Farmer March News : दु:खद! शेतकरी लाँग मार्चमधील शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; शेवटची इच्छा मात्र अधुरीच राहिली

शेतकरी लाँग मार्चबाबत एक दु:खद बातमी समोर आली आहे. शेतकरी लाँग मार्चमधील एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
Farmer March News
Farmer March News Farmer March News

फैय्याज शैख

Farmer March News : शेतकरी लाँग मार्चबाबत एक दु:खद बातमी समोर आली आहे. शेतकरी लाँग मार्चमधील एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शहापूरमध्ये उपचारादरम्यान या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. शेतकऱ्याच्या मृत्यूने इतर शेतकऱ्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (Latest Marathi News)

रविवारपासून पायी मोर्चासाठी निघालेल्या शेतकरी (Farmer) मोर्चातील पुंडलिक अंबादास जाधव (वय ५५) यांचा मृत्यू झाला आहे. मोहाडी येथील दिंडोरी तालुत्यात वास्तव्यास होते. वासिंद येथे मुक्कामी असताना या शेतकरी आंदोलकास आज दुपारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना 108 रुग्णवाहिकेतून शहापूर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. त्यावेळी त्यांच्यावर उपचार करून त्यांना डॉक्टरांनी अॅडमिट होण्याचा सल्ला दिला.

Farmer March News
Farmer March News : CM एकनाथ शिंदेंच्या निवेदनानंतरही शेतकऱ्यांचं 'लाल वादळ' मुंबईत धडकणारच; जे.पी.गावीत म्हणाले..

'मला आता बरे वाटतेय मला आंदोलन ठिकाणी माझ्या बधू भगिनींसोबत सामील होऊ द्या, असे बोलून ते पुन्हा आंदोलनात जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार पुंडलिक हे पुन्हा वासिंद मुक्कामी येथे गेले. दरम्यान संध्याकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान त्यांना पुन्हा त्रास झाला व उलट्या होऊ लागला. त्यांना प्रथमोचार देऊन पुन्हा शहापूर (Shahapur) उपजिल्हा रुग्णालयात आणले.

Farmer March News
Rain Today: अवकाळी पावसानं होत्याचं नव्हतं झालं; अंगावर वीज कोसळून मुलगा, महिलेसह चौघांचा मृत्यू

पुंडलिक यांच्यावर उपचार करण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान या आंदोलनामुळे न्याय हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. शेतकरी पुंडलिक यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, पोलीस या शेतकऱ्याच्या मृत्यू प्रकरणी पंचनामा करण्यास सुरुवात केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com