गिरीश कांबळे, मुंबई
आज क्रांती दिनानिमित्त आदित्य ठाकरेंनी ऑगस्ट क्रांती मैदानाच्या दिशेने रॅली काढली आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम देखील येथे सुरु असल्याने पोलिसांकडून आदित्य ठाकरेंना अडवण्यात आलं आहे. त्यामुळे ऑगस्ट क्रांती मैदानावर पुन्हा एकदा शिंदे आणि ठाकरे आमनेसामने आल्याचं दिसतंय.
राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीदिनी हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आमदार आदित्य ठाकरे, आमदार सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली गिरणी कामगारांची मूक मिरवणूक हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे. नाना चौकातून ही मिरवणूक सुरू झाली आहे.
मूक मिरवणूकीत राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघांचे पदाधिकारी,अन्य उद्योगातील कामगार, सेवादल सैनिक, कार्यकर्ते स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतीवीरांना अभिवादन करण्यासाठी रॅलीत सामिल झाले आहेत. अशात आदित्य ठाकरे या ठिकाणी पोहचले असता पोलिसांनी त्यांचा ताफा पुढे जाण्यापासून काही वेळासाठी थांबवला होता.
आज ९ ऑगस्ट म्हणजे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वपूर्ण दिवस आहे. 1942 साली महात्मा गांधी यांनी ‘भारत छोडो आंदोलन’ सुरू केले . या दिवशी भारतीय जनतेने इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध बंड पुकारले आणि स्वातंत्र्याच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकले. त्यामुळे त्यांच्या स्मृतीला अभिवान करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , अजित पवार,पालकमंत्री दीपक केसरकर, मंत्री मंगलप्रभात लोढा तसेच कॉग्रेस विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवर, आदित्य ठाकरे याठिकाणी उपस्थित होणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.