Maharashtra DGP : रश्मी शुक्ला यांच्यानंतर मराठमोळ्या अधिकाऱ्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

Rashmi Shukla News : रश्मी शुक्ला यांच्यानंतर मराठमोळे विवेक फणसाळकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे.
Rashmi Shukla
Rashmi Shukla NewsSaam Tv
Published On

New DGP Of Maharashtra : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना निवडणूक आयोगानं मोठा निर्णय घेतला. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या बदलीचे निर्देश देण्यात आले. विरोधीपक्षाच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांची तात्काळ बदली केली आहे. वरिष्ठ आयपीएस केडरमधील अधिकाऱ्याची तात्काळ महासंचालक म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. रश्मी शुक्ला यांच्यानंतर सध्या विवेक फणासाळकर यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपण्यात आला आहे. मूळचे पुण्याचे असलेल्या विवेक फणसाळकर सध्या मुंबई पोलिस आयुक्त म्हणून काम पाहात आहेत.

आज दुपारी एक वाजेपर्यंत तीन आयपीएस अधिकाऱ्याची समिती नियुक्त करण्याचे राज्याच्या मुख्य सचिवांना निर्देश देण्यात आलेत. तीन जणांची समिती राज्याचे नवे पोलीस महासंचालक निवडणार आहेत. राज्याचे पोलीस महासंचालक कोण होणार? याची चर्चा सुरु आहे.

Rashmi Shukla
Rashmi Shukla Transfer : मोठी बातमी! पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली

कोण होणार राज्याचा नवीन पोलीस महासंचालक? Who is next DGP Of Maharashtra

रश्मी शुक्ला यांच्यानंतर राज्याचा नवीन पोलीस महासंचालक कोण होणार? याची चर्चा सुरु झाली आहे. पोलीस खात्यामधील वरिष्ठ सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ अधिकाऱ्यांची नावं चर्चेमध्ये आहेत. त्यामध्ये मराठमोळ्या अधिकाऱ्याचेही नाव आहे. विवेक फणसाळकर, संजय कुमार वर्मा, संजीव कुमार सिंघल या तीन नावांची चर्चा सुरु आहे.

मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची नियुक्ती होण्याची शक्यता जास्त आहे. विवेक फणसाळकर पोलीस महासंचालक होण्यामध्ये सर्वात आघाडीवर आहेत. त्यांच्यानंतर संजय कुमार वर्मा, डीजीपी (कायदेशीर आणि तांत्रिक) आणि संजीव कुमार सिंघल डीजीपी (अँटी करप्शन ब्युरो) यांच्या नावाची चर्चा आहे. पण विवेक फणसाळकर सर्वात आघाडीवर आहेत. त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com