१४ गाव सर्वपक्षीय विकास समितीने घेतली केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची भेट...

ठाणे महापालिकेने दिवा डम्पिंगसाठी कल्याण ग्रामीण क्षेत्रातील १४ गावामधील भंडार्ली गावात जागा भाडे तत्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे.
१४ गाव सर्वपक्षीय विकास समितीने घेतली केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची भेट...
१४ गाव सर्वपक्षीय विकास समितीने घेतली केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची भेट...प्रदीप भणगे
Published On

दिवा : ठाणे महापालिकेने दिवा डम्पिंगसाठी कल्याण ग्रामीण क्षेत्रातील १४ गावामधील भंडार्ली गावात जागा भाडे तत्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि तसा ठराव सुद्धा मंजूर केला. ठाणे पालिकेच्या या निर्णयाला भंडार्ली ग्रामस्थांनी व १४ गाव सर्वपक्षीय विकास समितीने विरोध केला आहे. भंडार्ली गावात डम्पिंग आणू नये याकरिता १४ गाव सर्वपक्षीय विकास समितीने केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले आहे. भेटीवेळी केंद्रीय मंत्री पाटील यांना डम्पिंग आणि इतर विषयाबाबत समितीने ग्रामस्थांचे म्हणणे सांगितले. (14 Village All Party Development Committee met Union Minister Kapil Patil)

हे देखील पहा -

तर याबाबत समिती अध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी सांगितले की, ठाणे महापालिकेची घाण आमच्या १४ गावात आणण्याचा घाट घातला जात आहे. आमच्या सारखे दुर्दैवी दुसरे कोणी नाही. गावांत पिण्यायोग्य पाणी नाही. आरोग्य केंद्र नाही. हवा, जमिन, पाणी दूषित झाले आहे. त्यात आता डम्पिंग आणले जात आहे. इथे माणसं राहतात, की जनावरे? ठाणे महापालिकेने त्यांच्या हद्दीतच डम्पिंगला जागा शोधावी, महापालिकेकडे भूखंड आहेत. इथे डम्पिंग आणण्याचा प्रयत्न केला तर सर्व ग्रामस्थ मोठे आंदोलन करतील. तर दुसरीकडे मनसे आमदार राजू पाटील यांनी सुद्धा समितीला पाठींबा दिला आहे.

१४ गाव सर्वपक्षीय विकास समितीने निवेदनात काय म्हटलं?

चौदा गावे हि विकासापासुन वंचित आहेत. या चौदागावामध्ये पाण्याचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न असे अनेक प्रश्न येथे भेडसावत आहे. त्यातच दोन-चार दिवसांपासुन वृत्तपत्रांमध्ये छापुन आले की, ठाणे महानगरपालिकेचा घनकचरा आमच्या चौदा गावातील भंडार्ली गावात आणला जाणार आहे, अशा प्रस्तावास सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली आहे. तरी आपणास सांगु इच्छितो की, येथील लोकांना आरोग्याच्या समस्यांना दिवसेंदिवस सामोरे जावे लागते.

येथील विभागात मोठया प्रमाणात अवैधरित्या गोडाऊनमध्ये साठवलेले केमीकल हे पावसाच्या पाण्यात सोडले जाते, त्यामुळे येथील भातशेती व पिण्याचे पाणी पूर्णपणे हानीकारक झाले आहे. त्यामुळे पोटाचे केमिकल जाळले जाऊन त्यामुळे होणारे वायुप्रदुषण या भागात वाढले आहे आणि त्यामुळे श्वसनाचे रोगांना पाचारण केले जात आहे. त्यामध्ये दमा, डी.बी. हदयाचे रोग, कॅन्सर अशा अनेक रोगांना येथील जनतेला सामोरे जावे लागत आहे. अशा प्रकारचे रुग्ण दिवसेंदिवस या गावामध्ये आढळून येत आहे. त्यातच ठाणे महानगरपालिकेच्या या प्रस्तावामुळे येथील जनतेमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. कारण या विभागात विकासावर लक्ष न देता तेथे फक्त समस्या निर्माण करावयाच्या हेच शासनाचे धोरण असेल तर जनता या गोष्टीचा पूर्ण विरोध करते.

१४ गाव सर्वपक्षीय विकास समितीने घेतली केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची भेट...
यूपी पोलिसांनी प्रियंका गांधींना नजरकैद केल्याप्रकरणी कॉंग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया...

मुळतः ठाणे महानगरपालिकेचा घनकचरा आमच्या विभाग टाकणे हे चुकीचे आहे. कारण ठाणे महानगरपालिकेने त्यासाठी आपल्या हद्दीतील जागेत त्याची व्यवस्था करावी. स्वतःला स्वावलंबी व विकसीत महापालिका समजणाऱ्या महापालिकेने प्रथमतः स्वतःचा मलनि:सारण प्रकल्प उभारावा. तरी सुध्दा सर्वपक्षीय विकास समितीच्या माध्यमातुन येथील भुखंडास आमचा विरोध राहिल आणि कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. कायदा सुव्यवस्था बिगडु नये या अनुषगाने सदर प्रकल्पास मान्यता देऊ नये हि चौदा गावातील जनतेकडून नम्रतेची विनंती. अशा प्रकारचं निवेदन मंत्री कपिल पाटील यांना देण्यात आलं आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com