अंबरनाथ : आज मातृदिनानिमित्त प्रत्येक जणांनी स्वत:च्या आईला शुभेच्छा दिल्या. तर अनेकजण आईच्या जुन्या आठवणीत रमले. आज अनेकांनी मातृदिन (Mothers Day) उत्साहाने साजरा केला. मात्र, ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये मातृदिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करताना पाहायला मिळाला. अंबरनाथमध्ये स्थानिक ग्रामस्थांनी चक्क उल्हास नदीची (Ulhas River) आरती केली. तसेच यावेळी उपस्थितांनी लोकांना नदीत प्रदूषण न करण्याचे आवाहन केले. ( ulhas river aarti by local resident on mother's day )
हे देखील पाहा -
आज मातृदिनानिमित्त महाराष्ट्रासहित देशभर अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, आजच्या मातृदिनी अंबरनाथकरांना आठवण झाली ती उल्हास नदीची. संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारी उल्हास नदी ही स्थानिक ग्रामस्थांना आईच वाटते. या भावनेतून स्थानिक ग्रामस्थ मंडळी उल्हास नदीकडे पाहत असतात. आजच्या दिनी ममतावादी दृष्टीकोनातून उल्हास नदी बचाओ समिती आणि स्थानिक ग्रामस्थांनी रायते पुलाजवळ नदीची आरती केली.
तसेच, यावेळी एक तरुणी 'उमाई' देवीच्या वेशभूषेत उल्हास नदी तीरावर अवतरली. उमाई देवीच्या वेशभूशषेत उपस्थित तरुणीने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. या तरुणीनं उल्हास नदीला प्रदूषणामुळे काय त्रास होतो, याबाबतचं नदीचं मनोगत सांगितलं. यानंतर ग्रामस्थ आणि समितीच्या स्वयंसेवकांनी उल्हास नदीची आरती केली. आपली खरी जीवनवाहिनी असलेल्या उल्हास नदीत प्रदूषण न करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं. या उपक्रमाला सक्सेस केअर एज्युकेशन क्लासेसच्या विद्यार्थ्यांनीही उपस्थिती लावली होती. अंबरनाथकरांच्या उपस्थित हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
Edited By - Vishal Gangurde
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.