
कुणाल कामराला पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. पोलिसांनी कामरला चौकशीसाठी नोटीस धाडली आहे.
पुण्यात पाण्यासाठी महिला उतरल्या रस्त्यावर उतरल्या आहेत.
वडगाव शेरी, रोज एक तास धरणे आंदोलन करणार
सोमनाथनगर व परिसरात मागील दोन महिन्यांपासून पाणीटंचाई जाणवत असल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.
पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी आजपासून बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. आंदोलनामध्ये महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.
हे बेमुदत धरणे आंदोलन अखिल मांजराईनगर नागरिक कृती समितीच्या वतीने राजेंद्र साळवे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.
आज आंदोलनाचा पहिला दिवस होता. जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होत नाही आणि मोठी जलवाहिनी टाकली जात नाही तोपर्यंत या भागातील नागरिक आणि महिला रोज एक तास धरणे आंदोलन करणार आहे
नाशिक
नाशिकमध्ये स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराविरोधात आंदोलन
शिंदेंच्या शिवसेनेकडून नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यासमोर आंदोलन
कुणाल कामराच्या पोस्टरला जोडे मारून शिवसैनिकांनी केला निषेध
कुणाल कामरावर गुन्हा नोंदवा, मुंबई नाका पोलिसांना निवेदन
नवी मुंबई
कुणाल कामराविरोधात शिवसेना उपनेते विजय चौगुले यांनी दाखल केली तक्रार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेवरून तक्रार
रबाळे पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली दाखल, गुन्हा नोंदवण्याची मागणी
कॉमेडियन समय रैनाची तब्बल सहा तास चौकशी.
महाराष्ट्र सायबर क्राईमच्या मुख्यालयात झाली चौकशी.
इंडियाज गॉट लॅटेन्ट शो मध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्य संदर्भात दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भात करण्यात आली चौकशी.
- उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या इमारतीमध्ये बॉम्ब ठेवल्याचा कॉल नागपूर पोलिसांना आला...
- त्यानंतर नागपूर पोलिसाच्या बॉम्बशोधक व नाशक पथकाने इमारती मध्ये शोध मोहीम सुरू केली आहे...
- दरम्यान धमकी देणारा व्यक्ती ही पोलिसांच्या हाती लागला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची चौकशी पोलीस करत आहेत...
सोमनाथनगर व परिसरात मागील दोन महिन्यांपासून पाणीटंचाई जाणवत असल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.
पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी आजपासून बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. आंदोलनामध्ये महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.
हे बेमुदत धरणे आंदोलन अखिल मांजराईनगर नागरिक कृती समितीच्या वतीने राजेंद्र साळवे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.
आज आंदोलनाचा पहिला दिवस होता. जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होत नाही आणि मोठी जलवाहिनी टाकली जात नाही तोपर्यंत या भागातील नागरिक आणि महिला रोज एक तास धरणे आंदोलन करणार आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबत कुणाल कामरा जो बरंळला आहे ते खरंतर उबाठाचं गलिच्छ राजकारण असल्याचं शिवसेनेचे प्रवक्ते संजीव भोर यांनी म्हटल आहे.कुणाल कामरासारखे लोक म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कॉलरा सारखा आजार आहे. उबाठाची त्यातल्या त्यात संजय राऊत सारखी कूपमंडूक वृत्तीची माणसं महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला कलंक आहे. कामरा याने माफी मागावी अन्यथा महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात गेला तरी त्याला वंदनीय बाळासाहेबांचा शिवसैनिक आणि एकनाथ शिंदे साहेबांचे कट्टर कार्यकर्ते कामराच तोंड काळं करून त्याला तुडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचं संजू भाऊ यांनी म्हटलं आहे.
प्रशांत कोरटकर यानं अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला आहे. मुंबई हायकोर्टात त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात प्रशांत कोरटकरचा अटकपूर्व जामीन अर्ज कोल्हापूर कोर्टाने फेटाळून लावला होता. त्यानंतर त्याने मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. दरम्यान, कोरटकरला आज, तेलंगणातून अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ओमकार सातपुते अमानुष मारहाण प्रकरणी धनंजय देशमुख यांचे साडू दादासाहेब खिंडकर यांच्यासह इतर लोकांवरती पिंपळनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे दादासाहेब खंडकर 14 दिवसांच्या न्यायालयाने कुठली मध्ये आहे जिल्हा कारागृहामध्ये दादासाहेब खिंडकरची प्रकृती खालावल्यामुळे आणि अस्वस्थ पण आल्यामुळे आरोपी दादासाहेब खिंडकर ला बीड जिल्हा रुग्णालयामध्ये ऍडमिट करण्यात आले आहे दादासाहेब खिंडकर वरती वार्ड क्रमांक सहा मध्ये उपचार सुरू आहेत.
मुंबईतील स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराच्या सेटची तोडफोडीप्रकरणी ४० जणांवर गुन्हा दाखल केला होता. १२ जणांना अटक केली होती. दरम्यान, १२ शिवसेना कार्यकर्त्यांना जामीन मिळाला आहे. या कार्यकर्त्यांनी अलीकडेच मुंबईतील 'हॅबिटॅट स्टुडिओ'ची तोडफोड केली होती. जिथे कामराने शो सादर केला होता.
बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएस, एमबीए इंटिग्रेटेड आणि एमसीए इंटिग्रेटेड या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या सीईटीसाठी अर्ज करण्याची मुदत संपली आहे. मात्र, विद्यार्थी हिताचा विचार करून आता अर्ज करण्यास दि. २८ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
यापूर्वीही दोन वेळा मुदतवाढ दिली होती. आता तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. ज्यांनी अर्ज केले; पण शुल्क भरले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना अर्जाची प्रक्रिया पूर्ण करता येईल, तसेच अद्यापपर्यंत काही विद्यार्थ्यांनी अर्ज केले नाहीत, त्यांनाही अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करणारा प्रशांत कोरकटकरला अटक झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तेलंगणातून त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून तो फरार होता. मात्र, आता तो पोलिसांच्या तावडीत सापडला आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाला एका महिलेने भर रस्त्यात मारहाण केली आहे. ही घटना कल्याण अहिल्याबाई चौक परिसरात घडली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय . मोहन उगले असे माजी नगरसेवकाचे नाव आहे तर, मारहाण करणाऱ्या महिलेचे नाव राणी कपोते असे आहे .
