Latur News : भाजप आमदाराच्या निर्णयाविराेधात ६८ गावे एकवटली, ग्रामस्थांच्या लाक्षणिक उपाेषणास प्रारंभ

bjp mla abhimanyu pawar news : ग्रामस्थांचा विरोध होत असल्याने आता प्रशासन काय निर्णय घेणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
protests against bjp mla abhimanyu pawar, latur news
protests against bjp mla abhimanyu pawar, latur newssaam tv
Published On

- संदिप भोसले

Latur News : लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील कासार-शिरशी महसूल मंडळात ६८ गावांसाठी नव्याने होणाऱ्या अप्पर तहसील कार्यालयास कासार-शिरशी परिसरातील ग्रामस्थांनी विरोध केला आहे. भाजपचे आमदार अभिमन्यू पवार (bjp mla abhimanyu pawar) यांच्या विरोधात आज (बुधवार) ग्रामस्थांनी आंदाेलन छेडलं. (Maharashtra News)

protests against bjp mla abhimanyu pawar, latur news
Pregnant Women Story : गर्भवती महिलेला बांबूच्या झोळीतून न्यावे लागले नदीतून खांद्यावर; हे पाहून शिंदे फडणवीस सरकारला पाझर फुटणार का? (पाहा व्हिडिओ)

आमदार अभिमन्यू पवार यांनी राजकीय स्वार्थासाठी अप्पर तहसील कार्यालय कासार शिरशी येथे करण्याचा डाव रचला आहे असा आरोप करत निलंगा पंचायत समिती समोर आक्रमक झालेल्या आंदोलकांनी आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारत निषेध नाेंदविला. यावेळी त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न आंदाेलकांनी (aandolan) केली.

protests against bjp mla abhimanyu pawar, latur news
Satara News : काळीज पिळवटून टाकणारी घटना... एकाच कुटुंबातील चाैघांनी संपवलं जीवन, सातारा पाेलिसांचा तपास सुरु

ग्रामस्थ म्हणाले कुणीही मागणी केली नसताना आमदार अभिमन्यू पवार यांनी परस्पर निर्णय घेतला आहे. यामुळे ६८ गावांतील (villagers) ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे. परिणामी या निर्णयाविराेधात ग्रामस्थांनी आज आंदोलन छेडले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com