लेटरबॉम्बनंतर नाशिकचे पोलीस आयुक्त संजय राऊतांच्या भेटीला; चर्चांना उधाण

दिपक पांडे यांच्या लेटरबॉम्बवर पडसाद पडल्याचे दिसले. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या पत्रावर नाराजी व्यक्त केली आहे.
Deepak Pande
Deepak PandeSaam TV
Published On

मुंबई: नाशिकचे पोलीस आयुक्त दिपक पांडे यांना गृहमंत्रालयाने (Home Ministry) कारणे दाखवा नोटीस तीन दिवसांपुर्वी दिली होती. दीपक पांडे (Deepak Pande) त्यांनी लिहिलेल्या पत्रबाबत त्यांना ही नोटीस दिली आहे. नाशिकच्या पोलीस आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस दिल्यानंतर आज ते संजय राऊत यांच्या भेटीला आले होते. त्यावेळी ते म्हणाले मी अभ्यास करून पत्र दिलेले आहे.

मंत्रिमंडळाने विचार करणे गरजे आहे. मी माझ्या पत्रावर ठाम आहे. 5 ते 6 विषयावर पत्र लिहिले आहे. मीडियापर्यंत हे पत्र कसे पोहोचले ते मला माहित नाही असेही पांडे म्हणाले. नोटीस आली आहे हे देखील अगोदर मीडियाला माहिती पडत आहे अशी खंत दिपक पांडे यांनी व्यक्त केली.

दरम्यान दिपक पांडे यांच्या लेटरबॉम्बवर पडसाद पडल्याचे दिसले. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या पत्रावर नाराजी व्यक्त केली आहे. अधिकाऱ्यांना असे पत्र लिहिण्याचा अधिकार कोणी दिला असे म्हणत नाराजी व्यक्त केली आहे. महसूल विभागासंदर्भात वादग्रस्त पत्र लिहिल्याप्रकरणी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजवण्यात आली होती. दिपक पांडे हे संजय राऊत याचे निकटवर्तीय मानले जातात त्यामुळे मंत्रीमंडळाची नाराजी दूर करण्यासाठी आजही भेट होती अशी चर्चा आहे.

Deepak Pande
...म्हणून वसंत मोरेंनी राजीनामा दिला, मनसेच्या नव्या शहराध्यक्षांनी सांगितलं कारण

महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडे असलेले अधिकार RDX आणि डिटोनेटरसारखे आहेत. यातून एक जिवंत बॉम्ब तयार होत असून तो भूमाफियांच्या मर्जीप्रमाणे वागतो असे पत्रात लिहीले होते. त्याचबरोबर पुढे ते म्हणाले होते की भूमाफिया महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून सर्वसामान्य नागरिकांचा छळ करून वित्तीय आणि जिवितास धोका निर्माण करत आहेत. तसेच महसूल यंत्रणेकडून कार्यकारी दंडाधिकारी पदाचे अधिकार काढून घ्यावेत, अशी मागणी दीपक पांडे यांनी पोलीस महासंचालकांकडे केली होती.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com