सोलापुरात अवकाळी पावसाची हजेरी.
सकाळपासून सोलापुरात प्रचंड उकाडाही जाणवत होता.
अचानक वातावरणात बदल होऊन पावसाची जोरदार सुरुवात झाली.
मागील काही दिवसात चाळीशी पार तापमान असताना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला.
स्टँडअप कॉमेडिनय कुणाल कामरा विरोधात अकोल्यात शिंदे गटाने आक्रमक होत धिग्रा चौकात आंदोलन केलंय. कुणाल कामरा यांच्या प्रतिमेला जोडे मारो असं हे आंदोलन केलं. आमदार गोपीकिशन बाजोरिया, जिल्हाध्यक्ष अश्विन नवले आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकारी देखील आंदोलनात सहभागी होते. कुणाल कामरा यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एका काव्याच्या माध्यमातून खिल्ली उडवली होती. त्यानंतर राज्यभरात शिवसैनिक आक्रमक झाले होते. अकोल्यातल्या धिग्रा चौकात शिवसैनिकांनी कामरा याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देत जोडे मारो आंदोलन केले.
महसूल प्रशासनातील महिला अधिकारी पीएमआरडीएच्या अप्पर जिल्हाधिकारी स्नेहल बर्गे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहेय. वयाच्या 48 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हवेली तालुक्याच्या प्रांताधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द उल्लेखनीय राहिली. अवैद्य गौण खनिज उत्खनन व वाहतूक यावर त्यांनी कडक कारवाई केली. अनेक अपील प्रकरणे विहित मुदतीत मार्गी लावली होती.त्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी म्हणून त्यांना पदोन्नती झाल्यानंतर त्यांनी पीएमआरडीएचा कार्यभार सांभाळा होता. त्यांच्या आई भारती बर्गे या डॉक्टर तर बहीण पल्लवी बर्गे या जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
अमानुष मारहाण प्रकरणी सतीश रूप खोक्या भोसले ला दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती त्याच्यानंतर त्याला आज शिरूर न्यायालयात हजर करण्यात आले होते
त्याला न्यायालयाकडून बॅटच्या साह्याने अमानुष्मान प्रकरणी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सोनवण्यात आली आहे
सतीश रुपये खोक्या भोसले वरती वेगवेगळ्या स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल आहेत त्यापैकी आजपर्यंत दोन गुन्ह्यात त्याला न्यायालयाने कुठून मिळाले आहे
आणखी तीन गुन्हे पेंडिंग आहेत त्याला न्यायालयीन कोठडी मिळताच पुन्हा दुसऱ्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेतले जाऊ शकते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे
प्रगतिशील शेतकरी शांताराम थोरात यांनी शुगर-फ्री निळ्या बटाट्याच्या उत्पादनाचा प्रयोग हाती घेतला असून, त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. हा प्रयोग मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकतो, अशी आशा व्यक्त केली जात आहे.मंचर हे परिसर प्रामुख्याने बटाट्याच्या शेतीसाठी ओळखला जातो. येथील शेतकरी शांताराम थोरात यांनी स्थानिक कृषी तज्ज्ञांच्या मदतीने निळ्या बटाट्याच्या नव्या जातीवर संशोधन सुरू केले. या बटाट्याची खासियत म्हणजे त्यात नैसर्गिक साखरेचे प्रमाण अत्यंत कमी आहे. पारंपरिक बटाट्याच्या तुलनेत या जातीत ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो
- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाचा वाद मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात?
- नाशिक - त्र्यंबकेश्वर आणि त्र्यंबकेश्वर - नाशिक वाद मुखमंत्र्यांच्या कोर्टात ?
- त्र्यंबकेश्वर - नाशिक असं नाव असावे याबाबत त्र्यंबकेश्वर येथील महंतांनी मुख्यमंत्र्यांकडे काल केली होती मागणी
- तर नाशिक - त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा असेच रेकॉर्ड असल्याचा नाशिकच्या महंतांचा दावा
- तर या वादावर संदर्भ तपासून, साधू महंतांशी चर्चा करून याविषयी अहवाल देणार
- नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची माहिती
- मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढील नाशिक दौऱ्यात कुंभमेळ्याच्या नावाच्या वादावर तोडगा निघणार?
जालना जिल्ह्यातल्या भोकरदन शहरालगत असलेल्या भोकरदन अनवा रोडवर आलापुर शिवारात एका शेतात उभ्या पिकाला आग लागल्याची घटना घडली.यामध्ये शेतात सोंगून ठेवलेली मक्का,गहू त्याच बरोबर इतर पीक जळून खाक झाले आहे.या शेतातून विजेचे तार गेले आहेत.आणि याच तारांचा एकमेकांना स्पर्श झाल्यामुळे ही आग लागल्याची घटना घडल्याची माहिती आहे.जवळपास 20 ते 22 एकर क्षेत्रावर ही आग लागली होती त्यापैकी 14 ते 15 एकर क्षेत्रावरील मक्का आणि गव्हाचं पीक हे जळून खाक झालय.शिवाय ठिबक आणि तुषार सिंचनाचे पाईप हे देखील जळाल्याने मोठ नुकसान झालंय.घटनेची माहिती मिळताच भोकरदन नगर परिषदेच्या अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.
पुणे पोलिसांनी मागील वर्षी जप्त केलेल्या ड्रग्स ची उद्या होणार विल्हेवाट
पुणे पोलिसांकडून उद्या ७८८ किलो ड्रग्स केले जाणार नष्ट
एम डी, गांजा, कोकेन, एल एस डी, हेरॉईन या सारखे अमली पदार्थांची उद्या चाचणी, पंचनामा केल्यानंतर केली जाणार विल्हेवाट
पुणे पोलिस मुख्यालयात या आधी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक, प्रदूषण कंट्रोल बोर्ड, रासायनिक विश्लेषण कंपनीचे अधिकारी उपस्थित राहणार
ललित पाटील कारवाईतील ड्रग्स वगळता इतर सर्व ड्रग्स ची विल्हेवाट
कुणाल कामाराच्या कार्यालयाची तोडफोड शिवसेनेने केली नाही, शिंदे गटाने केली.
उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री
जे चोरी करतात, ते गद्दारच.
उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री
नंबर प्लेट नसलेल्या गाड्यांसह फिरत असलेल्या टोळीवर ग्रामस्थांना संशय
संशयाची चाहूल लागतात चोरटे पळून गेले, मात्र ग्रामस्थांनी पाठलाग करून त्यांना पकडलं
चार आरोपींना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं,तर दोन आरोपी फरार झाले
चोरट्यांकडून सुरा, कटर, स्क्रू ड्रायव्हर, असं विविध साहित्य जप्त करण्यात आले
शनिवारी रात्री चोरटे पकडण्यासाठीचा हा थरार घडला
निवृत्त सरकारी कर्मचाऱ्याला पॉलिसी काढण्याचा आमिष दाखवून त्याची जवळपास दोन कोटी तीस लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीला पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या सायबर पोलिसांनी बेड्या ठोकले आहेत.
लक्ष्मण कुमार पुनारामजी प्रजापति, याला पुण्यातून तर भूपेंद्र जीवनसिंग जीना आणि लक्ष्मण सिंग सन ऑफ हरिंदर सिंग याला दिल्लीतून सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या तिन्ही आरोपींनी मिळून एम पी सी आय अधिकारी असल्याचे सांगून पिंपरी चिंचवड शहरातील एका निवृत्त कर्मचाऱ्याला तसेच देशातील काही जणांना कोट्यावधी रुपयाचा आर्थिक गंडा घातल्याचा पोलीस तपासात उघडकीस आला आहे.
- कुंभमेळ्याच्या नावावरून वादाला फुटलं तोंड
- नाशिकच्या कुंभमेळ्याला नाशिक- त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा न म्हणता त्र्यंबकेश्वर-नाशिक कुंभमेळा म्हणावं
- त्र्यंबकेश्वरच्या साधू महंतांच्या आखाड्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी
- मात्र या मागणीला नाशिकच्या साधू महंतांचा विरोध
- तर पूर्वीपासून असलेलं नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा नावंच कायम ठेवा, नाशिकच्या आखाड्यांमधील साधू महंतांची मागणी
- नाशिकच्या साधू महंतांची भुमिका मनपा आयुक्तांकडे मांडणार
- काल त्र्यंबकेश्वरच्या साधूनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर आजच्या बैठकीला महत्व
- कुंभमेळा प्राधिकरणात साधू महंतांचा समावेश करण्याची देखील मागणी
- दरम्यान यासंदर्भात नाशिकमधील साधू महंतांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी अभिजीत सोनवणे यांनी
- साधू महंत चौपाल
कुणाल कामरा याच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून स्टुडिओची तोडफोड करण्यात आली होती या प्रकरणी खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर 40 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता यातील प्रमुख आरोपींमध्ये राहुल कनाल कुणाल सरमळकर अक्षय पनवेलकर यांच्यासह एकूण 11 जणांना अटक करण्यात आली होती थोड्याच वेळात अटक करण्यात आलेल्या आरोपींना वैद्यकीय तपासणीनंतर वांद्रे न्यायालयात दाखल केले जाणार आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता त्यांच्यावर सुद्धा केलं गाणं
गाण्यातून मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका
कुणाल कामरा यांच्या इतर व्हिडिओ मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी,अमित शहा, निर्मला सीतारामन, देवेंद्र फडणवीस, ईडी,सीबीआय, आरएसएस या सर्वांचा समाचार
कामरा याच्या व्हिडीओतून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा साडी वाली दीदी असा उल्लेख
परळीतील व्यापारी महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास गेवराई पोलीस उपाधीक्षकांकडे वर्ग
गेवराई चे उपाधीक्षक एन.बी. राजगुरू करणार आता महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास
याआधी अंबाजोगाईचे उपाधीक्षक अनिल चोरमले हे या प्रकरणाचा तपास करत होते
महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिलेला अल्टीमेटम 3 एप्रिल रोजी संपत आहे
दंगलीचा मास्टर माईंड फईम खान व खोक्या भोसले यांच्या बेकायदेशीर घरावर कायदेशीर बुलडोजर चालवून धडा शिकविल्याबद्दल राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकररींनी मानले आभार.. मात्र छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या शिवद्रोही प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापुरकर यांच्याही बेकायदेशीर बाबींची चौकशी करुन बुलडोजर चालवावे, आमदार अमोल मिटकरी यांची ट्विट करत मागणी.
अमोल मिटकरी
पुणे शहरातील वाढत्या गरफोडी, वाहनचोरी, सोन साखळी चोरीचा घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेकडून तीन पथकांची नेमणूक
एक अधिकारी नऊ कर्मचारी असे दहा जणांचे पथक असणार
प्रत्येक पथकाला त्यांचा टास्क ठरवून दिला आहे विशेष म्हणजे घरफोडी, वाहन चोरी आणि सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांवर ही पथके काम करत आहेत
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळणार अतिरिक्त मनुष्यबळ
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेमध्ये सध्या कार्यरत 364 कर्मचारी
आणखी दोनशे कर्मचाऱ्यांची यामध्ये पडणार भर
राज्य सरकारला पत्र लिहून रायगडावरील वाघा कुत्रा समाधी हटवण्याची केली आहे मागणी
राज्यचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं आहे पत्र
वाघा कुत्रा नामक पात्र इतिहासाच्या कोणत्याही संदर्भात आढळत नाही
काल पुणे येथे सिने कलाकार आमिर खानने स्व. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. मुलांचे सांत्वन केले.
पुण्यात बालेवाडी स्टेडियम येथे पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात अमिर खान या मुलांना भेटले.
संतोष देशमुख यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाणी फाउंडेशन मासाजोग येथे काम करणार असल्याची माहिती मिळत आहे.
सध्या मस्साजोग येथे नाम फाउंडेशनच्या वतीने नदी खोलीकरण रुंदीकरणाचे काम चालू आहे
मी पैलवान आहे तुमच्यात दम असेल तर मैदानात या असे थेट आव्हान फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर यांना दिले आहे.
एका महिलेला अश्लील फोटो पाठवल्या प्रकरणी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे अडचणीत आले आहेत. त्यांनतर गोरे यांना विरोधकांकडून खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावर गोरे यांनी टोलेबाजी केली.
