ई.) यांची कंत्राटदाराशी आर्थिक मिलीभगत असल्याची कल्पना येते. अमरावती शहरातील मुख्य बाजारपेठ असलेला राजकमल चौक ते बडनेरा मार्गाच्या कडेला सध्यास्थित सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्याच्या शेजारील असलेल्या नाल्यांचे काम सुरु असून गेल्या दोन महिन्यांपासून ही सर्व कामे अर्धवट सोडून कंत्राटदार पळाले आहेत.

रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात युवासेना आक्रमक, केले अनोखे आंदोलन
महाविकास आघाडीने शिक्षणाचा केला खेळखंडोबा - गंधे

अर्धवट आणि उंची जास्त असलेल्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यामुळे तसेच अर्धवट नाल्यांच्या कामामुळे गेल्या १५ दिवस आधी पावसाची झळ सुरू असतांना राजकमल चौकातील व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी शिरल्याचे चित्र संपुर्ण जिल्ह्याने पाहिले.आहे. त्यामुळे आता अशा कंत्रांटदारांना काळया यादीत टाकण्याची मागणीही यावेळी करण्यात अली आहे. सोबतच गणेशाच्या आगमनापूर्वी सर्व रस्ते हे चकचकीत व खड्डे मुक्त करण्यात यावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी संजय शेटे, सचिन ठाकरे, चेतन वानखडे, अनिकेत ढाणले, गोलू नाखले, पंकज फुके, गोविंद, सचिन उनक, कार्तिक गजभिये यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com