अकोला: राज्य सरकारनं यावर्षी ई-पीक पाहणी अॅप सुरु केलं आहे. महसूल विभाग आणि कृषी विभागाच्या वतीनं ई-पीक पाहणी हा संयुक्त प्रकल्प राबवण्यात येत आहे. मात्र ई-पीक पाहणी हे अँप अनेक शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरतेय. ग्रामीण भागात नेटवर्कचा प्रश्न आणि अनेक शेतकऱ्यांकडे अँड्रॉईड मोबाईल सुद्धा नाहीत. त्यामुळे आपल्या शेतीची नोंद कशी करावी असा संतप्त सवाल आता शेतकरी विचारत आहेत. तर दुसरीकडे मोबाईल असून सुद्धा अँप चालवावे कसे हे अनेक शेतकऱ्यांना समजत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा ई-पीक पाहणीला अल्प प्रतिसाद मिळत आहे. (E-Peek Pahani app causes headaches to farmers)
हे देखील पहा -
आपल्या शेतात अँड्रॉइड मोबाईलमध्ये पाहत असणारा हा वयोवृद्ध शेतकरी...असे चित्र सध्या राज्यातील अनेक ठिकाणी पाहायला मिळतेय. याचे कारण म्हणजे महसूल विभाग आणि कृषी विभागाच्या वतीनं ई-पीक पाहणी हा संयुक्त प्रकल्प राबवण्यात येत आहे. माझी शेती, माझा सातबारा, माझा पिकपेरा या घोषवाक्याचा आधारे शासनाने सुरू केलेल्या पीक पाहणी करण्याला 15 ऑगस्टला सुरुवात झाली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पीक पाहणी अॅपला शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे. तर काही ठिकाणी महसूल प्रशासनाला पीक पाहणी अॅपचा वापर करावा यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी लागत आहे. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांना कृषी विभाग आणि महसूल विभागाने कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शन केले नाही. त्यामुळे ई-पीक पाहणी हे शेतकऱ्यांसाठी डोकेदुखीच ठरत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
ई पीक पाहणी अॅपद्वारे नोंदवण्यासाठी 15 सप्टेंबर ही शेवटची तारीख असून नोंदणीसाठी आता केवळ चार दिवस उरले आहेत. शेतकऱ्यांना एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. सातबारा उताऱ्यावर ऑनलाईन पद्धतीने खरीप हंगामातील पिकाच्या नोंदणीला अवघे चार दिवस शिल्लक राहिले आहेत. अकोला जिल्ह्यातील नोंदणी करण्यासाठी अनेक शेतकरी बाकी आहेत.
ई-पीक पाहणी या कारणामुळे ठरतेय डोकेदुखी -
जिल्ह्यातील अनेक भागात मोबाईल नेटवर्कची अडचण आहे. ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांना शेतात जाऊन शेताचा आणि शेतकऱ्याचा फोटो अपलोड करावा लागतो. हे करत असताना शेतकरी स्वतः लागतो. त्यामुळे एकाच वेळी अनेक शेतकरी अँपचा वापर करत असल्याने अँपवर माहिती अपलोड करता येत नाही. अँप हँग होते. तर काही शेतकऱ्यांना अँड्रॉइड मोबाईल समजत नाही. अनेक शेतकऱ्यांचे वय जास्त आहेत. तर अनेक शेतकरी हे मयत झाले आहेत. पूर परिस्थितीमुळे शेतात जाता येत नाही. अशा परिस्थितीत डेटा कसा अपलोड करावा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. त्यामुळे आम्हाला ई-पीक बद्दल योग्य मार्गदर्शन करून हा प्रश्न सोडवावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
Edited By - Akshay Baisane
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.