Mumbai Goa Highway : मुंबई - गाेवा महामार्गावर पोलिसांनी रचला सापळा, सावंतवाडीतील युवक अलगद सापडला

या प्रकरणात आणखी काेण आहे का याचा तपास पाेलिसांनी सुरु केला आहे.
Mumbai Goa Highway
Mumbai Goa Highway saam tv

- विनायक वंजारे

Mumbai Goa Highway News : मुंबई - गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway Latest News) कुडाळ (kudal) येथील साळगाव पुलानजीक सिंधुदुर्ग पोलिसांनी (sindhudurg police) तब्बल ७ लाखांचा गुटखा (gutkha) जप्त केला. या कारवाईत एकुण 13 लाखांचा मुद्देमाल पाेलिसांनी जप्त केला आहे. (Maharashtra News)

Mumbai Goa Highway
Chiplun News: 'उद्धव ठाकरेंची अवस्था विक्रम वेताळ सारखी, संजय राऊत त्यांच्या मानगुटीवर'

पोलिसांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या साळगाव पुला जवळ सापळा रचून ही कारवाई केली. यात गुटख्यासह एका चार चाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात बाबाजी नाईक (खासकीलवाडा, सावंतवाडी) यास पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Mumbai Goa Highway
Chhatrapati Sambhaji Nagar : PM आवास याेजना फसवणुक प्रकरणी छत्रपती संभाजी नगरात ईडीची छापेमारी (पाहा व्हिडिओ)

सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र घाट, हवालदार अनिल धुरी, प्रवीण वालावलकर, यशवंत आरमारकर, चंद्रहास नार्वेकर, प्रथमेश गावडे, गुरूनाथ कोयंडे, अमित पालकर यांनी ही कारवाई केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com