Marathi News Live Updates : शिवसेना पक्ष आणि चिन्हप्रकरणी सुनावणी पुन्हा लांबणीवर

Maharashtra Breaking News Live Updates : आज शनिवार दिनांक १७ ऑगस्ट २०२४ आजच्या ठळक बातम्या,देशातील राजकीय घडामोडी, लाडकी बहीण योजना अपडेट्स, राज्यातील ताज्या अपडेट्स, देश-विदेशातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News
Maharashtra Live News UpdatesSaam tv
Published On

Shiv Sena : शिवसेना पक्ष आणि चिन्हप्रकरणी सुनावणी पुन्हा लांबणीवर

शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. 20 ऑगस्टला होणारी सुनावणी महिनाभर पुढे ढकलली आहे. 17 सप्टेंबरला याप्रकरणी सुनावणी होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे वकील सोमवारी प्रकरण पुन्हा मेंशन करण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्याने ठाकरे गटाच्या वतीने सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात याचिका दाखल करण्यात आली आहे.

Aditya Thackeray : मुंबादेवी मंदिरामागे सरकारचा पार्किंग बनवण्याचा विचार; आदित्य ठाकरेंचा आरोप

मुंबादेवी कॉरिडॉरसाठी आदित्य ठाकरे यांनी विरोध केला आहे. या कॉरिडॉर करण्यासंदर्भात राज्य सरकारने यापूर्वी बैठक घेतली आहे, मात्र स्थानिक आमदार अमीन पटेल यांना सुद्धा या बैठकीला बोलावलं नाही, त्यांना विश्वासात घेतलं नाही, तसंच मुंबादेवी मंदिरामागे , सरकार पार्किंग बनवण्याच्या विचारात असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

Mumbai International Airport : विमानातून ज्वलनशील पदार्थ नेणाऱ्याला मुंबई विमानतळावर अटक

मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानातून ज्वलनशील पदार्थ वाहतूक करणाऱ्याला मुंबईतील सहार पोलिसांनी अटक केली. विमानतळावर कडक सुरक्षा व्यवस्था वैयक्तिक आणि सामानाची सूक्ष्म तपासणी करत असतानाही ज्वलनशील पदार्थ विमानातील लगेच पर्यंत पोहोचले होते..

Sharad Pawar : नितीन गडकरी आणि शरद पवार एकाच मंचावर

आज वर्ध्यात माजी आमदार सुरेश देशमुख अमृत महोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात नितीन गडकरी आणि शरद पवार एकाच मंचावर उपस्थित होते. अनिल देशमुख, राजेंद्र शिंगणे देखील उपस्थित होते, राजेंद्र शिंगणे शरद पावरांसोबत मंचावर दिसल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. यशवंत महाविद्यालयाच्या प्रांगणात हा सोहळा पार पडला.

 Lonavala News : सलगच्या सुट्ट्यांमुळं मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे वर ट्राफिक जाम 

शुक्रवार, शनिवार ,रविवार, आणि रक्षाबंधन साजरा करण्यासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने आपापल्या खासगी वाहनाने गावी नागरिक निघालेत. परिणामी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबचं लांब रांगा लागलेल्या आहेत.

Wardha News: सावंगी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग आजपासून २४ तास बंद

कोलकाता येथील अमानुष घटनेच्या निषेधार्थ सावंगी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग आजपासून २४ तास बंद राहणार आहे. शनिवारी सकाळपासून रविवारी सकाळपर्यंत २४ तास सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील ओपिडी राहणार बंद आहे. १७ रोजी होणाऱ्या पूर्वनियोजित अतिगंभीर शस्त्रक्रिया वगळता अन्य सर्व शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या.

Navi Mumbai: इनॉर्बिट मॉलमध्ये बॉम्ब असल्याचा मेल खोटा, नवी मुंबईकरांनी सोडला सुटकेचा निश्वास 

नवी मुंबईतील इनॉर्बिट मॉलमध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरवण्यात आली. नवी मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास सोडला. इनॉर्बिट मॉलमध्ये बॉम्बचा मेल खोटा निघाला. पोलिसांच्या सर्च ऑपेरेशनमध्ये इनॉर्बिट मॉलमध्ये कोणताही बॉम्ब आढळला नाही. संपूर्ण इनॉर्बिट मॉलमध्ये सर्च ऑपेरेशननंतर मॉल सुरु करण्यात आला. मेल कोणी पाठवला याचा पोलिस तपास घेत आहे.

