Maharashtra Politics: 90 90 90 नाही, आमची यादी जिंकण्यासाठी आहे, भाजप अध्यक्षांचा मविआला टोला

Chandrashekhar Bawankule : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे. काय म्हणाले ते, जाणून घ्या...
90 90 90 नाही, आमची यादी जिंकण्यासाठी आहे, भाजप अध्यक्षांचा मविआला टोला
BJP Leader Chandrashekhar BawankuleSaam Tv
Published On

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही, प्रतिनिधी

महायुती उमेदवारांची यादी जी आहे, ती जिंकण्याकरिता केलेली यादी आहे. आम्ही 90 90 90 नाही आहोत, आमची यादी जिंकण्याकरिताची आहे, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. ते नांदेड येथील भाजपच्या सभेत बोलताना ते असं म्हणाले.

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीबाबत बोलताना ते म्हणाले की, ''नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी चार जणांची नावे समोर आली आहेत. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचा उमेदवार ठरेल. नांदेड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा एक उमेदवार जाहीर करणे अजून बाकी आहे. उमेदवारांची घोषणा होईल''

90 90 90 नाही, आमची यादी जिंकण्यासाठी आहे, भाजप अध्यक्षांचा मविआला टोला
Radhakrishna Vikhe Patil: 'त्या' वादावर राधाकृष्ण विखे पाटील स्पष्टच बोलले, जयश्री थोरात यांच्याबद्दल काय म्हणाले? वाचा...

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, अनेक ठिकाणी बंडखोरीची शक्यता निर्माण झाली आहे. कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केले असतील. आम्ही सर्व वरिष्ठ नेते एकत्र बसून आमच्या कार्यकर्त्यांची समजूत घालू.''

'शेतकऱ्यांना मोफत वीज'

बावनकुळे म्हणाले, '' देवेंद्र फडणवीस यांनी ऊर्जा मंत्री म्हणून काम केलं आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी एकत्र बसून 44 लक्ष शेतकऱ्यांचे 65 हजार कोटी रुपयाचे विज बिल माफ केलं आहे. पुढचे पाच वर्षे शेतकऱ्यांना वीज बिल येणार नाही. हा आमचा निर्धार असणार आहे. हा आमचा जाहीरनामा असणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा आणि बारा तास वीज देण्याचा आमचा मानस आहे. दीड वर्षानंतर आम्ही सर्व शेतकरी सौर उर्जेवर आणत आहोत.''

90 90 90 नाही, आमची यादी जिंकण्यासाठी आहे, भाजप अध्यक्षांचा मविआला टोला
Ramdas Athawale Upset: भाजपसोबत आलो, आज आरपीआय कुठेच दिसत नाही; रामदास आठवले नाराज, म्हणाले...

ते पुढे म्हणाले, ''आमची महायुती महाराष्ट्राच्या विकासाकरिता काम करीत आहे. आम्ही विकासाकरिता आहोत आणि विरोधी पक्ष हा सत्तेसाठी काम करत आहे. त्यामुळे आमचा एकच अजेंडा आहे की, 14 कोटी जनतेचा विकास महायुती सरकारच्या माध्यमातून करणं.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com