शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार, नुकसान भरपाईवरून अब्दुल सत्तारांची ग्वाही

एकूण नुकसान आणि मदतीबाबतचे तक्ते भरून देण्यासाठी आठवडा लागेल; महसूल राज्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार यांची साम टीव्हीला माहिती
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार, नुकसान भरपाईवरून अब्दुल सत्तारांची ग्वाही
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार, नुकसान भरपाईवरून अब्दुल सत्तारांची ग्वाहीडॉ. माधव सावरगावे
Published On

औरंगाबाद - केंद्र सरकारच्या एनडीआरएफच्या निकषानुसार दिल्या जाणाऱ्या मदतीपेक्षा राज्य सरकार अधिक मदतीची घोषणा केली आहे. त्यामुळे पुन्हा अतिवृष्टी, पूरामुळे झालेले नुकसान आणि मदतीबाबत आकडेवारी नव्याने तयार करावी लागत असल्याने त्यासाठी आठवडाभर लागू शकतो. मात्र, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करणारच अशी माहिती राज्याचे महसूल राज्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी साम टीव्हीला दिली आहे.

हे देखील पहा -

अब्दुल सत्तार म्हणाले, "केंद्र सरकारच्या एनडीआरएफच्या निकषानुसार प्रति हेक्ट्ररी ६ हजार ८०० मदतीबाबत राज्यातील सगळे नुकसान भरपाईचे तक्ते भरून आले होते. मात्र, राज्य सरकारने वाढीव १०,१५,२५ हजार रुपये मदतीचा नवीन अध्यादेश काढल्यामुळे पुन्हा परत सर्व जिल्ह्यातून नुकसानीची आकडेवारी आणि मदतीची रक्कम याबाबतचे फॉरमॅट भरून राज्य सरकारकडे पाठवले जाणार आहेत. केंद्र सरकारच्या एनडीआरएफच्या निकषानुसार ६ हजार ८०० रक्कम देता येत नाही, असे नियम आहे.

मात्र, तत्पूर्वी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी त्या प्रोफार्मामध्ये सरकारकडे पाठवली होती. त्यात वाढीव मदत राज्य सरकारने घोषित केल्यानं पुन्हा प्रक्रिया करावी लागत असल्यानं थोडा वेळ लागतोय. आठवडाभरात पूर्ण काम होऊन बँकेत रक्कम टाकली जाईल. दिवाळीच्या अगोदर आकडेवारी आली की शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा होईल.

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार, नुकसान भरपाईवरून अब्दुल सत्तारांची ग्वाही
पोलीस मित्र असल्याची बतावणी करून हॉटेल मालकाला दमबाजी (Video)

महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त एकही शेतकरी मदतीविना वंचीत राहणार नाही; नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना मदत मिळणार. या आठवडाभरात नुकसानी झालेल्या आकडेवारीचे आणि मदतीच्या रकमेचे तक्ते भरून पूर्ण होतील, असेही अब्दुल सत्तार म्हणाले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com