Nashik News: नाशिकच्या घटनेनंतर पालकमंत्री दादा भुसेंनी घेतली बैठक

नाशिकच्या दोन गटातील वादानंतर पालकमंत्री दादा भुसेंच्या उपस्थित आढावा बैठक सुरू आहे. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीला जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्यासह पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, प्रशांत बच्छाव उपस्थित आहे. जखमी पोलिसांकडून दादा भुसे यांनी माहिती घेतली.

Kolhapur News : जुनी पेन्शन द्या, मतदान घ्या; पेन्शन क्रांती महामोर्चा पेन्शन संघटनेचा एल्गार

पेन्शन क्रांती महामोर्चा पेन्शन संघटनेने मोर्चा काढला.

कोल्हापुरात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

जुनी पेन्शन द्या, मतदान घ्या, जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार घोषणाबाजी

जुन्या पेन्शनसह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर

MNS Protest:  अनधिकृत रिक्षांविरोधात मनसेचे आंदोलन

मुंबईच्या मानखुर्द, शिवाजी नगर, गोवंडी परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत रिक्षा चालवल्या जात आहेत. या विरोधात आज मनसेने सायन पनवेल महामार्गावर उतरुन आंदोलन केले. गोवंडी वरून मानखुर्द कडे येणाऱ्या रिक्षा मनसैनिकांनी अडवल्या.मनसेचे विभाग अध्यक्ष रवींद्र गवस आणि मनसे वाहतूक सेनेचे सरचिटणीस माऊली थोरवे यांच्या नेतृत्वात या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. मानसैनिकांनी रस्त्यावर बसून ठिय्या देखील दिला.पोलीस हप्ते घेऊन अश्या अनधिकृत रिक्षा चालकावर कारवाई करीत नसल्याचा आरोप मनसेने केला असून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Nashik News: मोठी बातमी! रामगिरी महाराजांच्या सुरक्षेत वाढ

रामगिरी महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने नवा वाद उभा राहिला आहे. वादग्रस्त वक्तव्यानंतर रामगिरी महाराजांच्या विरोधात काल राज्यभरात मोर्चे निघाले होते. याबाबत आता मोठी अपडेट समोर आली असून रामगिरी महाराजांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सुरक्षेसाठी बंदूकधारी पोलिसांसह साध्या वेशातील पोलिस तैनात करण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर रामगिरी महाराजांना पोलिस संरक्षण देण्यात आले आहे.

Washim News: वाशिममध्ये लाडक्या बहिणींची भर पावसात पैसे काढण्यासाठी गर्दी

आज दुसऱ्या दिवशी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी वाशिम शहरातील पोस्ट ऑफिस मध्ये भर पावसात पैसे काढण्यासाठी गर्दी केल्याच बघायला मिळालं. पुढील दोन दिवस सलग सुट्टी असल्याचा परिणाम तर आज सकाळपासूनच वाशिम शहरात रिमझिम पाऊस पडत असतानाही महिलांनी पैसे काढण्यासाठी गर्दी केली होती.

Kolhapur News: कोल्हापूरमध्ये हिंदू धर्म परिषदेचे आयोजन

कोल्हापुरात आज सकल हिंदू समाज्याच्या वतीने हिंदू धर्म परिषद आयोजित करण्यात आली आहे. कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन इथं ही परिषद होत आहे. देव देश आणि धर्मासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व सकल हिंदू समाजातील नागरिक एकत्र झाले असून यामध्ये 20 हुन अधिक सकल हिंदू विचारांच्या विविध संघटना ही सहभागी झालेल्या आहेत. संपूर्ण जगभरामध्ये हिंदू समाजावर होणारे अन्याय आणि अत्याचार या विरोधात एक लढा उभारला जाणार आहे. या परिषदेमध्ये विविध ठराव ही मांडण्यात येणार आहे. या परिषदेला प्रा.राजेंद्र ठाकूर, बाळ महाराज, स्वाती खाडये, खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार राजेश क्षीरसागर आदी उपस्थितीत आहेत.

