जिग्नेश मेवानींकडे जातीचं अस्सल सर्टिफिकेट, तरीही...; रोहित पवारांचा रोख कोणाकडे?

गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी (Jignesh Mewani) यांना मागिल आठवड्यात पोलिसांनी अटक केली होती.
Rohit Pawar
Rohit PawarSaamTvNews

पुणे: गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी (Jignesh Mewani) यांना मागिल आठवड्यात पोलिसांनी अटक केली होती. सकाळी जामीन मिळाला नतंर पुन्हा मेवानी यांनी पोलिसांनी (Police) अन्य गुन्ह्याप्रकरणी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर देशभरातून भाजपवरती टीका करण्यात येत आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी जिग्नेश मेवानींच्या अटकेवरुन भाजपवरती निशाणा साधला आहे.

गुजरातमधील काँग्रेस आमदार जिग्नेश मेवानी यांना एकामागोमाग एक गुन्ह्यात अटक करुन भाजपकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जातोय. त्यांच्याकडं जातीचं बोगस नाही तर अस्सल सर्टिफिकेट आहे, तरी त्यांनी ना जातीचं हत्यार बाहेर काढलं ना वॉशरुमला जाऊ न दिल्याची तक्रार केली. विचारधारेशी तडजोड नाही! अशा आशयाचे ट्वीट रोहित पवार यांनी केले आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याविरोधात ट्विट केल्याप्रकरणी मेवानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी आज त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. यात जामीन मिळाल्यानंतर मेवानी यांनी अधिकाऱ्यांवर हल्ला केला असल्याचा आरोप पोलीस अधिकाऱ्यांनी केला. मेवाणी यांना बुधवारी गुजरातमधून अटक केली होती. यानंतर त्यांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठोठावण्यात आली होती.

अमरावतीत आमदार जिग्नेश मेवानी यांच्या अटकेचा निषेध करण्यात आला आहे. अमरावतीच्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना निवेदन देत केंद्र सरकार सूड बुद्धीने वागत असल्याचा आरोप काँग्रेसने केला तर तातडीने या प्रकरणाची सखोल चौकशी करून आमदार मेवानी यांना सोडण्याची मागणी करण्यात आली. लोकशाहीची हत्या केंद्र सरकार कडून होत आहे त्यामुळे राष्ट्रपतींनी यात हस्तेक्षप करावा अशीही मागणी यावेळी काँग्रेसने केली आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com