धक्कादायक! धुळ्यात 69 प्रशिक्षणार्थी पोलीस जवानांना जेवणातून विषबाधा

29 पोलीस जवानांची प्रकृती चिंताजनक
Dhule News
Dhule NewsSaam Tv
Published On

धुळे- धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील धक्कादायक घटना रात्री उघडकीस आली आहे. रात्रीच्या जेवणानंतर अचानक प्रशिक्षक पोलीस (Police) जवानांना उलट्या, मळमळ व जुलाब चालू झाले. जवळपास 69 प्रशिक्षण घेणाऱ्या पोलीस जवानांना जेवणातून विषबाधा (Food Poison) झाल्याचे उघडकीस आले आहे.

हे देखील पहा -

तात्काळ या सर्व बाधित प्रशिक्षणार्थी पोलीस जवानांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय हिरे महाविद्यालय या ठिकाणी दाखल करण्यात आले. बाधित झालेल्या या 69 पोलीस जवानांपैकी 29 पोलीस जवानांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना उपचारासाठी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर बाकी 40 पोलीस जवानांना प्राथमिक उपचारानंतर बरे वाटू लागल्याने त्यांना पुन्हा पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये पाठवण्यात आले.

Dhule News
मीडियाला माहित होतं, मग पोलीस काय करत होत; फडणवीसांचा सवाल

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी रुग्णालयात धाव घेत बाधित पोलीस जवानांची पाहणी केली व त्यांची विचारपूस देखील केली आहे. या संदर्भातील संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण घेणाऱ्या पोलीस जवानांना विषबाधा कशातून झाली याचा तपास धुळे शहर पोलिसांतर्फे करण्याचे काम सुरू करण्यात आले असून लवकरच या संदर्भातील उलगडा होईल असे पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com