नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाचवी ते सातवीची शाळा सुरू...

नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाचवी ते सातवी शाळाची सुरू झाली आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाचवी ते सातवीची शाळा सुरू...
नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाचवी ते सातवीची शाळा सुरू...दिनू गावित
Published On

नंदुरबार: नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाचवी ते सातवी शाळाची सुरू झाली आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. नंदुरबार जिल्ह्यात ग्रामीण दुर्मग भागात आज शालेय विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले आहे. (5th to 7th schools started in rural areas of Nandurbar district)

हे देखील पहा -

आज शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी स्वतः जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे हे भादवड येथील जिल्हा परिषद शाळेवर उपस्थित होते. याठिकाणी विद्यार्थ्यांना पुष्प देत ढोल ताश्याच्या नादात त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शालेय प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. दोन दिवसांपासुनच शाळा सॅनिटायझेशन, विद्यार्थ्यांना घरोघरी जावुन त्यांचे थर्मल आणि पल्स तपासणी मोहीम घेण्यात आली होती. आज विद्यार्थी स्वागत समारंभात काही विद्यार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात पुस्तक वह्यांचे देखील वाटप करण्यात आले. तब्बल १८ महिन्यांनतर शाळा सुरु झाल्याने विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण दिसुन आले.

नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाचवी ते सातवीची शाळा सुरू...
१४ गाव सर्वपक्षीय विकास समितीने घेतली केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची भेट...

नंदुरबार जिल्ह्यात ०५ ते ०७ वी च्या तब्बल ८१० शाळांमध्ये ७८११८ विद्यार्थी असुन आज जिल्ह्यातील निवडणुक क्षेत्रातील शाळा वगळता सर्वत्र शाळा सुरळीत सुरु झाल्या आहेत. शाळांमध्ये अनेक वर्षांनंतर विद्यार्थी मित्र भेटल्याचा आणि त्याहुन ऑफलाईन पद्धतीने शिकण्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसुन येत होता.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com