MSRTC: बडतर्फची कारवाई रद्द करा; परभणीत ६६ एसटी कर्मचा-यांची मागणी

उद्यापर्यंत सर्व कर्मचा-यांनी सेवेत रुजू व्हावे असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.
msrtc
msrtcsaam tv
Published On

परभणी : परभणी (parbhani) नियंत्रक कार्यालयाकडून संपातील (st strike) कर्मचा-यांना वारंवार कामावर हजर होण्यासाठी आवाहन करूनही परभणी जिल्हातील चारही आगारातील एसटी कर्मचारी (msrtc employee) संपावर ठाम राहिल्याने एसटी महामंडळ प्रशासनाने ३७० कर्मचा-यांना बडतर्फ केले आहे. दरम्यान त्यापैकी ६६ जणांनी बडतर्फाची कारवाई रद्द व्हावी यासाठी प्रशासनाकडे अर्ज केले आहेत. (parbhani latest marathi news)

गेल्या चार महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. जो पर्यत एसटी महामंडळाचे विलिनीकरण होत नाही, तो पर्यंत माघार नाही असा पवित्रा कर्मचा-यांनी घेतला आहे. त्यामुळे महामंडळाचे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडत आहे.

msrtc
Dapoli: 'जय शिवराय' च्या घाेषणेनं दापोली दणाणली; आमदार याेगेश कदमांचे शक्तीप्रदर्शन

दरम्यान प्रवाशांचे देखील मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याने सरकाराने वेळाेवेळी कठाेर पावलं उचलत कर्मचारी बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला. परभणी विभागीय नियंत्रण कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या जिल्हातील चार व हिंगोली (hingoli) जिल्हातील तीन अशा सात आगारातील संपातील कर्मचा-यांना उद्यापर्यंत (ता. ३१ मार्च) कामावर रुजू होण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे उद्या नेमके किती कर्मचारी सेवेत रुजू हाेतात हे पहावे लागणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

msrtc
Hottal Mahotsav: नऊ एप्रिलपासून होट्टल महोत्सवाचे आयाेजन : डॉ. विपीन इटनकर
msrtc
Satara: उपमुख्यमंत्री अजित पवारांचा शिखर शिंगणापूर यात्रेस ग्रीन सिग्नल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com