मी पैलवान आहे. हा गडी आता ऐकत नाही म्हटल्यावर डोळ्यात माती टाकण, चालवण्याचा प्रयत्न केले जातात.
शेवटी माय माऊलीला पुढं करून मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. मी पैलवान आहे तुमच्यात दम असेल तर मैदानात येऊन लढा असा थेट आव्हान दिले आहे.
जयकुमार गोरे दोन दिवस पंढरपूर भागात होते. यावेळी त्यांनी रामराजे नाईक निंबाळकरांवर जोरदार हल्लाबोल केला.
रमजान आणि पाडव्या दरम्यान कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी.
याकरिता बीडच्या परळी शहरात पोलिसांचे पथसंंचलन पार पडले. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
सद्य परिस्थिती लक्षात घेता रमजान आणि पाडवा या दोन्ही सणाला कोणतेही गालबोट लागू नये.. यासाठी पोलीस प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.
तसेच नागरिकांनी शांतता राखावी असे आवाहन प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समधी हटवण्याची मागणी छत्रपती संभाजी महाराज यांनी केली आहे. त्यांच्या मागणीला मराठा सेवा संघाने पाठिंबा दिला.
मराठा सेवा संघाचे वैभव खेडेकर यांनी आज पंढरपुरात छत्रपती संभाजी महाराज यांनी मांडलेल्या भूमिकेचे मराठा सेवा संघ स्वागैत करत आहे.
यापूर्वी संभाजी ब्रिगेड ने या विरोधात आंदोलन करून ही वाघ्या कुत्र्याची समाधी हटवली होती. परंतु राजकीय दबावा नंतर पुन्हा समाधी बांधण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास समोर यावा अशी पेक्षाही खेडेकर यांनी व्यक्त केली.
मराठा आरक्षणाचा प्रश्न हा सामाजीक राहिला नसून तो राजकीय झाला आहे.त्यामुळे तो प्रश्न कधी सुटेल हे सांगता येणार नाही.
जगतीकीकरणामुळे अनेक क्षेत्र खुली झाली आहेत. त्यामध्ये मराठा समाजातील तरूणांनी प्रवेश करावा असे आवाहन ही त्यांनी केले आहे.
दोन्ही जिल्ह्यात ४०.५ अंश डिग्री सेलिसिअस इतक्या तापमानाची नोंद
मुंबई, कोकण वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी पारा स्थिर
अमरावती, नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर मध्ये पारा ३८ च्या पुढे
पुण्यात देखील रविवारी ३७.८ डिग्री तापमानाची नोंद
अहिल्यानगर मध्ये सकाळी कमाल तापमान ३७ तर किमान १५.७ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद
नागपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचारात ३ डीसीपींसह ३३ पोलीस कर्मचारी जखमी झाले. विशेषतः महिला पोलिसांवर हल्ला करण्याचा आणि त्यांच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न झाला, ही घटना अत्यंत निंदनीय असल्याचे मत भाजप आमदार सुलभा गायकवाड यांनी व्यक्त केले.या घटनेच्या निषेधार्थ कल्याणमध्ये सज्जनशक्ती संविधान सन्मान मंचच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले. यात भाजप आमदार सुलभा गायकवाड यांच्यासह विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. हातात निषेदाचे बॅनर घेत जोरदार घोषणाबाजी करून यावेळी निषेध करण्यात आला त्याचबरोबर
"पोलीसांवर हल्ला करणारे समाजविघातक घटक आहेत, त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे.महिला पोलिसांवर हल्ला करणे म्हणजे स्त्रीशक्तीचा अपमान आहे, याला कधीही माफ करता येणार नाही."पोलिसांचा सन्मान राखण्यासाठी राज्य सरकारने ठोस पावले उचलावीत."पोलीसांवर हात म्हणजे दहशतवादाला साथ"दंगेखोरांना कठोर करा अशी मागणी देखील यावेळेस भाजप आमदार सुलभा गायकवाड यांच्याकडून करण्यात आली
- टोळक्याकडून तरुणावर धारधार शस्रांनी हल्ला
- रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली घटना
- रितेश लाठे तरुण गंभीर जखमी असून जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
- टोळकं हातात कोयते घेऊन परिसरात फिरतांना दिसल्यावर वारंवार टोकत असल्यानं केला हल्ला
- नाशिकच्या पाथर्डी शिवारातील स्वराज्य नगरातील घटना
- इंदिरानगर पोलीस ठाण्यात ५ जणांवर गुन्हा दाखल
- संशयित आरोपींमध्ये अल्पवयीन मुलांचाही समावेश
- इंदिरानगर पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू
कांदा हे पीक राजकीय मुद्दा बनत चालला आहे. वारंवार कांदा उत्पादकांवर या देशात अन्याय होत आलेला आहे. ज्यांना कांदा खायला महाग वाटतो अशांनी निश्चितपणे शेतकऱ्यांच्या बांधावर यावं, कांदा लावावा, त्यावर खुशाल रात्रभर झोपावं. परंतु, शेतकऱ्यांची माती करू नये. असे वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केले आहे. ते सांगलीच्या इस्लामपूर मध्ये बोलत होते.
- 10 वाजता नंतर मनपा करणार तोड काम कारवाई करणार आहे...
- फहिम खानच्या घराचा अतिक्रमण भाग मनपा पाडणार
- तोडकाम कारवाईच्या आधी फहिम खानच्या परिवाराने रात्री घर रिकामे केलं
- फहिम खानच्या आईच्या नावाने घर असल्याची माहिती
- EWS अंतर्गत NIT ने 30 वर्षाच्या लीज वर खानच्या परिवाराला जागा दिल्याची माहिती
- मनपा कारवाईच्या पार्श्वभूमीवर यशोधरा नगर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
- स्थानिक पोलीस, एसआरपीएफच्या दोन तुकड्या परिसरात तैनात, तसेच इतर पोलीस स्टेशनकडून मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे...
