Accident News : दैव बलवत्तर ! माेठ्या अपघातातून वीस मजूर बचावले

या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली होती.
akola, accident, madhya pradesh , soyabean
akola, accident, madhya pradesh , soyabeansaam tv
Published On

Akola Accident News : मूर्तिजापूर - दर्यापूर रस्त्यावरील सिरसो प्लॉटजवळ आज एका चार चाकीचा अपघात (accident) झाला. रस्त्याच्या कडेला असलेल्या खाेल खड्यात चारचाकी पडली. दरम्यान दैव बलवत्तर म्हणून चार चाकीत (car) असलेले वीस मजूर सुखरूप बचावले आहेत. (akola latest marathi news)

सध्या सोयाबीन सोंगणीचा हंगाम असल्याने मध्यप्रदेशातील (madhya pradesh) दुर्मिळ भागातून शेकडो मजूर या कामासाठी विदर्भात दाखल होतात. मजुरांनी खचाखच भरलेली एक चारचाकी वाहन मूर्तिजापूरच्या दिशेने भरधाव येत असताना वाहनाचे पुढील चाक तुटून पडले. (Maharashtra News)

akola, accident, madhya pradesh , soyabean
Amravati : 'हिंदूंना कुठल्याही पद्धतीचं आव्हान देऊ नका, 'मविआ'चं सरकार गेलयं'

त्यामुळे चार चाकी रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. या वाहनात सुमारे वीस मजूर हाेते अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. भरधाव वाहन खोल खड्ड्यात जाऊन उलटले असताना देखील कोणालाही या अपघातात इजा झालेली नाही. दैव बलवत्तर म्हणून सर्व मजूर सुखरूप बचावले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली होती. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

akola, accident, madhya pradesh , soyabean
Bribe : रजा मंजूरीसाठी पैशांची मागणी, गट शिक्षण अधिका-यासह दाेघे एसीबीच्या जाळ्यात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com