Buldhana News:  कोलकात्यातील घटनेच्या निषेधार्थ बुलढाण्यात डॉक्टर संघटनांनी काढला मूक मोर्चा

कोलकात्यातील मेडिकल कॉलेजमधील निवासी महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा घटनेचे पडसाद बुलढाणा जिल्ह्यातही उमटले आहे.. बुलढाणा जिल्ह्यातील डॉक्टर संघटना या विरोधात रस्त्यावर उतरल्या असून डॉक्टर संघटना , मेडिकल असोसिएशन कडून शहरातील मुख्य मार्गाने मूक मोर्चा काढण्यात आला.. तसेच कोलकत्ता येथील घटनेच्या हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात यावी , अशा मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.. या मुक मोर्चा मध्ये असंख्य डॉक्टर सामील झाले होते...

Jalgaon News: मराठा बांधव आक्रमक; सुप्रिया सुळेंना घेराव घातला

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे या जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत जळगाव मधील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात महिला मेळाव्याच्या आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान छत्रपती संभाजी नाट्यगृहात छावा संघटने कडून एक मराठा लाख मराठा च्या घोषणाबाजी करत सुप्रिया सुळे यांना घेराव घातला तसेच मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी छावा संघटनेने सुप्रिया सुळे यांना निवेदनाद्वारे केली आहे.

Karnataka CM Siddharamaiya: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अडचणीत वाढ, हायकोर्टात खटला चालणार

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुदा स्कीम जामीन घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यविरोधात खटला चालवण्यास कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहेलोत यांनी मंजूरी दिली आहे. बंगळूरू हायकोर्टात याबाबतचा खटला चालणार आहे.

Old Pune Mumbai Highway Traffic Update: जुना पुणे मुंबई महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

जुना पुणे मुंबई महामार्गवर सोमाटणे फाटा ते देहूरोड दरमान्य मोठी वाहतूक कोंडी झाली तसेच बेंगळरू देहूरोड बायपास वर ही सेंट्रल चौकात वाहतूक कोंडी झाली आहे, चौकात सिग्नलं यंत्रणा असली तरी देहूरोड तळेगांव वाहतूक विभागाचे दुर्लक्ष असल्याचं दिसून येत आहे..या वाहतूक कोंडीचा फटका अनेक वाहन चालकांना बसत आहे....

Pune News: पोलिसांबाबत वादग्रस्त विधान, नितेश राणेंविरोधात राष्ट्रवादीचे पुण्यात आंदोलन

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून भाजप आमदार नितेश राणे यांच्या विरोधात आंदोलन केले जात आहे. नितेश राणे यांनी तीन दिवसांपूर्वी पोलिसांविषयी बोलताना वादग्रस्त विधान केले होते. पोलिसांनो, जास्त मस्ती केली तर बायकोचा फोनही लागणार नाही अशा जिल्ह्यात बदली करेन, असे म्हणत नितेश राणे यांनी एक प्रकारे पोलिसांना धमकी दिली होती. नितेश राणेंच्या याच वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यात हे आंदोलन केले आहे.

chhatrapati sambhaji nagar : कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरण; छत्रपती संभाजीनगरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी डॉक्टरांचा संप

छत्रपती संभाजीनगरमधील डॉक्टरांनी कोलकातामधील घटनाने आक्रमक भूमिका घेतला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टरांनी सलग दुसऱ्या दिवशी संप पुकारला आहे.

Mumbai News : अन् मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी दुर्घटना टळली

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी दुर्घटना टळली आहे. विमानातून अवैधपणे नेण्यात येत असलेल्या केमिकलने अचानक पेट घेतला. केमिकल विमानात लोड होत असताना आग लागल्याचं समोर आल्याने मोठी दुर्घटना टळली. फॉरेन्सिक तपासणीत केमिकल हायड्रोजन स्पिरीट असल्याच निष्पन्न झालं आहे. या प्रकरणी सहार पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

Hingoli News : हिंगोलीत सलग दुसऱ्या दिवशी पावसाच्या सरी कोसळल्या

हिंगोलीच्या सेनगाव शहरात सलग दुसऱ्या दिवशी पावसाच्या सरी कोसळल्या आहे. या पावसामुळे शहरातील वातावरणात गारवा निर्माण झाला होता. तर नागरिकांच्या दैनंदिन कामांमध्ये देखील अडथळा निर्माण झाला होता.