साताऱ्यातील माण तालुक्यातील गोंदवले बु. येथील योगेश पवार याचा प्रेयसी रोशनी माने हिने आई पार्वती माने आणि साथीदारांच्या मदतीने खून केल्याचे उघड झाले आहे. योगेश आणि रोशनीचे प्रेमसंबंध होते, आणि योगेशने तिला लाखो रुपये उसने दिले होते. पैसे परत मागितल्याने रोशनीने १८ मार्च रोजी योगेशला नरवणे येथे बोलावून धारदार शस्त्राने खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह स्विफ्ट कारमध्ये टाकून फडतरी येथील कॅनॉलमध्ये फेकला.योगेशच्या भावाने तक्रार दिल्यानंतर पोलिस तपासात या प्रकरणाचा छडा लागला आहे.रोशनी, तिची आई पार्वती आणि दोन साथीदारांना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
संतोष देशमुख आणि धनंजय देशमुख यांच्या मुलाची भेट घेत आमिर खानने केले दोन्ही मुलांचे सांत्वन केले.
पुण्यात बालवाडी स्टेडियम येथे पाणी फाऊंडेशन च्या कार्यक्रमात अमिर खान यांनी धनंजय देशमुख व संतोष देशमुख यांचा मुलगा विराज देशमुख यांची भेट घेऊन सांत्वन केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी शेजारी अचानक वाघ्या कुत्रा आला कुठून? कुठलाही ऐतिहासिक संदर्भ नसताना विनाकारण खोट्या इतिहासाचे उदबत्ती करण का केलं जात आहे. संभाजी ब्रिगेडला तो मान्य नाही...
या अगोदर सुद्धा एक ऑगस्ट 2012 साली संभाजी ब्रिगेडने वाघ्या कुत्रा काढून टाकला होता, प्रशासनाने तो परत बसवला. सरकारने स्वतः प्रायोरिटी वर वाघ्या कुत्रा काढून टाकावा...
औरंगजेबाच्या कबरीपेक्षा वाघ्या कुत्रा डेंजर आहे.
कारण तो शिवाजी महाराजांच्या 'समाधी' शेजारी चिटकून उभा आहे.
मुख्यमंत्र्यांनी तात्काळ निर्णय घेऊन तो काढून टाकावा अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे.
जालन्यात मोबाईल, टॅब आणि एटीएम कार्ड असलेली बॅग चोरणाऱ्या एकास पोलिसांनी जेरबंद केलय. जालन्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केलीय.
या कारवाईत 25 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय.
कदिम जालना पोलीस ठाणे हद्दीतील सोमेश्वर महादेव मंदिर परिसरातून एका व्यक्तीची मोबाईल, टॅब आणि एटीएम कार्ड असलेली बॅग अज्ञाताने चोरी गेली होती.
या प्रकरणी कदिम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता.
या घटनेचा तपास करत असताना गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 2 तासात मोबाईल, टॅब आणि एटीएम कार्ड असलेली बॅग चोरी करणाऱ्या चोराच्या मुसक्या आवळल्या आहेत.
दीपक नाईकवाडे (रा. शनि मंदिर जालना) असं ताब्यात घेण्यात आलेल्या या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी या कारवाईत एकूण 25 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या घटनेचा अधिक तपास जालना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस करीत आहेत.
गोरगरीब सर्वसामान्यांचे प्रवासाच साधन असणारी ब्रिटिशकालीन शकुंतला एक्सप्रेस सात वर्षांपूर्वी अचानक बंद करण्यात आली.
अचलपूर मूर्तिजापूर यवतमाळ असा 120 किमी चा प्रवास या शकुंतला एक्सप्रेस चा होता मात्र डीपीआरचे कारण सांगून ही शकुंतला एक्सप्रेस अचानक बंद करण्यात आले.
ही एक्सप्रेस सुरू करावी यासाठी रेल्वे मंत्रालयापासून तर खासदारापर्यंत सर्वांनाच निवेदन देण्यात आले
अखेर आज शहीद दिनी अचलपूर चांदूरबाजार नाक्यावर शकुंतला एक्सप्रेस सुरू करावी या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले
यावेळी अचलपूर मतदार संघाचे आमदार प्रवीण तायडे या मार्गावरून जात असताना त्यांना देखील निवेदन देऊन हा मुद्दा विधानसभेत उचलावा अशी आंदोलन कर्त्यांनी मागणी केली.
संतोष देशमुख आणि धनंजय देशमुख यांच्या मुलाची भेट घेत आमिर खानने केले दोन्ही मुलांचे सांत्वन
पुण्यात बालवाडी स्टेडियम येथे पाणी फाऊंडेशन च्या कार्यक्रमात अमिर खान यांनी धनंजय देशमुख व संतोष देशमुख यांचा मुलगा विराज देशमुख यांची भेट घेऊन सांत्वन केले
भंडाऱ्याच्या साकोली येथील मोनो ऍग्रो इंडस्ट्रीजच्या बंदिस्त पोल्ट्री फार्ममध्ये रात्रीच्या सुमारास एका बिबट्यानं प्रवेश केला. यानंतर तिथं धुमाकूळ घालीत बिबट्यानं कोंबड्यांवर झडप घालून १२ कोंबड्या फस्त केल्यात. पोल्ट्री फॉर्ममधील बिबट्याचा संपूर्ण धुमाकूळ आणि थरार तिथं असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय. राष्ट्रीय महामार्गावर पहाटेच्या सुमारास अनेक नागरिक फिरायला जातात. त्याचं भागात असलेल्या या पोल्ट्री फार्ममध्ये बिबट्यानं धुमाकूळ घालून कोंबड्या फस्त केल्याची घटना घडल्यानं फिरायला जाणाऱ्या नागरिकांमध्ये कमालीची भीती पसरली आहे. वन विभागांनं बिबट्या असो किंवा वन्यप्राणी यांचा तातडीनं बंदोबस्त लावावा, अशी मागणी केली आहे.
