Ranjangaon Ganpati Temple: तुळजापूरपाठोपाठ आता रांजणगावच्या महागणपती मंदिरातही ड्रेसकोड लागू, वेस्टर्न कपड्यांवर बंदी

Dress Code: रांजणगाव देवस्थान ट्रस्टच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
Ranjangaon Ganpati Temple
Ranjangaon Ganpati TempleSaam Tv
Published On

रोहिदास गाडगे, शिरुर

Shirur News: अष्टविनायकांपैकी एक असलेल्या रांजणगावच्या महागणपती मंदिरातही आता ड्रेसकोड असणार आहे. तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिर प्रशासनानंतर आता रांजगाव गणपती मंदिर प्रशासनाने देखील ड्रेसकोडबाबत निर्णय घेतला आहे. गणपती मंदिरामध्ये वेस्टर्न कपड्यांवर बंदी घालण्यात आली आहे. रांजणगाव देवस्थान ट्रस्टच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

Ranjangaon Ganpati Temple
Bailgada Sharyat: मोठी बातमी! बैलगाडा शर्यत आणि जल्लिकट्टूला सुप्रीम कोर्टाची परवानगी, बैलगाडाप्रेमींच्या लढ्याला यश

रांजणगाव महागणपती देवस्थान ट्रस्टने याबाबची नोटीस लावली आहे. या जाहिर नोटीसवर 'सर्व भाविकांना कळवण्यात येत आहे की, अंग प्रदर्शक, उत्तेजक, असभ्य व अशोभनीय वस्रधारी तसेच हाफ पॅन्ट, बर्मुडाधारींना मंदिरात प्रवेश मिळणार नाही. याची सर्व भाविकांनी मोंद घ्यावी.', असे लिहिण्यात आले आहे.

या जाहीर नोटीसच्या माध्यमातून देवस्थान ट्रस्टकडून भाविकांना वेस्टर्न कपडे घालून येऊ नये अशी विनंती करण्यात आली आहे. रांजणगाव देवस्थान ट्रस्टच्या बैठकीत वेस्टर्न कपड्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर काही वेळात मंदिर परिसरात फलक लावण्यात येणार आहे.

Ranjangaon Ganpati Temple
Tuljabhavani Temple: भारतीय संस्कृतीचे भान ठेवा! तुळजाभवानी मंदिरात यापुढे ड्रेसकोड; वेस्टर्न कपडे घालून येणाऱ्यांना बंदी

दरम्यान, तुळजाभवानी मंदिरामध्ये यापुढे पुजाऱ्यांसह भाविकांना ड्रेसकोड असणार आहे. मंदिरात ड्रेसकोडशिवाय प्रवेश बंद करण्यात आला आहे. काही पुजारी मंदिर परिसरात जिन्स आणि शर्ट घालून फिरत असल्याचे मंदिर प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर मंदिर प्रशासनाने नोटीस काढत मंदिर परिसरात फलके लावली आहे. ड्रेसकोडचे पालन न केल्यास कारवाई केली जाणार आहे.

तुळजाभवानी मंदिर परिसरात 'अंग प्रदर्शन, उत्तेजक, असभ्य आणि अशोभनीय वस्त्रधारी तसेच हाफ पँट, बर्मुडाधारींना मंदिरात प्रवेश नाही, असे फलक लावण्यात आले आहेत. या फलकावर 'कृपया भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचे भाव ठेवा, अशा प्रकारची देखील विनंती करण्यात आली आहे. त्याचसोबत, मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावर भाविकांशिवाय पुजाऱ्यांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com