Mumbai News : भेंडी बाजारात परिसरात व्यावसायिकाची डोक्यात गोळी घालून आत्महत्या

भेंडी बाजारात परिसरात व्यावसायिकाने डोक्यात गोळी घालून केली आत्महत्या

भेंडी बाजार येथील स्वतःच्या कार्यालयात केली आत्महत्या

व्यापारी इक्बाल मोहम्मद सिवानी, 52 यांचा जागीच मृत्यू

व्यवसायात झालेल्या तोट्यामुळे आणि कर्जबराजी पणामुळे आत्महत्या केल्याची माहिती

Nashik News : नाशिक शहरात तणावपूर्ण शांतता

- नाशिक शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

- पोलिसांकडून तणावग्रस्त भागात करण्यात आला रुट मार्च

- शहर पोलिसांच्या वतीने ठिकठिकाणी वाढविण्यात आला अतिरिक्त बंदोबस्त

- ज्या ठिकाणी दगडफेकीची घटना घडली होती त्या ठिकाणी सशस्त्र पोलिसांचा रूट मार्च

- शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज

Kapil Patil News : कपिल पाटील मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला

माजी आमदार कपिल पाटील मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला

राज ठाकरे यांच्या निवासस्थानी घेतली भेट

काही दिवसांपूर्वी कपिल पाटील यांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांची घेतली होती भेट

palghar earthquake Today : पालघरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

पालघर जिल्हा भूकंपाने हादरला आहे. डहाणू तालुक्यात भूकंपाचा हादरला बसला. भल्यापहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपात कोणत्याही नुकसान झाल्याची माहिती हाती आलेली नाही.

Nashik News : नाशिकमधील तणावानंतर पालकमंत्री दादा भुसे यांनी बोलवली तातडीची बैठक

- नाशिकमध्ये काल झालेल्या तणावानंतर पालकमंत्री दादा भुसे यांनी आज बोलली तातडीची बैठक

- काल दोन गट आमने-सामने आल्यानंतर झाली होती तुफान दगडफेक

- बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात काल बंदची हाक देण्यात आली होती.

- याच दरम्यान दोन गट आमने-सामने आल्यानंतर झाला तणाव

- या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दादा भुसे यांनी पोलीस अधिकाऱ्यांची बोलवली तातडीची बैठक

Pune News : पुण्यात दडीहंडीपासूनच लेझरबंदी 

पुण्यात दडीहंडीपासूनच लेझरबंदी करण्यात आली आहे.

गणेशोत्सवात लेझर बीम लाइटच्या वापरास बंदीचा निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी दहीहंडीपासून सुरु करण्यात येणार आहे.

पुण्यात लेझर बीममुळे नेत्रपटलाला इजा झाल्याची सुमारे १५ प्रकरणे विसर्जन मिरवणुकीनंतर आले होते समोर

त्यामुळे लेझर बीम लाइटवर बंदीची मागणी तेव्हापासून केली जात होती

कोणी लेझर बीम लाइट लावल्यास, कायदेशीर कारवाई करण्याचा पोलिसांनी दिला इशारा

Sabarmati Express accident  :साबरमती एक्स्प्रेसचा अपघात, २२ डबे रुळावरून घसरले

उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये आज सकाळी रेल्वे अपघाताची घटना घडली आहे. या साबरमती एक्स्प्रेसचे २२ डबे रुळावरून घसरले आहे. या अपघातात एकही प्रवासी जखमी झाला नसल्याची माहिती हाती आली आहे. पोलिसांनी अपघाताचा तपास सुरु केला आहे. प्रवाशांसाठी अहमदाबसाठी दुसऱ्या ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com