- ११८१ धोकादायक वाडे आणि इमारतींना महापालिकेच्या नोटिसा
- ११८१ धोकादायक वाडे आणि इमारती नागरिकांनी स्वतःहून काढून घ्यावे
- नागरिकांनी स्वतःहून धोकादायक वास्तू मोकळ्या न केल्यास पोलिसी बळाचा वापर करण्याचा इशारा
- पोलिसी बळाचा वापर करून धोकादायक वाडे, इमारती खाली करण्याचा इशारा
- पावसाळ्यात धोकादायक वाडे, इमारती कोसळून वित्त आणि जीवितहानी होण्याचा धोका असल्यानं पालिकेकडून नोटीसा
सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय कार्यालयाच्या वतीने आयोजित ग्रंथोत्सव कार्यक्रमाबाबत पालकमंत्री नितेश राणे यांनी नाराजी व्यक्त करत हा जनतेचा पैसा आहे याचा हिशोब द्यावा लागेल, मी याबाबत तक्रार करणार असल्याचं ग्रंथालय अधीका-यांना सुनावलय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आयोजित ग्रंथोत्सव कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री नितेश राणे चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले. पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आलं. यावेळी पुस्तक विक्रेत्यांना चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेली व्यवस्था पाहता नितेश राणे भडकले. पालकमंत्री म्हणून मला किंवा जिल्हाधिकाऱ्यांना या कार्यक्रमाची तुम्ही पुर्व कल्पना का दिली नाही असा सवालही नितेश राणे यांनी उपस्थित केला.
रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यातील कुडगाव येथे बेकायदा गर्भपाताचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गावातील डॉक्टर शंकर रंगराव कुंभार याच्याविरोधात दिघी सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर डॉक्टर फरार झाला असून कोणाताही वैद्यकीय अधिकार नसताना या डॉक्टरने एका गर्भवती महिलेला गर्भपातासाठी गोळ्या दिल्या. या गोळ या खाल्ल्यानंतर तिला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. तीला तातडीने श्रीवर्धनच्या सरकारी रूग्णालयात दाखल करून उपचार केल्याने तिचे प्राण वाचले आहेत. दरम्यान डॉक्टर कुंभार याच्याविरोधात अनेक तक्रारी आहेत. मेडीकल कौन्सीलने त्याच्या चौकशीचे आदेश दिले होते परंतु आरोग्य विभागाने त्याची कुठलीच चौकशी केली नसल्याचे समोर आले आहे.
धाराशिव च्या परंडा तालुक्यातील हिंगणगाव येथे महसुल विभागाच्या पथकाने अवैध वाळु साठ्याचा पंचनामा करून 32 ब्रास वाळु जप्त केल्याची कारवाई केली आहे.हिंगणगाव शिवारातील नदी पाञातुन वाळु तस्कर मागील अनेक महीन्यापासुन अवैध उत्खनन करुन वाळु ची तस्करी करत आहेत दरम्यान हिंगणगाव येथुन वाळुची चोरी करून बार्शीकडे चोरटी वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती महसुल पथकाने ही कारवाई केली आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या घाटी हॉस्पिटलमध्ये पिण्यासाठी पाणी मिळत नसल्यानं रुग्णांच्या नातेवाइकांना पाण्याची बाटली घेऊन पाणी शोधावे लागत आहे. पाण्यासोबत रक्तदान शिबिरांचे प्रमाण कमी झाल्याने घाटीतील विभागीय रक्त केंद्रात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रक्तासाठी रुग्णांच्या नातेवाइकांना खासगी रक्तपेढ्यांकडे धाव घ्यावी लागत आहे. घाटीतील विभागीय रक्त केंद्रात दररोज किमान ५० ते ६० रक्त आणि रक्त घटकांची मागणी असते. परंतु परीक्षेचा कालावधी, वाढता उन्हाचा पारा यामुळे गेल्या काही दिवसांपासून रक्तदानाचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचा परिणाम रक्त केंद्रातील साठ्यावर होत आहे. 'ब्लड इज नॉट इन स्टॉक' असे लिहून देत रुग्णांच्या नातेवाइकांना माघारी पाठविण्याची वेळ ओढवत आहे. त्यामुळे रक्तासाठी घाटीतून खासगी रक्तपेढी गाठण्याची वेळ रुग्णांच्या नातेवाइकांवर ओढवत आहे.दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठीही रुग्णांच्या नातेवाइकांचे हाल होत आहे.
मार्च एंडिंगमुळे वसुलीच्या धावपळीच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर पालिका आणि महावितरण यांच्यात मोठा संघर्ष उफाळला.महावितरणने पालिकेची थकबाकी वसूल करण्यासाठी तिच्या बोटक्लब, प्रवासी व प्रदूषण कर नाके आणि STP आदींचा वीजपुरवठा खंडित केला.परंतु हा वीज पुरवठा खंडित करत असताना वेण्णा लेक या परिसरात पर्यटक आहेत आणि तिथे वीज नसणे हे पर्यटकांच्या जीवावर बेतू शकते याचा विसर महावितरणाला पडला. त्यामुळेच प्रत्युत्तरादाखल पालिकेने महावितरण कार्यालय सील करून त्यांचा पाणीपुरवठा बंद केला.
उघड्यावरच्या संसाराची फरपट करत गावखेड्यातुन डोंगरमाळरानांवर चिमुकल्या लेकरांना घेऊन मेंढपाळ शेळ्या मेंढ्याच्या पोटाचं खळगं भरण्यासाठी कडाक्याच्या उन्हात मेंढपाळ भटकंती करतोय अशातच सुर्य आग ओकतोय त्याचा सर्वाधिक फटका मुक्या पाळीव जनावरांवर होतोय यातून शेळ्या मेंढ्यांना सर्दी डोकेदुखी ताप आणि जुलाब इतकंच काय शेळ्या मेंढ्यांना उष्माघाताने मृत्युलाही कवटाळावं लागतय कधीच न अनुभवलेले हे तापमान माणसांना तर धोकादायक आहे पण त्याहुनही प्राणी जनावरांसाठी जीवघेणंच आहे
- शेळ्या मेंढ्यावर उष्माघाताचा सर्वाधिक परिणाम. .!
- शेळ्यां मेंढ्या गरम चारा खात नसल्याने उपाशी पोटी रहातात...!
- उन्हाचा थेट मेंदूवर परिणाम ,विविध आजारांची लागण होते..!
- शेळ्या मेंढ्याचे गर्भपात होतात..!
- पचनशक्तीवर थेट परिणाम..!
- चारा खाण्याचे प्रमाण घटल्याने वजनही घटते..
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातल्या दोन जणांचा थायलंडमध्ये 24 वर्षीय रशियन महिलेवर बलात्कार, सीसीटीव्ही फुटेज च्या आधारावर दोन्ही संशयित आरोपींना थायलंडमध्ये अटक करण्यात आली आहे.
नागरिकांच्या 4 महिन्यांपासून तक्रारी प्रशासनाची दुर्लक्ष...
