पुढील काळात पुन्हा भाजपशी युती? आदित्य ठाकरे म्हणाले...

घाणेरडं राजकारण थांबला पाहिजे. हातात राज्याची सत्ता नसल्यामुळे नैराश्यातून हे सुरू आहे.
Aditya Thackeray on Alliance with BJP in future
Aditya Thackeray on Alliance with BJP in futureSaam Tv
Published On

विनायक वंजारी

सिंधुदुर्ग - पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) कोकणच्या (kokan) दौऱ्यावर आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी कुडाळमध्ये पत्रकार परिषद घेऊन कोकण विकासाच्या मुद्यावरून भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधला. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, त्यांच्याकडून जी वागणूक येतं आहे. त्यामुळे मैत्री होणार की नाही हा दुसरा भाग आहे. देशासमोरील विषय हे राजकारणापेक्षा महत्वाचे आहेत. आपल्यावर अन्याय करत असाल तर मैत्रीचा विषय येतो कुठे असा सवाल उपस्थितीत करत आदित्य ठाकरे यांनी भाजपसोबत युतीच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. (Aaditya Thackeray on Alliance with BJP in future)

नाणारबाबत स्थानिकांचा विश्वास महत्वाचा दोन्ही बाजू ऐकून घेईन. पर्यायी जागा शोधण्याचे काम सुरु आहे. प्रदूषण होणार नाही अशाच ठिकाणी हा प्रकल्प होईल असे देखील आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

हे देखील पहा -

पुढे बोलताना ते म्हणाले की, राजकीय षडयंत्र सुरूय. बिगर भाजप राज्यात सुरू आहे. टक्कर द्यायला आम्ही सज्ज आहोतघाणेरडं राजकारण थांबला पाहिजे. हातात राज्याची सत्ता नसल्यामुळे हे सर्व नैराश्यातून हे सुरू आहे, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता लगावला आहे.

पुढे आदित्य ठाकरे म्हणाले की, एअरपोर्ट व मेडिकल कॉलेजचे वचन पूर्ण झालं आहे. सिंधुरत्नचे वचन पूर्ण करतोय. रत्नागिरी एअरपोर्टला १०० कोटींची तरतूद केली आहे. महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी ठरत आहे.

Aditya Thackeray on Alliance with BJP in future
अनंत गितेंचे शिवसेनेला विस्मरण; आदित्य ठाकरेंच्या स्वागताच्या बॅनरवरून गितेंचे छबी गायब

आमदारांच्या नाराजी बाबद आदित्य ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. दोन पक्ष जिथं एकमेकांविरोधात लढल्याने थोडीशी नाराजी असणं स्वाभाविक आहे. महाविकास आघाडीतील नेते एकत्र बसून नाराजी दूर करतील. तानाजी सावंतांच वैयक्तिक मत होते. भेदभाव न करता पुढे जावं लागेल. नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरु आहे असं म्हणत तानाजी सावंत यांच्या विधानावर आदित्य ठाकेरेंनी बोलण्याचं टाळलं.

यशवंत जाधव यांच्या डायरीवरून सुरू असलेल्या राजकारणावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अफवांवर किती बोलायचं आणि अधिकृत गोष्टींवर किती बोलायचं हे महत्त्वाचं आहे. इतरांकडून फिडिंग येतं आणि त्या अफवांच्या बातम्या होतात. त्या खोलात मी जाणार नाही.अफवांवर किंवा बदनामीच्या गोष्टींवर मी बोलणार नाही, असं देखील आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com