Measles Disease In Mumbai: मुंबईत गोवर आजाराचा संसर्ग वाढला; मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

Measles Disease In Mumbai: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज, गुरूवारी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे.
Measles Disease In Mumbai
Measles Disease In MumbaiSaam TV
Published On

Measles Disease In Mumbai: गेल्या काही दिवसांपासून मुंबईत गोवर या आजाराच्या संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. याबाबत पालिकेडून उपाय योजनाही सुरू आहे. पण तरिही गोवर रुग्णांची संख्या वाढतच असल्याने यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज, गुरूवारी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. (Mumbai Latest News)

Measles Disease In Mumbai
Dharavi News: मुख्यमंत्री धारावीत येणार! धारावी पुर्नविकास प्रकल्पाबाबत मोठ्या घोषणेची शक्यता

मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीला सार्वजनिक आरोग्य खात्याचे सचिव यांच्यासह आरोग्य विभागातील अन्य अधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यमंत्री मंडळाची बैठक संपल्यानंतर ही महत्वपूर्ण बैठक मंत्रालयाच्या मंत्रिमंडळ सभागृहात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत गोवर या आजारावर प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) घेऊन पुढील सूचना संबधित अधिकाऱ्यांना देणार असल्याचे कळते.

Measles Disease In Mumbai
Eknath Shinde : CM शिंदे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी; ठाकरे गटाने गोमूत्र शिंपडत केलं शुद्धीकरण

पालिकेने (BMC) दिलेल्या माहितीनुसार, गोवर आजाराने बाधीत सहा बालके ही ऑक्सिजनवर आहेत. सोमवारी १२ मुलांची या दोन्ही लक्षणांसाठी नोंद करण्यात आली. मुंबईत सध्या गोवर रोगाचे १६४ रुग्ण आहेत. ही गंभीर रुग्णवाढ आणि त्याची गंभीरता लक्षात घेता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही गोवर आजारवर चर्चा केली जाणार आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com