मीडियाला माहित होतं, मग पोलीस काय करत होत; फडणवीसांचा सवाल

पोलिसांची चौकशी व्हायला हवी. हे अतिशय भयावर असे चित्र होते.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSaam Tv

कोल्हापूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी काल एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. विलीनाकरणाच्या मुद्द्यावरुन न्यायालयाने निर्णय दिला असतानाही कर्मचारी (ST Workers) अतिशय आक्रमक झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्यभरातून नेतेमंडळी या प्रकारावर प्रतिक्रिया देत आहेत. यावर आता राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी तिखट शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे.

फडणवीस म्हणाले की, एसीट कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवावेत. मात्र, शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याची माहिती मीडियाला होती, मग पोलीस काय करत होते. पोलिसांची चौकशी व्हायला हवी. हे अतिशय भयावर असे चित्र होते. पोलिसांचे हे मोठे अपयश आहे. या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. या हल्ल्याचा आम्ही निषेधच करतो, अशा शब्दांत फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

हे देखील पहा -

दरम्यान काल देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर करत या घटनेचा निषेद केला होता देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांच्या निवासस्थानी झालेली घटना सर्वथा चुकीची आहे. नेते कुठल्याही पक्षाचे असोत, घरांवर अशी आंदोलने अजीबात समर्थनीय नाहीत. मी या घटनेचा तीव्र निषेध करतो. गेल्या ५ महिन्यांहून अधिक काळपासून एसटी कर्मचारी आंदोलन करीत आहेत. त्यांच्या व्यथा, मागण्या योग्यप्रकारे व योग्य व्यासपीठावरच मांडल्या जाव्यात आणि त्या ऐकून घेतल्या जाव्या, अशी अपेक्षाही या निमित्ताने व्यक्त करतो.

नेमकं काय आहे प्रकरण?

एसटी महामंडळाचं विलीनीकरण शक्य नसल्याचा अहवाल त्रिसदस्यीय समितीनं दिल्यानंतर त्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर एसटी संपाबाबत मुंबई उच्च न्यायालयात काल, गुरुवारी सुनावणी होऊन, त्याबाबत निकाल देण्यात आला. एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घ्यावे असे निर्देश न्यायालयाने दिले होते. २२ एप्रिलपर्यंत कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होण्यास सांगितले होते. राज्य सरकारच्या वतीने परिवहन मंत्री अनिल परब यांनीही कर्मचाऱ्यांना आवाहन केले होते. निश्चित कालावधीत कामावर रुजू झाल्यास कारवाई होणार नाही, असं परब यांनी सांगितलं होतं.

न्यायालयाच्या निकालानंतर आणि सरकारने केलेल्या आवाहनानंतरही एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा अधांतरी राहिला होता. संप मागे घेण्याबाबत कोणतीही ठोस भूमिका मांडली नव्हती. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचं नेतृत्व करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी कर्मचारी आंदोलन करतील, असे आवाहन केले होते. त्यानंतर आज, शुक्रवारी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानासमोर आंदोलन केले. यावेळी एसटी कर्मचारी कमालीचे आक्रमक झालेले दिसले. त्यांनी शरद पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला पवार जबाबदार असल्याचा आरोप काही कर्मचाऱ्यांनी केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com