वारंवार ड्रेनेज तुंबून मैलापाणी घरात येत असल्याने त्याची दुर्गंधी परिसरामध्ये पसरली आहे.
48 तासात दुरुस्ती न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा मनसेचा इशारा....
बाणेर भागातील ड्रेनेज दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी.
बाणेर भागातील औंध-बाणेर लिंक रोडवरील सायकर मळा येथे २०० ते ३०० लोकवस्तीच्या ठिकाणी ४ महिने झाले ड्रेनेज लाईन तुंबून त्याचे मैलापाणी तेथील रहिवाश्यांच्या घरामध्ये शिरत असल्याचा नागरिकांचा आरोप.
पुण्यात घरफोड्या आणि वाहन चोरी करणाऱ्या या 'बारक्या टोळी'च्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. पोलिसांनी पुणे शहरातील जवळपास सहा वेगवेगळे गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपींकडून सोन्याच्या दागिन्यांसह चार मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. बारक्या टोळीकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांकडून १० लाख ३२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने तर दोन लाख ४० हजार रुपयांच्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी 'बारक्या टोळी'च्या पृथ्वीराज उर्फ साहिल संतोष आव्हाड, आनंद लोंढे, आर्यन आगलाव, कुलदीप सोनवणे आणि एका अल्पवयीन तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
शहरातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी गुन्हे शाखेकडून तब्बल 30 हजार गुन्हेगारांचा डेटा एकत्र करण्यात आला आहे.
हा सर्व डेटा पुणे पोलिसांनी त्यांच्या मायसेफ क्राईम मोड्यूलवर जमा केला आहे.
त्यामध्ये गुन्हेगाराचे पुर्व रेकॉर्ड, तो राहत असलेले वास्तव्याचे ठिकाण नोंदविण्यात आले आहे.
स्थानिक पोलिस ठाणे आणि कॉप्स 24 च्या बीट मार्शलनी हे गुन्हेगार किती वेळा याची सर्व माहिती असून, गुन्हेगार वर्गवारीनुसार तपासले जाणार आहेत.
पुणे शहरातील सर्व पोलिस ठाण्याच्या आवारातून ही वाहने चतुःश्रृंगी वाहतूक विभागाच्या परिसरातील जागेत ठेवण्यात आली आहेत.
या वाहनांमध्ये 1 हजार 473 दुचाकी, 24 तीन चाकी तर 99 चार चाकी गाड्यांचा समावेश आहे. त्यातील 950 बेवारस वाहनांचा लिलाव होणार आहे.
पतीला झाला पॅरालिसिस पत्नीने बँक खात्यातून काढले तब्बल दीड कोटी रुपये
सासूने सूनेविरोधात अलंकार पोलीस ठाण्यात दिली तक्रार
आजाराच्या उपचारासाठी बँक खात्यात उरले नाहीत पैसे ऑनलाइन पध्दतीने पत्नीने काढले पैसे
७४ वर्षीय सासूने सूनेविरोधात दिली तक्रार
बिल थकल्याने कर्मचाऱ्यांचे उपचार झाले बंद
कमी खर्चात अंशदायी योजनेतून कर्मचारी आणि कुटुंबातील सदस्यांवर उपचार केले जातात
मात्र बिल थकीत असल्याने उपचार बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती
८ हजार ३०० एकूण पीएमपी कर्मचारी संख्या आहे आणि करार रुग्णालयाची संख्या आहे ६०
महिन्याला ७५ लाख कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी कपात होणाऱ्या पैशातून निधी होतो जमा
६४८ कोटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे
संशोधन प्रकल्पावर मोठ्या प्रमाणात भर दिला जाणार आहे
अर्थसंकल्पात ८२ कोटीचिव तूट दाखवण्यात आली आहे
शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्थसंकल्पात केली तरतूद
ज्या सातही गावांचा नव्याने ड्रोन सर्व्हे करून सीमा निश्चिती करण्यात येणार आहे. याबाबत एमआयडीसीकडून निविदा प्रसिद्ध केली आहे.
२६ मार्च ते ९ एप्रिल या कालावधीत निविदा भरून द्यायच्या आहेत. यासाठी शासनाने संकेतस्थळ जाहीर केले आहे. यावरून निविदा अपलोड करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पुरंदर विमानतळाच्या बांधणीला वेळ आलाय
विद्यापीठात अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आता मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्रात (सीओडीई) पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन एकाच वेळी दोन पदव्या घेऊ शकतील.
यासाठी मुंबई विद्यापीठ आणि सीओईपी विद्यापीठात करार झाला
विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आणि सर्जनशीलता वाढवण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला
असे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.
वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील श्री सतीआई संस्थान येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात यात्रोत्सव, भागवत सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण संपन्न होते. यंदाही सात दिवस चाललेल्या या धार्मिक सोहळ्यात दीपोत्सव, कीर्तन, प्रवचन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात्रेच्या मुख्य दिवशी संस्थानच्या वतीने 45 क्विंटल महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.या वेळी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. मंदिरात विविध धार्मिक विधी पार पडले, ज्यामध्ये भाविकांनी भक्तिभावाने सहभाग घेतला.
राष्ट्रीय लोक अदालतच्या माध्यमातून वाशीम न्यायालयात प्रलंबित असलेल्या अनेक प्रकरणांचे यशस्वी निराकरण करण्यात आले. यामध्ये फौजदारी तसेच हिंदू विवाह कायद्यांतर्गत प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा समावेश होता. लोक अदालतच्या माध्यमातून एकूण १००९ प्रकरणे निकाली काढण्यात आली, ज्यात पूर्व वाद निवाडा अंतर्गत २१६ आणि न्यायालयीन प्रकरणांतील ७९३ प्रकरणांचा समावेश आहे. विशेष मोहिमेअंतर्गत ३७६ प्रकरणे निकाली काढण्यात आली.
सोलापूरहून नागपूरला जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सला पहाटे दरम्यान भीषण अपघात झाला आहे. हा अपघात यवतमाळच्या हिवरी गावाजवळ घडला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रॉंग साईटने येणाऱ्या बेलोरा वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रॅव्हल्सचा अपघात झाला.या अपघातात २५ प्रवासी जखमी झाले असून,त्यांना तातडीने यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. काही प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आली आहे.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून उपचारासाठी दाखल केलं.
