Bus Accident: राहुल गांधींच्या 'भारत जोडो' यात्रेसाठी येणाऱ्या लक्सरी बसचा अपघात

बसमध्ये 30 ते 35 काँग्रेस कार्यकर्ते प्रवास करत होते. जखमींवर बाळापूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Accident News
Accident NewsSaam tv
Published On

अकोला : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्र आज अकोल्यात आहे. या यात्रेत येणाऱ्या लक्सरी बसचा अपघात झाला आहे. सोलापूरहून अकोल्याच्या दिशेने भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी काही काँग्रेस कार्यकर्ते निघाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, महिलांच्या लक्सरी बसचा हा अपघात झाला आहे. अकोल्यातील बाळापूरजवळ हा अपघात झाला आहे. अपघातात चौघे गंभीर जखमी तर महिला कार्यकर्त्या देखील अपघातात जखमी झाल्या आहेत. बसमध्ये 30 ते 35 काँग्रेस कार्यकर्ते प्रवास करत होते. जखमींवर बाळापूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Latest News Update)

अपघातापूर्वीचा फोटो
अपघातापूर्वीचा फोटो
Accident News
OBC Reservation News: ९२ नगरपरिषदांमधील ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

राहुल गांधी यांनी गुरुवारी अकोल्यातील पातूर येथून भारत जोडो यात्रेला सुरुवात केली. तत्पूर्वी या यात्रेला महाराष्ट्र टप्प्यातील दहाव्या दिवशी बुधवारी वाशिम जिल्ह्यातून सुरुवात झाली. सकाळी सहा वाजता जांभरुण फाट्यावरून निघालेली ही पदयात्रा सायंकाळी मेडशी गावात पोहोचून रात्री अकोला जिल्ह्यातील पातूर येथे मुक्काम केला. 7 सप्टेंबर रोजी तामिळनाडूमधील कन्याकुमारी येथून सुरू झालेल्या 'भारत जोडो' यात्रेचा हा 70 वा दिवस आहे.

भारतीय जनता पक्ष (भाजप) रोज संविधानावर हल्ले करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी मंगळवारी केला होता. जीएसटी आणि 2016 मध्ये नोटाबंदी लागू करण्याच्या निर्णयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. ते म्हणाले होते की या दोन्ही पायऱ्यांचा वापर लहान आणि मध्यम व्यापारी, दुकानदार आणि शेतकरी यांना संपवण्यासाठी शस्त्र म्हणून केला जात होता.

Accident News
Measles Disease In Mumbai: मुंबईत गोवर आजाराचा संसर्ग वाढला; मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

राहुल यांनी हिंदुत्वाचे विचारवंत सावरकर यांच्यावरही टीका केली होती, त्यांनी ब्रिटिश राजवटीसाठी काम केले आणि त्यातून पेन्शन घेतली असा आरोप केला होता. काँग्रेसचा व्यापक जनसंपर्क उपक्रम भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबर रोजी तेलंगणातून महाराष्ट्रात दाखल झाली. राज्यातील ही पदयात्रा आतापर्यंत नांदेड, हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यातून गेली आहे. 20 नोव्हेंबरला मध्य प्रदेशात प्रवेश करण्यापूर्वी ही यात्रा महाराष्ट्रातील अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातूनही जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com