अहमदनगर: अहमदनगरच्या राहुरी कारखाना येथे नगर-मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी खड्यात बसून आंदोलन केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नगर-मनमाड महामार्गावर मोठ मोठे खड्डे पडलेले आहे. (A large number of potholes fell on the Ahmednagar-Manmad highway, activities done agitation against government)
हे देखील पहा -
येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना वाट काढत प्रवास करावा लागत आहे. तर अनेकांनी जीव गमावले आहे. त्यामुळे जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी खड्ड्यात बसून नगर-मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. अनेक राज्यांना जोडणारा नगर- मनमाड महामार्ग असून शिर्डी-शनीशिंगणापूर तीर्थ क्षेत्राला भाविक ये-जा करत असतात. रोज हजारो वाहने या महामार्गावरून धावतात. मात्र रस्त्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने अनेक वाहनांचे नुकसान होत आहे. तर अनेकांना जीवही गमवावा लागत आहे.
त्यामुळे लवकरात-लवकर रस्ता दुरुस्त व्हावा यासाठी नगर-मनमाड रस्ता दुरूस्ती कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाला जाग यावी म्हणून खड्ड्यात बसून आंदोलन केलं. यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी परिसर दणाणून टाकला.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.