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरात महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील लोककलावंत कृष्णाई प्रभाकर उळेकर यांचा रंग भारुडाचे वारी लोककलेची हा रंगतदार लोककलेवर आधारित कार्यक्रम पार पडला शहरातील श्रीराम मंगल कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी उमरगा- लोहारा तालुक्यातील आजी माजी लोकप्रतिनिधी सह विद्यार्थी,विद्यार्थिनी, कला प्रेमी,पोलीस अधिकारी,व्यापारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
* सर्व शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली देण्याचा रंगोत्सवातून प्रयत्न...
* आदिवास्यांचे स्थलांतरण रोखण्यासाठी प्रशासन नागरिकांच्या दारी...
* मेळघाटात होळी या सणाला विशेष महत्त्व.मेळघाट होळी चालते 10 दिवस
* कामानिमित्त स्थलांतरित झालेले मेळघाटवासी होळीला परततात आपल्या मायदेशी...
* हीच बाब हेरत मेळघाट रंगोत्सवाच्या माध्यमातून आदिवासींना जोडण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच आयोजन....
* आदिवासी लोककलेला या माध्यमातून प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न...
* दरम्यान मेळघाटातील आदिवासी बांधवांनी वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य, नाटिका, पथनाट्य सादर करत वेधल लक्ष..
छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करणारा एक चिल्लर माणूस महिना झालं सापडत नाही. कोरटकरला फडणवीस सरकारच लपवतय, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार राजू खरे यांनी केला आहे.
इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना धमकी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य केल्या प्रकरणी कोरटकरवर कारवाईची मागणी केली जात आहे. परंतु कोरटकर अद्याप फरार आहे.
कोटकरला पोलिस आणि सरकार मधील काही लोक वाचवण्याचा प्रयत्न करतायत पण तो सापडला की त्याचा कार्यक्रमच आहे. समोर 240 जणांचे पाशवी बहुमत आहे आम्ही विरोधक 49 आहोत. तरी आमची लढाई सुरू आहे. पंढरपुरातील एका कार्यक्रमात आमदार खरे यांनी कोरटकर प्रकरणीर सरकारवर आरोप केला.
यवतमाळच्या पांढरकवडा तालुक्यातील श्री जगदंबा देवस्थान केळापूर येथे आदिवासी कोलाम समाज बांधवांचा सामूहिक विवाह सोहळा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला या विवाह सोहळ्यात 18 जोडपे विवाह बंधनात बांधले गेले.या सामूहिक विवाह सोहळ्यात १८ आदिवासी जोडप्यांचा धार्मिक व पारंपारिक पद्धतीने विवाह लावण्यात आला.यावेळी आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके,आमदार राजूभाऊ तोडसाम,माजी सभापती संजीवनी कासार आदी मान्यवरांच्या हस्ते वधू-वरांना संसार उपयोगी भांडी व वस्तू भेट देण्यात आल्या.
पुण्यातील स्वारगेट बसस्थानकातील अत्याचार प्रकरणानंतर पुण्याच्या ग्रामीण भागातील एसटी बस स्थानकात ही महाविद्यालयीन तरुणी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असुन रोडरोमिओ,स्थानिक तरुण यांच्याकडुन त्रास दिला जात असुन बसमधील गर्दीचा फायदा घेत महाविद्यालयीन तरुणींची छेड काढली जात असल्याचा धक्कादायक प्रकार घडत असुन शाळा कॉलेज बंद होईल या भीतीपोटी तरुणी त्रास सहन करत आहे यासाठी पोलीसांनी ठोस भुमिका घेऊन रोडरोमिओंसह स्थानिक तरुणांना धडा शिकवावा अशी मागणी होत आहे
औद्योगिक क्षेत्रात गुन्हेगारी टोळ्या अल्पवयीन मुलांचा वापर करुन खेड सेझ भागात कंपन्यांमध्ये काम मिळविण्यासाठी दहशत करत असुन हाणामारी ,खंडणी वसुली असे प्रकार करत असुन या वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीसांनी गुन्हेगारी विरोधात कडक भुमिका घेण्याची गरज आहे
आंबेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने मंचर येथे आंबेगाव, खेड, जुन्नर आणि शिरूर तालुक्यातील पत्रकारांसाठी एकदिवसीय कार्यशाळा पार पडली.या कार्यशाळेत माजी गृहमंत्री दिलीप वळसेपाटील सामचे संपादक निलेश खरे शिवाजी आढळरावपाटील यांनी मार्गदर्शन केले आणि स्थानिक पत्रकारांशी संवाद साधला यावेळी विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणा-या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला
जळगाव यंदाच्या राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे कर्जमाफीच्या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २ लाख ६ हजार ५४ शेतकऱ्यांना ३१ मार्चपूर्वी कृषीकर्जाची परतफेड करावी लागणार आहे. त्यात जिल्हा बँकेतील ४१ हजार ५८ तर राष्ट्रीयीकृतसह अन्य बँकेतील १ लाख ६४ हजार ९९६ खातेदारांचा समावेश आहे अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काही ना काही कर्जमाफीबाबत घोषणा होईल अशी अपेक्षा होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली नाही. मात्र अर्थसंकल्पात कर्जमाफीबाबत कोणतीही घोषणा केली गेली नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांना त्यांचे कर्ज परत फेडावे लागणार आहे. विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यामध्ये शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती.
जळगाव एसटी विभागाच्या बहुतांश बसच्या खिडक्या तुटलेल्या, सीट तुटलेले अशी अवस्था आहे. या खिळखिळ्या झालेल्या बसमधून प्रवासी. व विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागत आहे. या बस तीन वर्षात कालबाह्य होणार आहेत, त्यामुळे जळगांव एसटी विभागातील गाड्यांची संख्या निम्म्यापेक्षा कमी होणार आहे. नवीन बस लवकर न मिळाल्यास जळगाव विभागाच्या प्रवासी सेवेवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.जळगाव एसटी विभागातील अकरा आगारात ७३५ बस कार्यरत आहेत. या बसेस पैकी तब्बल ४५७ गाड्यांची कालमर्यादा तीन वर्षांत संपणार आहे. त्यामुळे या बसेस भंगारात जाणार असून दरवर्षाला सुमारे १०० ते. १५० बसेस कमी होणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.