बुलढाण्यातील 550 आरोग्यकर्मींचे तीन महिन्यापासून वेतन नाही !

बुलढाणा जिल्ह्यातील अनेक कोविड सेंटर मधील जवळपास 550 कोविड कर्मचाऱयांचे वेतन गेल्या तीन महिन्यापासून थकले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
बुलढाण्यातील 550 आरोग्यकर्मींचे तीन महिन्यापासून वेतन नाही !
बुलढाण्यातील 550 आरोग्यकर्मींचे तीन महिन्यापासून वेतन नाही !संजय जाधव
Published On

संजय जाधव

बुलढाणा : बुलढाणा Buldhana जिल्ह्यातील अनेक कोविड सेंटर Covid Center मधील जवळपास 550 कोविड कर्मचाऱयांचे Health Workers वेतन गेल्या तीन महिन्यापासून थकले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोना संकटाच्या कठीण काळात घर व कुटुंबाची काळजी न करता स्वतःचे प्राण संकटात टाकून काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांपासून वेतन मिळत नसेल तर फार मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. 550 health workers in Buldhana have not been paid since three months !

हे देखील पहा -

तीन महिन्यांपासून वेतन Payment मिळाले नसल्यामुळे आता कोविड सेंटर मध्ये कार्यरत असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत झाला असून कर्मचारी आक्रमक झाले आहेत. अनेकदा प्रशासनाकडे Administration पाठपुरावा करूनही जिल्हा परिषद Zilla Parishad आरोग्य अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याची खंत देखील आरोग्य कर्मचाऱयांनी व्यक्त केली आहे.

बुलढाण्यातील 550 आरोग्यकर्मींचे तीन महिन्यापासून वेतन नाही !
विमानतळाला दि.बा.पाटलांचे नाव देण्यासाठी भूमिपुत्र घालणार सिडकोला घेराव

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आरोग्य अधिकारी यांच्याकडे वेतनासंदर्भात विचारणा केली असता त्यांच्याकडून कधी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी सांगिलते जाते. मात्र वेतन मिळत नसल्याने या कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद कार्यालया बाहेर निदर्शने करावी लागत आहेत. त्यामुळे स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना काळात सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर वेतनासाठी आंदोलन आणि निदर्शने करायची वेळ प्रशासकीय अनास्थेमुळे येत आहे.

यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी बाळकृष्ण कांबळे यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणले कि, नवीन आरोग्य कर्मचाऱ्यांची अनेक कागदपत्रांची पूर्तता केल्यावर वेतनासंबंधी मार्ग मोकळा होईल असं सांगून त्यांनी यावर अधिकच बोलणं टाळलं. मात्र स्वतःचा जीव धोक्यात घालून अहोरात्र कोविड बाधित रुग्णांची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

Edited B\y : krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com